STORYMIRROR

Somesh Kulkarni

Others

3  

Somesh Kulkarni

Others

ती

ती

2 mins
196

तिचा त्यांनी छळ चालवला होता. वंशाला दिवा पाहिजे असणाऱ्या सासूने तर सारं घर डोक्यावर घेतलं होतं. मुलाला काहीच सुचत नव्हतं.ती बिचारी दिवस कंठत होती.आज ना उद्या मुलगा होईल या आशेवर याआधी तिला दोन्हींही मुलीच झाल्या होत्या. आता जर मुलगा झाला नाही, तर हे घर सोडून जा असं तिला सासूनं बजावलं होतं.

आताही ती गरोदर होती.यावेळी मात्र सासूने तिला चांगल्या विश्वासातल्या डॉक्टरकडे नेऊन सोनोग्राफी करायला सांगितली आणि 'जर मुलगी असेल तर गर्भपात करूनच घरी ये' असं सुनेला तिनं दरडावलं.ती रडत रडत नवऱ्यासोबत निघाली.तिला खरंतर या अन्यायाला विरोध करता न येण्याचं एकमेव कारण तिचा पती होता. आईचा आदेश सदा शिरसावंद्य असणाऱ्या या पुत्राला हातात कधीही कुठला कारभार घेता आला नाही. एवढंच काय,आजही घरातल्या किराणा मालाच्या यादीपासून ते शेतीमालाच्या भावापर्यंत सगळ्या गोष्टी आईच ठरवत होती. त्यामुळेही कदाचित पहिल्यापासून प्रस्थ आणि मला झाला तसा सासुरवास हिलाही व्हावा ही सुप्त इच्छा !

डॉक्टरांनी सोनोग्राफी केली.त्यात मुलगी असल्याचे निष्पन्न करीत त्यांनी नवर्याच्या सांगण्यावरून गर्भपात करण्यासाठी पेशंटला तयारही केले. मात्र थोड्याच वेळात पोलीस तिथे हजर झाले. दुसऱ्या डॉक्टरांकडून आधीच तपासणी करून आलेली सून पोलिसात जाऊन आली होती.अर्थात सगळेच डॉक्टर असे नसतात, हे तिलाही ठाऊक होतं.मात्र येन केन प्रकारेण आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी सासू कोणत्या टोकाला जाऊ शकते याचीही तिला कल्पना होती.मुलाचा गर्भ मुलीचा सांगून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली.सुनेला गर्भपात करायला भाग पाडणार्या सासूलाही शिक्षा ठोठावण्यात आली.मुळात गर्भपात हाच गुन्हा आहे हे ठाऊक असणाऱ्या सुनेच्या या वागण्याने सासूला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला.


Rate this content
Log in

More marathi story from Somesh Kulkarni