Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Amina Mulani

Others

4.5  

Amina Mulani

Others

ते दिवस...

ते दिवस...

2 mins
630


आमचं एकत्रित कुटुंब... त्यामुळे आज जे काही संस्कार माझ्यावर झाले, मी आज जे काही आहे ते माझ्या कुटुंबामुळेच...ते दिवसच खूप छान होते... उडत्या पाखराने आकाशात ऊंच उडावे व कधीही मागे वळून न पहावे असे ते दिवस... पण मला सारखे मागे वळून पहावेसे वाटते.. भूतकाळात डोकावून वर्तमानकाळात जगण्याची प्रेरणा मला या मुळेच मिळते... मी ज्या ज्या वेळी एकटी असते. त्या त्या वेळी मला माझी आजी व आजोबा आठवतात....


लहानपण आमचं त्यांच्या जवळच तर गेलं... सकाळी सकाळी शाळेची लगबग असायची... आम्ही पाच जण शाळेत एकत्रित जायचो तेही सकाळची शाळा म्हणजे जास्त लगबग.... एक बिस्कीटचा पुड्यात आमच्या वाटणीला दोन दोन बिस्कीट यायची त्यावरच आम्ही खुश असायचो... शाळेत भरपूर खेळ व तेव्हडाच अभ्यास असायचा त्यामुळे शाळा व शिक्षक आम्हांला हवे हवेसे वाटायचे. त्यावेळी शिक्षकाचा मार खाणे म्हणजे मरणयातनाच.. घरच्यांना माहिती झाले कि आणखी बोनस म्हणून प्रसाद मिळायचा जादाचा... आज पोरांना दोन छड्या दिल्या कि आई येते पदर खोऊन शिक्षकाच्या नावाने उद्धार करतंच...


बारा वाजता शाळा सुटले कि घरचे हजर... कौतुकाने कोणी शाळेत सोडायला व आणायला नव्हते येत. आपले ओझे आपणच घेयचे.आजच्या सारखे आई पोराची बॅग वहात नसे. घरी आले कि भर उन्हात आम्ही सगळे गल्लीतील मुलं मुली एकत्रीत खेळायचो व आम्ही दहावी ला जाई परेन्त एकत्रित खेळत होतो. पण आमच्या मनात कोणते वाईट विचार आले न कधी डोकावले. आपडी तपडी पासून सुरपारंभ्या परेनतचा प्रवास एकत्र घडला.मग चार वाजता ट्युशन असायची, आम्ही परत एकत्रित हजर दन्गा करायला. घरचा अभ्यास तिथे करायचो कि परत एकत्रित येऊन आणखी खेळायचो. पूर्ण दिवस बाहेर घालवल्या नंतर संध्याकाळी आम्ही सगळे भाऊ बहिणी एकत्रित येऊन जेवण करायचो. एरवी आम्ही रात्री खेळत नसायचॊ पण सुट्टीत आत्याची मुलं आली कि आम्हाला दिवस व रात्र समान वाटायचे. जोडीला विविध गोष्टी व शाळेतील धमाल सांगायचो.


कोणतेही बंधने नव्हते कि काळजी नव्हती. आजचे जगणे, आजचं जगून घ्यायचो. आजकाल आपण आपल्या मुलांना खरेच असे जगू देतोय का? दररोज स्कूल, ट्युशन, ऍक्टिव्हिटी यामध्ये त्याच बालपण हिरावून घेतलंय. सुट्टी असली कि लावा मग वेगवेगळे क्लास.... आपण खरंच त्यांना आपली मुलं समजतोय कि मशीन.... आपल्या मनाप्रमाने त्यांनी वागावे. त्यांच्या मनाचं काय? त्यांना कधी तरी समजून घ्या... त्यांना विचार करायची संधी द्या.... मग बघा... कोणत्याही क्लासची व छंद वर्गाची गरज भासणार नाही. जगाच्या बाजारात नक्की ते यशस्वी ठरतील.... व याचा क्लास कोणत्या शिक्षकाकडे, शाळेकडे नाहीये बरं का? नाहीतर तुमची गल्लत होयची...


Rate this content
Log in