Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Amina Mulani

Others

1  

Amina Mulani

Others

प्रेम....

प्रेम....

2 mins
609


प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.... नुकताच प्रेमाचा महिना फेब्रुवारी होऊन गेला... सगळे प्रेमवेडे या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहातात असा हा महिना....

त्यामध्ये वेगवेगळे डे आले.. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतोच... काहींच प्रेम पूर्ण होत तर काहींच आठवणी ठेऊन जात कायम स्वरूपी...

ते मोरपंखी दिवस आठवले कि प्रत्येकाला आपले तो किंवा ती आठवते... आपोआपच...

जर तुम्ही दहा वर्ष मागे गेलात...तो काळ आठवला किंवा अनुभवला असेल... त्याचे तुम्ही साक्षीदार असाल तर तुम्ही खूपच नशीबवान आहात म्हणायला हरकत nahi.

त्यावेळचं प्रेम म्हणजे खरेच प्रेम होत... कारण ना त्यामध्ये कधी स्वार्थ नव्हता न कधी वासनेची भावना... जर त्याकाळातील मुलं एका मुलीवर प्रेम करत असतील तर ती मुलं तिला पाहण्यातच स्वर्ग सुख मानायची. कधी चुकून नजरेला नजर झाली तर तिच्या नजरेचा तिर त्याच्या काळजात घुसायचा... व तो खल्लास होयचा. ते दोघे एका वर्गात असो व एका शाळेत...कधी न गाठ भेट झाली न त्यांची न हिम्मत झाली बोलण्याची.मुलं -मुली पळून जायची प्रकरणे फार नसायची. कारण होते दोघांवर होणारे स्वस्कार व आई बापाच्या इज्जतीची असणारी काळजी, यांच्यातच बहुतेक प्रेम अर्धे अधुरे रहायचे, शाळा, clg, सम्पले कि अर्धे रहायचे... पण सम्पले कधीच नाही...

एवढे सांगण्यामागचा हेतू आपले स्वस्कार कमी पडत आहेत कि आपण पालक म्हणून कमी पडत आहोत. आज काल मुलं -मुली बिंदास फिरत असतात हातात हात घालून सर्रास हॉटेल मध्ये जाणे, रहाणे म्हणजे प्रतिष्ठा असे त्यांना वाटते. यामधूनच काही अनुचित प्रकार घडतात व निरपराध मुलं मुली त्याचे बळी पडतात. आयुष्यातून उठण्याची वेळ येते. त्यामध्ये बलात्कार, acid attack असे प्रकार घडतात. त्याच्या cases वर्षान -वर्ष court मध्ये चालतात. त्यापेक्षा आपण एक पालक म्हणून आपली जबाबदारी आहे, आपल्या पाल्याच्या चुकीवर पांघरून घालत बसू नका... मग मुलगा असो व मुलगी योग्य वेळी लगाम घाला. घरात मैत्रीचे वातावरण ठेवा. सगळ्या गोष्टी share करायची सवय लावा. जेणे करून अश्या अनुचित प्रकाराला आला बसेल.


प्रेमाला लोक आजही विश्वास ठेवतील...

मानतील.... चला तर मग प्रेम वाटू.... प्रेम वाढवू...


Rate this content
Log in