स्त्री आणि अत्याचार
स्त्री आणि अत्याचार
एक स्त्री म्हटलं की सर्वात आधी आपल्याला आपली आई आठवते, आपली बहीण आठवते, मुलगी आठवते, प्रेयसी आठवते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री ही खूप महत्त्वाची असते. कारण जी लहानपणापासून म्हणजेच आपण जन्म घेतो तेव्हापासून जी आपल्या सर्व गोष्टींचा विचार करते ती 'आई' असते. चारचौघात आपलं कौतुक करते ती आपली 'बहीण' असते.तर एका बापाला 'मुलगी' ही देवाने दिलेली भेट असते. व या सर्व स्त्रिया सुरक्षित असाव्यात असे आपल्याला मनोमन वाटत असते ही झाली आपली बाजू पण परस्त्रीचं काय?
आजच्या घडीला म्हणजेच आपण २१व्या शतकाचा विचार केला तर रोज आपल्या कानावर काही बातम्या येतात. या प्रकारच्या बातम्या कानावर येऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही. फक्त आश्वासने दिली जातात. अस म्हटलं जातं की "एक स्त्री शिकली की एक घर सुधारतं एक घर सुधारलं की एक कुटुंब सुधारतं आणि एक कुटुंब सुधारलं की समाज सुधारतो". पण एक स्त्री जर सुरक्षित नसेल तर ह्या सर्व सुधारलेल्या गोष्टींचा काही उपयोग नाही. कारण प्रत्येकाला माहीतच असेल ते दिल्लीचं निर्भया प्रकरण त्याचबरोबर हैदराबादमध्ये घडलेल्या महिलेचं प्रकरण व आत्ताच घडलेलं हिंगणघाट मधील प्रकरण.
"फाशीचं द्या", "भरचौकात फाशी द्या", "जलद निकाल लावा" अशी मागणी करण्याची सवयच समाजाला झाली आहे. व या मागण्या आजही होतील. पण पुढे काय होईल. ज्या ठिकाणी ह्या घटना घडल्या. 'तिथून एकटीने जाऊ नकोस' असे अनेकांनी सांगितले जाईल. त्या सारखे इतर रस्ते मोकळे आहेत, याची जाणीव आजही समाजाला नाही.याची जाणीव कदाचित अजून एखादा प्रकरण घडल्यावर येईल. अश्या घटनांमागच्या प्रवृत्तीला आपण भिडणार की नाही हा प्रश्न कायमच राहतो. एखाद्याला 'नराधम' ठरविले की समाजाच्या दृष्टीने विषय संपतो. पण तिच काय? स्त्रियांचे होणारे अत्याचार हे कधी थांबणार कधी आपल्या समाजाला जाग येणार व कधी एका स्त्री च्या "अत्याचाराची झुंज" संपणार हा गहनतेचा विषय बनला आहे व यावर प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे.
