वैभव दिलीप चौधरी

Others

3.5  

वैभव दिलीप चौधरी

Others

इंग्रजीच्या वाटेवर

इंग्रजीच्या वाटेवर

2 mins
98


"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"


                 कवी "सुरेश भट" यांच्या या ओळीतून कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण  भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील  सह्याद्री, सातपुडा सारख्या डोंगररांगा , गड व किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा परिसर म्हणजे महाराष्ट्र भूमी येथील ही वर्तमान काळातील राजभाषा होय.


              वर्षातून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला "मी मराठी", "मी मराठी" करत फिरतो. सामाजिक माध्यमांवर देखील फक्त वर्षातून एकदाच मराठी भाषिक 'आम्ही मराठी'आहोत असे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.पण संपूर्ण वर्षभराचा विचार केला तर, असे दिसून येते की बहुजन समाजात कुठेतरी मराठी भाषा लोप पावत असल्याची दिसून येते. मराठी  भाषेला काहीही झालेलं नाही,असा एक भ्रम मराठी भाषा दिनाला हमखास पसरवला जातो.पण प्रत्यक्षात आपण जर विचार केला तर, प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात   मराठी भाषेपेक्षा हिंदी व इंग्रजी व त्याबरोबरच इतर भाषांचा वापर सर्रासपणे करताना दिसून येतात.. दोन  मराठी  भाषिक एकमेकांशी बोलताना सुद्धा 'नमस्कार' , 'रामराम' न बोलता Hi, Hello, How are you बोलून मोकळे होतात . सामाजिक माध्यमांवरील संदेश सुद्धा Good morning , Good Night , nice to meet you, Thank you अश्याच पद्धतीने पाठवतात. शुभेच्छा पत्र सुध्दा इंग्रजी भाषेतच पाठवतात. यामध्ये मराठी भाषेचा वापर सहसा करत नाही. किंबहुना त्यांना लाज वाटते की आपण मराठीतून बोललो तर आपल्याला कमी लेखलं जाईल. अशा भ्रमात मराठी लोक राहतात. व त्यामुळेच मराठी बोलणाऱ्यांची संख्या ही कमी होत चालली आहे.


             इंग्रजी शाळांनाही उगाच दोष देण्यात अर्थ नाही. आजच्या काळात इंग्रजीची उत्तम जाण हवीच आणि शाळा इंग्रजी असली तरी घरी मराठीचे संस्कार करता येतातच की त्यात काय अडचण आहे? त्यामुळे मराठीचे भवितव्य उत्तम आहे . त्याबाबत चिंता नसावी. व्वा रे व्वा! प्रत्यक्षात काय स्थिती आहे, मराठी शाळा बंद पडताहेत. ज्या चालू आहेत त्यांची मराठी कडून सेमी- इंग्रजी आणि कालांतराने पूर्ण इंग्रजी माध्यमांकडे वाटचाल सुरू आहे . व या सर्व गोष्टींना कोण जबाबदार आहे याचा विचार करण्याची गरज आहे.म्हणजे नेमकं काय केलं तर ही परिस्थिती बदलू शकते. मराठी दुरवस्थेला नेमकं कोण कश्या प्रकारे जबाबदार आहेत. याचा विचार न करता मराठीचा विकास ही सामूहिक जबाबदारी समजून त्यावर प्रत्येकाने विचार केला तर आणि तरच मराठी भाषा टिकून राहू शकते.


Rate this content
Log in