vinit Dhanawade

Children Stories Inspirational

3  

vinit Dhanawade

Children Stories Inspirational

" सोनेरी दिवस " .( भाग ३)

" सोनेरी दिवस " .( भाग ३)

18 mins
1.8K


      त्या दिवसापासून विवेकचा ग्रुप जरा गप्प गप्प असायचा. राकेशच तसं वागणं कोणालाच आवडलं नव्हतं. तरीसुद्धा त्याने जे केलं होतं त्याचा चांगला परिणाम दिसून आला. बंड्या त्या गल्लीत दिसेनासा झाला होता. आणि इतर वात्रट मुलांना देखील कळलं होतं , राकेशने बंड्याला कसं झोडपलं होतं ते. त्यामुळे ती मुलं देखील आता शांत झाली होती. भडकमकर काकांनी तर त्या ग्रुपला शाबासकी दिली. त्यामुळे आता सगळ्यांचा राकेशवरचा राग कमी झाला होता. " काय झालं बे सगळ्यांना .......आजकाल सगळे गप्प झालात ..... कि माज्या बरोबरच बोलत नाय कोणी ... " मधल्या सुट्टीत राकेशने सगळ्या ग्रुपला एका कोपऱ्यात घेऊन विचारलं. कोणीच काही बोललं नाही. " माज्या बरोबर बोलला नाही ना तर एकेकाला .... " असं म्हणत त्याने संकेतला पकडलं आणि जोरात पाठीत धपाटा मारला. " आई … गं .. कुत्र्या .... साल्या .... मलाच काय मारत असतोस सारखा.... "संकेत पाठ चोळत म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. " अरे तुझी जरा खेचत होतो रे सगळे. कोणीच रागावलं नाही आहे तुझावर. " नितीन बोलला ," बाकी कोणाचा माहित नाय मला ..... पण मी नाय बोलणार याच्या बरोबर कधी."संकेत अजूनही पाठ चोळत होता त्याची. " अले ......अले ......माज्या बाबूला लागलं वाटते. " राकेश संकेतची मस्करी करत बोलला. " घरी जा .... नायच बोलणार तुज्याबरोबर ... नायतर तुज्यासारख्या भटक्या जमातीला B.M.C. शिवाय कोण विचारते." , "म्हणजे ? " राकेशने संकेतला विचारलं. " अरे ... ती नाय का.... B.M.C. ची गाडी असते. भटक्या कुत्र्यांना उचलणारी.... "," साल्या .... संक्या.... मेलास आता ." म्हणत राकेश संकेतच्या मागे पळाला. ..... आणि ग्रुप पुन्हा एकत्र आला. 


     वार्षिक स्पर्धा सुरु व्हायच्या होत्या. विवेकचा ग्रुप चांगलाच होता सर्व खेळा. त्यातल्यात्यात दुसऱ्या वर्गाची चांगलीच ठसन होती त्यांच्या वर्गाशी,आणि स्पर्धा सुरु झाल्या सुद्धा. पहिल्या सर्व मुलींच्या स्पर्धा झाल्या. त्यात बहुतेक वेळेस दुसराच वर्ग जिंकला. त्यामुळे विवेकच्या ग्रुपला जरा tension आलं होतं. " विक्या .... नित्या ..... संक्या ..... काहीही करा.... पन आता आपल्यावर जबाबदारी आहे वर्गाची. आपल्याच जिंकावा लागणार आता. " राकेशने घोषणा केली . राकेश स्वतः कब्बडीचा कॅप्टन होता आणि त्यानेच टीमला एकहाती सामना जिंकून दिला. पुढे नितीनने बुद्धीबळ मध्ये सगळ्यांना हरवून बाजी मारली. नितेश आणि विशालनी " प्रश्न-मंजुषा " जिंकून ग्रुपच नाव राखलं. आता राहिले संकेत आणि विवेक. ते दोघेही फुटबॉलमधे best होते. शेवटची match होती फुटबॉलची आणि match च्या सुरुवातीलाच त्याला मुद्दाम पाडलं. त्याच्या पायाला लागलं होतं.चांगला खेळाडू बाहेर बसला कि काय होते ते माहितच आहे. दुसऱ्या टीमनी २ गोल सुद्धा केले. विवेकला ते बघवत नव्हत आणि एकटा संकेत कमी पडत होता. शेवटी न राहवून विवेक तसाच लंगडत लंगडत खेळायला उतरला. त्याला बघून वर्गातील मुले-मुली " विवेक ..... विवेक ..... " असं आनंदाने ओरडायला लागली. त्याने हळूच सईकडे नजर टाकली. ती सुद्धा " विवेक ..... विवेक ..... " असं ओरडत होती. हे बघून त्याच्या अंगात वेगळीच ताकद आली. पायाचं दुखणं तर कधीच विसरला होता तो. आता संकेत आणि विवेक दोघेही मैदानावर धुमाकूळ घालत होते. विवेकने ३ तर संकेतनी १ गोल करून match जिंकून दिली. विवेक तर वर्गाचा हिरो झाला होता पण त्याचा पाय आता सुजून लाल झाला होता. सगळे येऊन त्याला शाबासकी देत होते,अगदी मुलीसुद्धा.घोळका केला होता त्याच्या भोवती ," विवेक .... "अचानक मागून आवाज आला,तसा तो मागे वळला, तर सई....... तिच्याकडेच तो बघत राहिला. तिने हात पुढे केला," तुझ्यामुळे आज match जिंकलो आपण .... thank you " विवेक तर तसाच बसला होता तिचा हात पकडून," अबे... आमाला पन हात मिलवायचे आहेत हिरो लोकांचे" असं राकेश मुद्दामच बोलला. तशी सई जराशी लाजली आणि बाजूला हसत हसत गेली. विवेक जाम खूश होता आज. सगळे त्याच्याविषयीच बोलत होते ना. त्यावेळी सगळे होते मैदानावर. फक्त एकाला सोडून ... " बंड्या" .... तो नव्हताच तिथे. थोडयावेळाने शाळेच्या पायऱ्या उतरताना विवेकने त्याला पाहिलं. तसं त्याने नितीनला पण सांगितलं,"राकेशला नको सांगूस... नाहीतर पुन्हा तापेल तो." म्हणत नितीनने विवेकला गप्प केलं.


     सगळे आपापल्या वर्गात गेले. छान झाल्या होत्या स्पर्धा.सगळे त्याच धुंदीत होते. तेव्हाच.... " सर ... माझ्या bag मध्ये मी माझे पैजण आणि कानातली रिंग काढून ठेवली होती.... ती नाही आहे bag मध्ये."अशी एक मुलगी रडत रडत म्हणाली. " अबे ... या पोरी ना... कुठेतरी ठेवायचं आणि नंतर रडत बसायचं " राकेश हसतच म्हणाला."कोणाला हसायला येतंय " सुरेश सर म्हणाले ... " अबे ... राक्या गप... तवा आला आहे .. गप की ... "संकेतने हळूच राकेशला खुणावले. [ सुरेश सर खूप रागीट होते. सगळी मुले त्यांना घाबरायची. कोणाचीही चूक सापडली तर त्याला ते सर किती मारायचे हे त्यांनाच माहित होते. अगदी लगेच तापायचे ते .. म्हणून त्यांना सगळे " तवा " म्हणायचे. ] " काय झालं ? कुठे ठेवले होते पैजण ? " , " bag मध्ये सर , स्पर्धा होत्या म्हणून madam नी bag मध्ये सांगितलं होतं ठेवायला,आता नाही आहे " ती रडत रडत सांगत होती. सुरेश सरने सगळ्या वर्गावर नजर फिरवली. " कोणी घेतलं असेल तर आत्ताच देऊन टाका. खूप झाली मस्करी. " सगळा वर्ग एकमेकांकडे बघत होता. " ठीक आहे ,तुम्ही असे ऐकणार नाहीत. चला .... सगळ्यांनी आपापल्या bag आणि खिशे दाखवा. " ,"आणि आता कोणाकडे सापडलं तर बघा .... मी काय करतो ते. ..... ","अबे ... तापला बघ तवा...... चल लवकर ... डब्यातल्या चपात्या गरम करूया " राकेश हसत म्हणाला "गप बस साल्या .... " विशालने राकेशला टोचल. तो गोंधळ ऐकून आजूबाजूच्या वर्गातली मुल-मुली " काय चालू आहे वर्गात " म्हणून जमा झाली होती. " कोण आलेलं वर शाळेत ? कोणी पाहिलं नाही का ? " सुरेश सर bag चेक करत म्हणाले. " राकेश आलेला सर शाळेत ..... स्पर्धा सुरु असताना " सई मागूनच हळू आवाजात म्हणाली. तसा सगळा वर्ग राकेश कडे बघायला लागला. सुरेश सर सुद्धा आता त्याच्याकडेच बघत होते. " राकेश .... तू आलेलास खरोखर." , " अबे पानी प्यायला आलो व्हतो बे ... " राकेश हळू आवाजात पुटपुटला. " काय रे ... सई खर बोलते आहे का ? " सुरेश सर रागात म्हणाले." नाय ... हो ...... हो ... सर..... पन मी वर्गात नाय आलो व्हतो ... पानी पियाला आलो व्हतो सर ..... " ," ते कळेलच आता .. " म्हणत सरांनी त्याची bag हिसकावून घेतली. आणि तशीच bag उलटी केली सर्वासमोर. bag मधून वह्या पुस्तक तर पडलीच पण त्याच बरोबर चांदीचे पैजण आणि कानातली रिंग सुद्धा पडली. सगळा वर्ग चाट पडला. त्याच्या मित्रांना तर विश्वासच बसत नव्हता. सुरेश सर तर रागाने लाल झाले होते. तसेच ते झपझप राकेश जवळ आले आणि खाड्कन थोबाडीत मारली त्याच्या. " चोरी करतोस .... भिक लागली का तुला…बोल " सुरेश सर तोंडाबरोबर हातही चालवत होते." नाय .... सर .... मी नाय चोरलं ... " राकेश स्वतःला वाचवत म्हणाला,पण त्याचं ते सर कुठे ऐकत होते. " थांब..... तू असा कबूल नाही होणार "म्हणत त्यांनी आता लाकडी पट्टी घेतली आणि त्याला मारणार इतक्यात … गोंधळ ऐकून मुख्याध्यापक वर्गात आले," थांबा .... काय चाललाय ? कशाला मारताय त्याला ? " ," चोरी .... चोरी केली आहे त्याने." ," नाय सर ..... नाय ... मी नाय चोरी केली ." असं म्हणत राकेश मुख्याध्यापकांकडे धावला. सुरेश सर त्याला मारण्याच्या तयारीत होते. राकेशला तर खूप मारलं होतं त्यांनी." सुरेश , तो काय बोलतो ते ऐकून तर घ्या. " मुख्याध्यापक सुरेश सरला म्हणाले. तशी त्यांनी हातातली पट्टी खाली ठेवली. " बर... तू चोरी केली नाहीस ना... मग तुझ्याकडे कसं आलं सगळे" मुख्याध्यापक राकेश कडे बघत म्हणाले," माहित नाय सर.... " ," मग तू कशाला आलेलास वर शाळेत , जेव्हा सगळे खाली स्पर्धा बघत होते.","सर ... मी पानी प्यायला आलो व्हतो... पायजे तर भडकमकर मामांना विचारा."," ठीक आहे ... अरे ... त्या भडकमकर काकांना बोलवा कोणीतरी. " सर म्हणाले , तस कोणीतरी जाऊन त्यांना घेऊन आलं. " व्हय .... सर ..... त्यो राकेश पानी प्यायलाच आला व्हता.... मी पन बघितला त्याला.... " , " बर ... ठीक आहे … जा तुम्ही .. आणि बाकीच्या मुलांनी सुद्धा आपापल्या वर्गात जा ... काहीही झालेलं नाही." मुख्याध्यापक म्हणाले. " सुरेश , आपल्याकडे काहीच पुरावा नाही कि याने चोरी केली आहे. आणि तो पाणीच पिण्यासाठी आलेला हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे, मग कशाला विषय वाढवायचा ? " , " आणि राकेशने चोरी केलीली नाही. कोणीतरी मस्करी केली असावी. आताच्या वेळेस मी माफ करतो सगळ्यांना पण पुढील वेळेस मोठी शिक्षा करण्यात येणार." वर्गाला उद्देशून मुख्याध्यापक म्हणाले आणि सुरेश सर ला सोबत घेऊन गेले. सगळा वर्ग गप्प होता. राकेशचा सगळं अंग ठणकत होतं, किती मारलं होतं त्याला. त्यानंतर लगेचच शाळा सुटली . विवेकचा ग्रुप एकत्रच होता पण विवेक जरासा अस्वस्त होता. तेवढ्यात विवेकला सई दिसली तसा तो धावतच तिच्याकडे गेला. बाकी सगळे त्याच्याकडे बघतच राहिले. कारण तिच्यामुळेच राकेशला मार पडला होता विनाकारण.... " सई .. " विवेकने तिला लांबूनच हाक मारली. तशी ती थांबली," सई ... तुला एक विचारू का ?" , " काय विचारायचे आहे ? " जरा घाबरतच म्हणाली ती. " तू फक्त राकेशलाच बघितलंसं का .... ? " ," असं का विचारतो आहेस? मी खरंच बोलली " ," नाही ... तू खर नाही बोललीस ... मी पुन्हा विचारतो ... तू फक्त राकेशलाच बघितलस का ... वर शाळेत येताना ? " सई जरा घाबरीघुबरी झाली होती ," बोल काहीतरी सई .... ", विवेक रागातच बोलला. " मी घाबरले होते रे विवेक ... आणि तो खूप वाईट आहे रे ... ", " तो कोण ? " ," बंड्या ... " , " मग तू राकेशच नाव का घेतलस ? " ती काहीच बोलली नाही. " तुझ्या कडून मला अशी अपेक्षा नव्हती…तुझ्यामुळे माझ्या मित्रावर चोरीचा आळ आला... तुला नाही माफ करणार कधी मी... ," पण मी त्याला बघून खूप घाबरली होती रे ." विवेकने ते ऐकले नाही. विवेक आपल्या ग्रुप जवळ आला. " एक कानफडात मारायची ना तिच्या. माझं नाव घेतलं तिने." राकेश विवेकला बोलला. विवेक शांत होता. " बोल ना ... काय बोललास तिला. " नितेश आता मोठ्या आवाजात बोलला," विवेक गप्पच," बोला ना .... साल्यानो…. काय चाललंय?आणि तू काय बोलत होतास तिच्याबरोबर." राकेश आता रागाने लाल झाला होता. " तिने तुलाच नाही बघितलं होतं फक्त "," मग..... आणखी कोन होता." , " बंड्या "," साला ... आता बघ काय करतो मी त्याचा . त्याच्यामुळे मार पडला मला.... आणि तिला पन बघून घेतो. " राकेश बोलला ," तिची काही चूक नाही " विवेक मधीच बोलला," मी पण बघितलं होतं त्याला " विवेक अस बोलला आणि सगळे त्याच्याकडे बघू लागले. " मला हे त्याने सांगितले होते,पण मीच त्याला गप्प राहा म्हणून सांगितले होते." कोणी बोलायच्या आधीच नितीन बोलला. " अबे ...... पन जेव्हा तो तवा मला कुत्र्यासारखा मारत होता तेव्हा तुला तुजा तोंड उघडता नाय आला " नितीन आणि विवेक गप्प ," बोल ना साल्या ..... तेवा तुला तुजा मित्र नाय आठवला....... "...... " हो .... शेवटी तू " त्याचाच भाव ना. एकच रक्त आहे ना दोघात ... " , " राक्या गप्प आता .... खूप बोलतो आहेस .... " , विशाल मधेच बोलला. " तुमी पन गप्प बसा सगळे .... कोणी आलं नाय मदतीला माजा ... सगळेच सारखे.... परत येऊ नका माजा जवळ .... समजलं ना ... "असं म्हणत राकेश एकटाच निघून गेला रागात. " सगळ तुझ्यामुळे झालं आहे विक्या..... तुला बोलायला काय झालं होतं." नितेश म्हणाला," अरे .... पण मी बंड्याला बघितलं याचा अर्थ त्याने चोरी केली असा नाही होत. " ," म्हणजे राक्या ने चोरी केली अस म्हणायचे आहे तुला… अजूनही तू त्याचीच बाजू घेतो आहेस. आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे वाटते. " संकेतने विवेकला विचारले. विवेक तर काहीच बोलण्याच्या तयारीत नव्हता. " मला वाटते आपल्याला उत्तर मिळालं आहे. तुझ्यासारखे मित्र असतील तर नसलेलेच बरे.... " अस म्हणत नितेश .... विशाल आणि संकेतला बरोबर घेऊन निघून गेला. आता उरले फक्त नितीन आणि विवेक. विवेकनी नितीनकडे बघितलं.... नितीनने त्याच्या खांदयावर हात ठेवला आणि म्हणाला , " तुझी काहीही चूक नाही आहे, हे मला माहित आहे. मी तुला नाही सोडणार कधी एकटा." 


        त्यादिवसापासून सगळा ग्रुप वेगळा झाला. संकेतनी विवेकच्या बाजूची जागा सोडून दुसरीकडे बसला होता. त्यामुळे विवेकच्या बाजूला आता नितीन बसला होता. विशाल आणि नितीन आजूबाजूलाच बसायचे पण विवेकपासून लांब. राकेश तर २ दिवस आलाच नाही शाळेत. वर्गातली सगळी मजाच निघून गेली होती जणूकाही. सगळा वर्ग गप्प असायचा. ४ दिवसांनी शाळेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेपासून जरा लांबच होता. विवेकचा सगळा ग्रुप होता आणि राकेश सुद्धा आलेला. आज प्रथमच सगळ्या शाळेने त्यांना वेगळं झालेलं पाहिलं होतं. सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. कार्यक्रम संपला तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यामुळे शाळेतल्या मुली घोळक्या-घोळक्याने घरी निघाल्या होत्या, राकेश मुद्दामच मागे थांबला होता , पुन्हा ग्रुपमधला कोणी समोर यायला नको म्हणून. सगळे लांब गेलेले बघून राकेश निघाला. इतक्यात बाजूच्या गल्लीतून जोरात किंचाळी ऐकू आली. राकेश धावतच गेला तिकडे. तिकडे एक शाळेतली मुलगी जमिनीवर निपचित पडलेली. आणि कोणीतरी धावत जाताना राकेशने पाहिलं. त्याच्यामागे जाणार होता तो पण तो तिला बघून थांबला तिथेच. " हिला काय झाल ? " तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. " काय करायचा आता? " असा तो विचार करत होता. तो खाली बसला आणि तिला जागं करण्याचा प्रयत्न करू लागला. ती तर बेशुद्धच होती. काय कराव हे राकेशला कळतच नव्हतं. आणि तिला तसं एकटीला टाकून जाण्यात काहीच अर्थ नव्हता. तेवढ्यात तिथे सुरेश सर आले. त्यांचा तोच रस्ता होता घरी जाण्याचा आणि त्यांनी राकेशला बघितलं. " काय रे .... काय केलंस तिला ? " अस म्हणत सुरेश सर धावतच त्यांच्या जवळ पोहोचले, " मी काय नाय केला सर ... " राकेश म्हणाला, सुरेश सरांनी तोपर्यंत त्याची कॉलर पकडून मागे ढकललं होत. ते त्या मुली जवळ बसले. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयन्त केला त्यांनीही. पण ती अजूनही बेशुद्धच होती. एकटीच जात होती ती तिकडून, काळोखातून, त्यावेळी कोणीच नव्हते तिकडे. अचानक कोणास ठाऊक, बंड्या कसा आला तिथे. एकटी मुलगी बघून तो तिच्यामागे गेला. आणि त्याने तिला गाठलंच. काळोखाला घाबरलेली ती बंड्याला बघून अजूनच घाबरली. त्याने पटकन पुढे होऊन तिचा हात पकडला. आणि तिने जोरात किंचाळी फोडली, मानसिक धक्का बसला होता तिला त्यामुळेच ती इतका वेळ बेशुद्धच होती. बंड्या मात्र राकेशला येताना बघून पळाला होता. उगाचच राकेश अडकला होता. सुरेश सरनी एव्हाना गोंधळ करून एका-दोघांना बोलावून घेतलं होतं . त्यांनी त्या मुलीला हॉस्पिटल मधे नेलं होतं. सुरेशनी तेवढयात पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं होतं. सुरेश सरचा नाहीतरी राकेशवर रागच होता, कारण त्यादिवशी मुख्याध्यापाकानी त्यानाही चांगलाच दम दिला होता. पोलीसही आले नव्हते अजून. सुरेश सरचे हात शिवशिवत होते ,राकेशला मारायला. " बोल काय केलस तिला ? " , सुरेश सरनी राकेशला पुन्हा विचारलं. राकेशने मानेनेच नाही म्हटलं. सुरेश सरला तो अपमान वाटला. त्यांनी त्याला उगाचच मारायला सुरुवात केली. " बोल .... बोल .... काय केलंस तिला.... "त्याला ते मारतच होते..... ,हाताने .... पायाने . पोलिस येईपर्यंत राकेश अर्धमेला झाला होता मार खाऊन. पोलिस मग राकेश आणि सुरेश सर अस दोघांनाही घेऊन गेले. सुरेश सरला ताकीद देऊन सोडण्यात आलं,पण राकेश मात्र अजूनही पोलिस स्टेशन मध्येच होता. 


         दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळेत ती बातमी पसरली. विवेक आणि सगळ्या मित्राचं भांडण झालेलं असलं तरी सगळ्यांना तेच वाटत होतं कि राकेश कसाही असला तरी अस काही करणार नाही. राकेशला दोन दिवसांनी जामीनीवर सोडण्यात आलं. ती मुलगी ३ दिवस झाले तरी शुद्धीवर आली नव्हती त्यामुळे ती शुद्धीवर येईपर्यंत राकेशला सोडण्यात आलं होतं. कारण तिलाच नक्की काय घडलं , तिथे कोण होतं हे माहित होतं. तिच्या जबानीवर राकेशच भविष्य ठरणार होतं. 


         राकेश आता शाळेत यायला लागला होता,पण गप्प गप्प असायचा. सगळ्यात शेवटी बसायचा वर्गात,सगळ्यांपासून लांब अगदी. कोणाशीच बोलायचा नाही विवेकला त्याचीशी बोलायचं होतं ,परंतु जाणार कसा त्याच्या जवळ. वर्ग सुद्धा गप्प असायचा. विवेकनी " त्या " जागी थांबणं आता सोडून दिलं होतं. शाळेची वेळ झाली कि तो न थांबता शाळेत यायचा. त्याला आता सईकडे बघणही पसंत नव्हतं. तिच्यामुळे राकेश बरोबर भांडण झालं होतं ना. सईलाही विवेक तिथे तिची वाट पाहतो हे माहित होतं,परंतु तिने त्याला कधी त्याची जाणीव होऊ दिली नव्हती. तिला आता रोज चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. कारण विवेक तिथे थांबत नव्हता ना. वर्गात तरी काय ? विवेक आणि नितीन बोलायचे एकमेकांबरोबर. मधलीसुट्टी झाली कि संकेत जायचा खेळायला दुसऱ्या मुलांबरोबर. नितेश आणि विशाल डबा खाऊन झाला कि सरळ लायब्ररीत जाऊन अभ्यास करत बसायचे. राकेश नसायचा वर्गात, मधली सुट्टी झाली कि तो जायचा कुठे तरी. एक दिवस , शाळा सुटल्यावर भडकमकर काकांनी विवेकला थांबवलं ," काय झालं रे पोरांनो हे..... सगले कसे वेगले झालात रे ... " विवेकच्या डोळ्यात पाणी आलं, काहीही न बोलता तो निघून गेला.


         १० दिवसांनी ती मुलगी शुद्धीवर आली. भडकमकर काकांनी विवेकला शाळेत आल्याआल्या त्याला ही बातमी दिली. " राकेश आला आहे का मामा ? " , " नाय रे ... मला वाटता .... पोलिस घेऊन गेले असतील त्याला…त्या पोरीची जबानी हाय नव्हं.... " वर्ग तर सुरु झाले होते पण विवेकच लक्षच वर्गात नव्हतं. "काय झालं असेल रे नितीन .... "," माहित नाही रे ... " . मधली सुट्टी झाली. सगळी मुलं डबा खाऊन खेळायला जाणार इतक्यात पोलिस आले, राकेशही होता त्यांच्या बरोबर. त्यांच्यासोबत अजून एकजण होता परंतु पोलिस असल्यामुळे तो कोणालाच दिसला नाही. पोलिस तडक दोघांना घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये गेले. बाकी कोणालाच काही माहित नाही. मधली सुट्टी संपली . वर्ग पुन्हा सुरु झाले. आणि तेव्हा मुख्याध्यापक वर्गात आले. सोबत पोलिस , राकेशला घेऊन आले , मागोमाग " बंड्या" ही होता. त्याला बघून सगळेच आचर्यचकित झाले. " मुलांनो.... राकेश दोषी नाही आहे. त्या मुलीने सांगितलं आहे पोलिसांना. आरोपी "विक्रम" उर्फ " बंड्या" आहे. आपण राकेशला उगाचच दोषी ठरवत होतो." भडकमकर काकाही तिथे होते.त्यांनी बंड्याच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाले," काय रे..... आजून काय नाय सांगायचा तुला." तसा बंड्या थोडासा घाबरला पण पोलिस होते ना बाजूला , मग त्याला बोलायलाच लागलं., " त्यादिवशी...... राक्याला मी बघितला होता, पानी प्यायला आला होता. म्हनून मी पन त्याला मार बसावा म्हनून त्याच्या bag मधे त्या पोरीचे दागिने ठेवले व्हते."," म्हणजे अजून एक आरोप ... चोरीचा," अस म्हणत पोलिस त्याला मारतच घेऊन गेले. " राकेश जा , जाऊन बस वर्गात. तू निर्दोष आहेस. तुला झालेल्या त्रासाबद्दल मी सगळ्या शाळेकडून माफी मागतो." अस मुख्याध्यापक म्हणाले आणि आपल्या ऑफिसमधे निघून गेले. राकेश पुन्हा मागच्या बाकावर येउन बसला. विवेकला आता हलक हलक वाटत होतं. tension गायब झालं होतं. थोडयावेळाने शाळा सुटली. जाताना वर्गातील प्रत्येक जण राकेशला जाऊन sorry म्हणत होता. विवेक आणि त्याच्या मित्रांपैकी कोणीच गेलं नाही. विवेक आणि नितीन सुद्धा राकेशला न भेटताच बाहेर आले. शाळेच्या गेटबाहेर जाणार, " ये पोरानो... थांबा... थांबा.. जरा" अशी हाक आली कानावर, तसे विवेक आणि नितीन मागे वळले. काकांनी त्यांना खुणेनेच " थांबा" म्हणून सांगितलं, तर त्यांच्याबरोबर संकेत ,विशाल आणि नितेश सुद्धा होते. " थांबा हा इकडच.... आलो पटकन... " म्हणत पटापट निघून गेले. खूप दिवसांनी ते असे एकत्र उभे होते. पण कोणीच बोलत नव्हत. तेवढयात भडकमकर काका राकेशला घेऊन आले." पोरांनू..... मी आता म्हातारा झालो आहे… निदान माज्यासमोर तरी एकत्र राव्हा ना... सगल विसरून जावा हा आता..... " अस म्हणत ते निघून गेले. ," Sorry राक्या..... " विवेक हळूच बोलला. तसा राकेशने टपली मारली त्याच्या डोक्यावर ," अबे तू काय sorry बोलतोस ... मीच बोललो व्हतो तुला ना रागात.... तेव्हा मीच sorry ," अस म्हणत राकेशने त्याला घट्ट मिठी मारली. बघता बघता सगळ्यांनी त्या दोघांना मिठी मारली. खूप दिवसांनी ते असे भेटत होते. " बाकी .... सर्वांनी मला माफ केल ना... " राकेशने विचारलं. ," हो रे.... आणि ...... sorry विवेकला सुद्धा... वाईट वागलो ना... आम्ही. " संकेतने नितेश आणि विशाल तर्फे माफी मागितली. " तू आहेसच वाईट " अस म्हणत राकेशने संकेतच्या पाठीत धपाटा मारला.... " अगं आई गं ..... " संकेत कळवळतच पाठ चोळत उड्या मारत होता," साल्या ... तुला आता जिता नाय सोडत" म्हणत संकेत राकेशच्या मागे धावत गेला. " चला.... आपला राकेश आला परत." नितीन म्हणाला तसे सगळे मनापासून हसले आणि त्या दोघांच्या मागे मागे चालत निघाले.   


         पुढच्या दिवशी, विवेक वर्गात आला तेव्हा त्याला बर वाटलं. कारण संकेत पुन्हा त्याच्या बाजूला येऊन बसला होता. त्यामुळे नितीनला तिथून दुसरीकडे बसावं लागल. नितीन राकेशच्या बाजूला जाऊन बसला होता,संकेत आणि विवेकच्या बरोबर मागच्या बाकावर आणि उरलेले विशाल आणि नितेश त्या दोघाच्या मागे. राकेशला बरोबर मध्येच बसवलं होतं सगळ्यांनी. वर्ग सुरु व्हायचा होता अजून. तेव्हाच सईने वर्गात प्रवेश केला. पुढे जाताना तिने विवेककडे एक कटाक्ष टाकला. परंतु विवेकचा तिच्या वरचा राग अजून गेला नव्हता. विवेकने तशीच मान वळवली दुसरीकडे. सईला वाईट वाटलं. ती तशीच जाऊन बसली तिच्याजागी. " विक्या.... वाहिनी आपल्याला sorry बोलल्या बर का .... " राकेशने विवेकच्या कानात सांगितलं. ," कोण वाहिनी.... " विवेक बावरला," साल्या ..... मला काय येडा समजतोस काय ..... सगल माहित आहे माला ... आनी म्हनतो कोन वहिनी. " तसा विवेक लाजला जरासा. " अबे .... लाजतोस काय .... आनी तिची काही चुकी नवती हे नंतर कलल मला ... मी पन sorry बोललो तिला .... आता तू पन बोल तिला... " विवेक गप्प ," तिला sorry बोल ... नायतर मारीन असा... " राकेश म्हणाला आणि गुपचूप बसलेल्या संकेतच्या पाठीत धपाटा मारला,"कुत्र्या .... तुला काय मीच भेटतो काय.... कशाला मारलास ... " ," साल्या .... तुमाला पन माहित होतं ना ... याचा लफड .... मला सांगितलं नाय म्हणून मारलं ... " ," हो रे ... तिला sorry बोलला पाहिजे मी ." विवेक राकेशला बोलला. मधली सुट्टी झाली तशी सगळी मुल डब्बा खाऊन मैदानावर खेळायला पळली. मुली वर्गातच बसून गप्पा मारत होत्या. विवेकला सईला वर्गाबाहेर बोलावयाचे होते पण तिचं लक्षच नव्हतं. " तुम्ही व्हा पुढे ... मी येतो नंतर ... माझं काम आहे जरा... ","चला रे ... भावोजींना …. वहिनींना काहीतरी सांगायचे आहे." असे म्हणत विशालने विवेकला चिडवलं आणि सगळे मैदानावर गेले. विवेकने सईला खुण करूनच बाहेर बोलावले तशी ती वर्गाबाहेर आली ," Sorry... माझं चुकलं... मला असं नाही वागायला पाहिजे होतं." , " नाही रे... थोडं माझं पण चुकलं.. मी जर बोलले असते तर एव्हढं सगळ झालं नसतं.... Sorry ." दोघांनी एकमेकांना Sorry म्हटलं. आणि तसेच उभे राहिले... मग सईनेच हात पुढे केला... " आपण चांगले मित्र होऊ शकतो ना " त्यानेही हात पुढे करून मैत्री केली तिच्याबरोबर.  


         दुसऱ्या दिवशी , विवेक नेहमीच्या वेळेला घरातून निघाला, " ७.०५" ला पोहोचला त्या जागी... आज त्याला तिथे थांबावस वाटलं.... सगळ तर पुन्हा नेहमी सारखंच झालं होतं ना... सई सुद्धा त्याचं वेळेस त्या गल्लीतून बाहेर पडली. विवेकच्या बुटांची लेस " उगाचच " सुटली. ... ती बांधण्यासाठी तो खाली वाकला," सई पुढे गेली असेल आता" असा विचार करून तो पुन्हा उभा राहिला तर सई समोरच उभी. तो जरासा सैरभैर झाला. सईला जरासं हसायलाच आलं. " आता असं काही खोट नाटक करायची गरज नाही. मला सगळ माहित आहे. " ते ऐकून विवेकला सुद्धा हसायला आलं. " चल .. निघूया का ? , नाहीतर शाळेत जायला उशीर होईल."तसे ते चालत चालत निघाले. त्याला आता कसलीच भीती नव्हती. त्याला जुनं सगळ परत भेटलं होतं. वर्ग सुरु झाले. पुन्हा तीच मजामस्ती वर्गात. पुन्हा तेच मैदानावर जाऊन खेळणं सुरु झालं. सगळीकडे आनंदी आनंद. शाळेतला शेवटचा तास सुरु झाला " मराठीचा " . मराठीच्या बाई खूप चांगल्या होत्या. शाळेतल्या सगळ्या मुलांना त्या आवडीच्या होत्या. " चला ... आज मी " मराठी निबंध" या विषयावर बोलणार आहे . गेल्या परीक्षेला कोणीच चांगले लिहिले नव्हते म्हणून आज जरा practice करूया हा... " , " या बाई बोलायला लागल्या कि एकदम माझी आई बोलते अस वाटते रे ," राकेश नितीनला म्हणाला." आज शाळा या विषयावर बोलूया. प्रत्येक मुलाने काहीना काही बोलायचे. चला सुरुवात करा. " आणि एकेका मुलाने बोलायला सुरुवात केली. विवेकच लक्ष दुसरीकडेच होतं. तो विचार करत होता," सगळ कस पहिल्या सारखं झालं . राकेश पुन्हा मस्करी करायला लागला आहे, ग्रुप एकत्र झालेला आहे , बंड्या तुरुंगात आहे , तो काही आता शाळेत येत नाही पुन्हा, सुरेश सर ला शाळेतून काढलं आहे आणि सई बरोबर चांगली मैत्री झाली आहे , अजून काय पाहिजे मला." बाईचं लक्ष विवेककडे गेलं ," विवेक बाळा... कुठे लक्ष आहे तुमचं , " तसा विवेक हसला. " चल ... आता तू सांग शाळेबद्दल काहीतरी.... " ..... विवेक उभा राहिला बोलायला ... खूप विचार करून त्याने बोलायला सुरुवात केली. ," शाळा .... म्हणजे फक्त एक दगड-मातीची वास्तू नसते. त्यात दडलेलं असते प्रेम... चार भिंती तर घराला सुद्धा असतात, पण तिथे रागीट वाटणारे ,आतून प्रेमळ असणारे सर नसतात, घरापासून लांब असलो तरी आईची आठवण येऊ न देणाऱ्या बाई नसतात , लवकर येऊन वहीतला अभ्यास न समजला तरी लिहून घेणारे, पाठीवर शाबासकी देण्याऐवजी डोक्यावर टपली मारणारे, चूक झाली तर हक्काने दम देणारे, स्वतःपेक्षा मित्राचं पोट भराव म्हणून डब्बा घेऊन येणारे आणि भांडण झाली तरी जिवाला जीव देणारे मित्र नसतात, ........... खोडकर फुलपाखरांच एक छोट जग, त्यात असतात सुंदर अशी आठवणीची फुल. त्यातील गोड मध चाखत चाखत हे जीवन पुढे जात असते,ते कधीच संपू नये असे वाटते. असंच एक ठिकाण असत, जिथे आमच्या सारखी मुल बाईच्या शांत अश्या सावलीत मोठी होतात.... हे एक मित्रांच्या , त्या दिवसांच्या कडू - गोड आठवणीनी वसलेलं एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावाला " शाळा " हे नाव असतं." विवेकने आपलं बोलणं संपवलं तसा वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळी मुल-मुली मनापासून टाळ्या वाजवत होते. बाईंच्या डोळ्यात तर पाणी आलं. बाईंनी डोळे पुसत सगळ्यांना " शांत राहा " अस सांगितले. " खरंच .... खूप सुंदर वर्णन केलस तू.... अगदी मनातलं बोललास तू... आणखी एक .... एव्हढ्या छान निबंधाला एक छान नावही असलं पाहिजे... तूच सांग एखादं " , विवेकने त्याच्या मित्रांकडे बघितलं. सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते..... सईकडे पाहिलं .... तीही खूप छान हसत होती ... त्याने पुढे येऊन बाईंच्या हातातला खडू घेतला आणि त्याने फळ्यावर लिहिलं ,......... " कधीही न विसरता येणारे ..... " सोनेरी दिवस "


Rate this content
Log in