सिंधुताई सपकाळ...!!
सिंधुताई सपकाळ...!!
सिंधुताई सपकाळ हे नाव ऐकल्यावर आपल्या सर्वांच्या मनात येते ती , एक लुगडे नेसलेली वयस्कर बाई , चेहऱ्यावर छान स हसू , डोळ्यात प्रेमळ आभाळाइतकी माया .
त्यांना आपण खुप नावाने ओळखतो ,जसे आनाथांच्या आई , माय , माऊली . आयुष्य जगताना , वाटेवर काटे असो किवा मार्ग खडतर असो , जीवाची पर्वा न करता , काटे हे जणू त्यांच्या स्वागतासाठी रचलेले आहेत असे समजून त्या वाटेवर चालणाऱ्या त्या माई.
आई म्हंटल्यावर आपल्या समोर येते ती लेकरांचा सांभाळ करणारी माता . ते म्हणतात ना आई शिवाय जग नाही ,स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी , मग तो कोणीही असो लहान , मोठा , महान श्रीमंत ,की त्याच्याजवळ सर्व गोष्टी असो पण तो आईविना भिकरीच .
आईची माया ज्याला मिळाली तो सर्वांत सुखी.पण जगामध्ये असेपण माणसे आहेत की त्यांना आईच प्रेम मिळालं नाही.
आता आपल्या सर्वांचीच गोष्ट घ्या ,जेव्हा आपण घरी येतो ,तेव्हा पहिली हाक आपली ती आई असते , आई कुठे गेली , कधी येणार ? काम तर काहीच नसत पण घरी आल्यावर पहिल्यांदा आईला हाक मारल्याशिवा य करमत नाही . जेव्हा आपल्याला जखम होते कीवा ठेच लागते , आपल्या तोंडून पाहिले वाक्य निघत ते "आई". ते म्हणतात ना आई म्हणजे दुधावरची साय . आपल्या आयुष्यात तील पहिली गुरु म्हणजे आई , आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेरणा देणारी व्यक्ती ही आपली आईच.
