सिंधुताई सपकाळ..!! ( भाग दोन)
सिंधुताई सपकाळ..!! ( भाग दोन)
तर ही कहाणी आहे आश्याच एका आईची. प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावे असे व्यक्तिमत्व , त्यांनी आपले पूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेमध्ये घालवले .
खरे तर आजच्या प्रत्येक अबला स्त्रीला त्यांचे विचार आत्मसात करायची गरज आहे , अश्या स्त्रियांना माई कडून प्रेरणा घ्यायची गरज आहे तरच ते भक्कमपणे जीवनातील सर्व समस्यांना सामोरे जातील. खरे तर आजच्या स्त्रियांना अश्या वाघिणीच्या विचारांची आवश्यकता आहे ,तरच ते स्वाभिमानाने आयुष्य जगतील . अश्या या वघिनिविषयी थोडंसं सांगण्याचा हा प्रयत्न........
या माईंची ओळख झाली ती , जेव्हा मी डिप्लोमा चे शिक्षण घेत होतो. ती भेट होती अप्रत्यक्षपणे .
आजकाल रस्त्याच्या कडेला , मंदिराच्या बाहेर किव्वा रस्त्यावर भिक मागताना माणसे पाहतो , पण त्यात छोट्या मुलांची संख्या जास्त असते , ज्या वयात यांनी खेळावं , शाळेत जावे त्या वयात त्यांना पोटाची भूक भागवण्यासाठी हात पसरावे लागते , एक तर त्यांची परिस्थिती तशी असते किव्वा ती मुले अनाथ असतात , ज्यांचा कोणी वाली नसतो.
भटकलेली , विस्कटलेली त्यांची अवस्था. अगदी मन हेलावून टाकणारे दृश्य, हे असे असते जीवन आई वडीलांविणा. यांची कोणाला किंमत नसते , वेळ नसतो , मदत तर सर्वांनाच करू वाटते पण ते फक्त मनातच , प्रत्यक्षात कोणी करत नाही , आपण फक्त पाहतो , थोडंसं sympathy दाखवतो अन थोड्याच वेळाने विसरतो . असे खूपच कमी लोक आहेत जे की विचार करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करतात . त्या मुलांचे आयुष्य म्हणजे नर्कातल्या वेदना , खायला अन्न नाही , अंग झाकायला कपडे नाहीत , उन असो वा पाऊस सर्व काळात एकसमान परिस्थिती. काही लोकं बघ्याची भूमिका घेतात , तर काही त्यांच्यासाठी करतात , याला अपवाद होत्या त्या आपल्या लाडक्या माई. ज्यांनी ही परिस्थिती ओळखून स्वतः हजारो अनाथांच्या माऊली झाल्या. त्या मुलांना ओळख दिली ,वाली दिला ,दिशा दिली त्या आमच्या माईनी......
तेव्हा मी डिप्लोमा चे शिक्षण घेत होतो , ही गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची .मी अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षी होतो ,आमचे सर्व काही मजेत चालू होते ,आता कॉलेज लाईफ म्हंटल्यावर काही सांगायलाच नको , तरुण तरुणीनी गजबजलेले कॉलेज कॅम्पस , मित्रांचे कट्टे , कॉलेज कॅन्टीन.
लेक्चर सुरु झालेले , आम्ही सर्व क्लास मधे गेलो , तेव्हा पहिल्यांदा क्लास पूर्ण भरलेले , आम्हाला पण शॉक बसला .
कारण त्या दिवशी दुसऱ्या कॉलेजच्या मुली प्रेझेंटेशन साठी येणार होत्या . शेवटी मेकॅनिकल ची पोर, काय करणार , त्यांची पण चुकी नाही . आमची शाखाच अशी की त्या शाखेला एकतर फुलच नसतात किव्वा थोडीफार नशीब चांगले असेल तर मग एखाद...पण तेही कुठे तरी engage असत.....यांना त्यांच्या क्लास मधील नको तर दुसऱ्या शाखेच्या मुलांमधे रस .... मेकॅनिकल ची पोरं बिचारी workshop मधे काम करून करून त्यांचं रस गेलेले असत ....
क्लास सुरू झाले , एकानंतर एक लेक्चर होत होते , कॉलेज सुटायला २ तास शिल्लक , तेवढ्यात कॉलेजचे शिपाई आले त्यांनी सर्वांना सूचना केली की सर्वजण सेमिनार हॉल मधे जमा व्हायचं य . त्यांनी कारण काही सांगितलेले नव्हते , काय माहित कदाचित त्यांना पण याविषयी माहिती नसेल , आम्ही सर्वांनी होकारार्थी मान हलवली . दुपारची वेळ होती , २ च्या आसपास . आम्ही सर्वांनी बॅग भरली अन् सेमिनार हॉल कडे निघालो , आता कॉलेज ची पोरं काही न करता नीट तर ते जाऊ शकत नाहीत , पण आमचे principal हुशार त्यांना माहिती होत , म्हणून ते आमच्याबरोर च निघाले , आता काय बॉस सोबत असल्यावर काय करणार......शांतपणे आम्ही हॉल मधे पोहोचलो ....पण आम्ही या विचारात की शेवटच्या वेळेला काय असेल ...आम्ही आपापल्या जागेवर जाऊन बसलो , तिथे कोणतेही टीचर नव्हते , मग काय आमचं सुरू...ते असते ना वासरला कुंपण नसेल तर ते कसे गोंधळ घालते, अचानक सरांचा एक घोळका तिथे आला , मागेच प्राचार्य अन् उपप्राचार्य होते....मग सर्वजण शांत , एकवेलेस सर लोक असतील तर ठीक पण प्राचार्य म्हंटल्यावर गप्पच..शेवटी दरारा असतो त्यांचा...आम्हीच काय सर्व सर पण घाबरायचे.
शेवटी आपल्या सर्वांची दोर त्यांच्या हातात असते ना..
मग सर बोलत होते ,कोणत्यातरी संस्थेवरुन एक व्यक्ती आलेले आहेत ,ते जे सांगतात ते शांतपणे ऐकून घ्या..
सरांनी त्यांना बोलावलं , आमच्या सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या , आम्हाला उत्सुकता लागलेली , मग ती व्यक्ती येताच आम्ही टाळ्या वाजवून स्वागत केलं..............
