साईराज जे कातोरे

Children Stories Others

3.9  

साईराज जे कातोरे

Children Stories Others

शूरवीर

शूरवीर

2 mins
1.0K


आकाश शहरात राहणारा अतिशय हुशार मुलगा. आपल्या आईवडिलांचा एकुलता एक. रोज दैनंदिन जीवनात त्याचा शाळा,क्लाससेस व आईवडिलांची कामे ह्या गोष्टी समाविष्ट होत्या. त्याचे आजी बाबा गावाकडे राहत होते. आई वडील नोकरी करत असल्याने त्याला फार वेळ देऊ शकत नव्हते, म्हणून तो आपल्या पप्पी बरोबर पक्षी, प्राणी ह्याचे निरीक्षण करत व खेळत असे.

     आकाश ला प्राण्यांची, पक्षाची विशेष आवड होती. सुट्ट्यामध्ये त्याला आजी बाबा कडे जायला आवडत असे. तो नेहमी सुट्ट्याची वाट पहात असे. गावाकडे त्याचा मित्र कबीर नेहमी त्याची वाट पहात असे. ती 2 दोघे पाण्यात पोहणे, झाडावर चढणे, आंबे, कैऱ्या, जांभूळ तोडणे खाणे आणि पक्षाबरोबर आवाज काढणे, असे खेळ खेळत असे.

     ह्या वेळेस आकाश गावात आला पण गावतील सर्वांना भयभीत पाहून संभ्रमात पडला. त्याने कबीर ला ह्या विषयी विचारले, त्याने सांगितले की गावात लहान मुलांना कोणीतरी पकडून नेत आहे. त्या दोघांनी ठरविले की हया गोष्टीचा छडा लावायचा, त्यांनी एक योजना तयार केली, त्यात अजुबाजूचा मुलांनाही सामील करून घेतले. सर्वजण अंधार पडेपर्यंत नदीकाठी खेळत बसले, तेवढ्यात तिथे एक काळे कपडे परिधान केलेला, केस वाढलेला, लाल डोळे, अतिशय उग्र व निष्ठहूर असलेला, एक माणूस आला त्याने सर्व मुलांना मिठाई वाटायला सुरुवात केली, सर्व मुले आनंदाने, चवीने ती मिठाई खाऊ लागली, पण आकाश व कबीर संशय आला. त्यांनी ती मिठाई न खाता फक्त खाण्याचे नाटक केले.

   नंतर सर्व मुले चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्याने व त्याचा साथीदाराने मुलांना गाडीत घालून जंगलात आणले. तिथे खूप लोक होती, जी मुलांना पकडून त्यांचा अवयवाची विक्री करत होती. त्यांना मानवी तस्कर असे म्हणतात. तिथे बरीच मुले होती, जी खूप घाबरलेली होती. त्या मुलांची अतिशय वाईट अवस्था केलेली होती, अघोरी बाबा मुळे त्या जंगलात कुणीही येत नव्हते. आकाशने येताना आज्जी चा मोबाईल आणला होता, रात्र होताच त्याने हळूच फोन काढला व बाबांना फोन लावला, मुले भेटत नसल्याने सर्वजण पोलीस ठाण्यात आले होते, त्याने बाबांना व पोलिसांना सर्व सांगितले व लवकर या असे सांगितले पोलीस व गावकरी लगेच निघाले, त्यांनी लवकरात लवकर येऊन त्या सर्व गुन्हेगारांना अटक केली, गावकऱ्यांनी आकाश व कबीर चे कौतुक करून त्यांचा सत्कार केला,कारण त्याच्यामुळे गावावरचे संकट टळले होते शूरवीर आकाश व कबीर पुन्हा सज्ज झाले आपल्या नवीन धाडसासाठी.


Rate this content
Log in

More marathi story from साईराज जे कातोरे