साईराज जे कातोरे

Others

0.6  

साईराज जे कातोरे

Others

मित्रप्रेम

मित्रप्रेम

2 mins
513


दीपक गावात राहणारा अतिशय हुशार व तलक बुद्धीचा मुलगा होता, दीपक चे गाव अतिशय सुंदर व हिरवाई ने नटलेले होते. दीपक आपल्या आज्जी,बाबा, आई ,वडील ,काका ,काकू बरोबर शेतात राहत असे .त्याचा शेताला लागून जंगल चालू होते असे. त्या जंगलात विविध प्रकारचे प्राणी सुखाने व आनंदाने राहत असे. दीपक व त्याचे मित्र नेहमी जंगलातील झाडावर उड्या मारत वेगवेगळे, फळे चाखत, प्राण्याचे आवाज काढत प्राण्यांविषयी त्याचा मनात अपार प्रेम होते. त्याचा आज्जी ने त्याला राम कृष्ण, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप ,यांचा पराक्रमाचा गोष्टी सांगितल्या. होत्या त्यामुळे त्याला पराक्रम याचे खूप आकर्षण होते त्यांचा जंगलात अतिशय वेगवेगळे प्राणी असतानाही त्याला तत्यांची कधीच भीती वाटत नसे .उलट त्यात एक हत्ती होता त्याचा बरोबर दीपक ची मैत्री झाली होती. त्यांची मैत्री अतिशय जिव्हाळ्याची होती. दीपक व त्याचा मित्रांनी त्याला एक नाव दिलेले होते गजानन. आजी तर त्याला गणपती म्हणायची व त्याची पूजा करायची हे बघून दिपू ला खूप गम्मत वाटायची सुट्ट्यांमध्ये दिपू व गजानन दिवस भर तळ्याकाठी जाऊन मस्ती करायचे, पाण्यात पोहाईचे झाडावरून फळे तोडून खायचे सर्व कसे छान चालू होते. एक दिवस शहरातील काही माणसे अली आणि त्यांनी ठरविले की जंगल तोडून मोठे असे रिसॉर्ट तयार करायचे. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्व जण जंगलातील प्राण्यांसाठी हळहळ व्यक्त करत होते. प्राण्यांना जमा करून त्यांना सर्वाना एका प्राणी संग्रलायत ठेवायचे ठरले, दीपक ला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने निश्चय केला की काहीही झाले तरी त्याचा प्रिय गजानन ला येथून जाऊ दाईचे नाही. त्याने सर्व गावकर्यांना व मित्रांना एकत्र केले ,एक योजना तयार केली त्यामुळे सर्व जंगल व प्राणी वाचणार होते. सगळे जण कामाला लागले सकाळ होताच सर्व जण एक एक झाडाला पकडून बसले त्यामुळे रिसॉर्ट वाल्याना झाडे तोडता येणार नव्हती. गजानन पण रात्र दिवस दीपक बरोबर तिथेच थांबला, आपल्या मित्राची धडपड तो मुख पणे पाहत होता, वृत्तपत्र बातम्या या सर्वामध्ये रोज त्यांचा गावाची चर्चा होत असे .तीस दिवसानंतर सरकार ने त्यांचा निर्णय मागे घेतला आणि रिसॉर्ट प्रकल्प बंद केला, दिपू चा व गावकऱ्यांनचा विजय झाला. दीपक ने फक्त त्याचे मित्राला नाही तर निसर्गला ही वाचविले होते, लोकांनी दीपक चे कौतुक केले गजानन ने ही दिपू वर फुलांचा वर्षाव केला व आपला आनंद साजरा केला.

तात्पर्य - मैत्री जीवापाड जपायला हवी.


Rate this content
Log in

More marathi story from साईराज जे कातोरे