शुभारंभ
शुभारंभ
लहानपणी घरचे रोजनिशी लिही म्हणायचे म्हणून तू आयुष्यात आली. जेव्हा आपल्याकडे काही नसते ना तेव्हा तुझी सोबत खूप छान वाटते पण आयुष्यात हव्या त्या गोष्टी मिळाल्या की तुझी आठवण येतच नाही. असो..
तिसरे महायुध्द की काय म्हणून 'कोरोना' नावाच्या विषाणूने पूर्ण जगात थैमान घातले. ज्या दिवसापासून बातम्या येऊ लागल्या त्या दिवसापासून मनात भीती आली कारण हा रोग भारतात नव्हता पण आला तर काय होईल म्हणून... पण दुर्दैवाने भारतात कोरोना आपली प्रचिती द्यायला आलाच. २५ तारखेपासून आपल्या पंतप्रधानांनी
लॉकडाऊन सांगितले. म्हणजे त्या दिवसापासून सगळे बंद.. दुकान, वाहतूक, बँका, अगदी सगळे.. मी माझ्या फ्लॅटवर काही मैत्रिणींसोबत राहत असताना अचानक सगळ्या घरी गेल्या. मी ऑफिसच्या निर्णयासाठी कुठे गेली नाही. पण लॉकडाऊनमुळे मी सुद्धा ताईकडे आले. प्रश्न होता २१ दिवसांचा... मिळालेल्या मोकळ
्या वेळेचा... ऑफिसचे ९ तास तर करायचं काम पण उरलेला वेळ नको फक्त आराम..
मनाशी निर्णय पक्का केला. जो वेळ मिळाला आहे त्यात ज्या गोष्टी, जे छंद जोपासत जायचे. सकाळी उठून एक नवीन भाषा शिकायला सुरुवात केली. ती शिकताना गमतीजमती होतात. कधीकधी मी समोरच्याशी मराठीऐवजी त्या भाषेत बोलते आणि तारांबळ उडते. पुढचं शिक्षण घेण्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षा त्याचीसुद्धा सुरुवात केली.
रोज व्यायाम करणे आवश्यक आहे म्हणून १-२ तास व्यायाम करायला सुरुवात केली. ताईचे कुटुंब खूप छान आहे. तिच्या लहान मुलाला गप्पाटप्पा आवडतात. मग तो आणि मी मिळून गप्पागोष्टी करतो. ते निरागस भाव, आनंदी वातावरण, तो हसरा चेहरा बघताना बालपणात निघून जाते...
एक वेगळा अनुभव घेताना घरी कधी जाऊ ह्याची कमी जाणवते. पण हो जिथे आहोत तिथे ना पैसे ना जास्तीचे खर्च करून जगण्यात मज्जा येतेय...