The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Manisha Kasar

Others

3  

Manisha Kasar

Others

लहानग्याची मज्जा

लहानग्याची मज्जा

1 min
332


प्रिय रोजनिशी,

किती छान संध्याकाळ आहे.. पक्षी घरी जातंय..पण आपण मात्र आपल्या घरी आहोत.. त्या पक्षांना आई जवळ जाताना आनंद होतोय आणि आपल्याला घरी बसून उदास वाटते आहे.

असो...आज एक प्रसंग घडला. सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यंत काम केल्यानंतर एक वामकुक्षी होऊन जावी म्हणून झोपायला लागले... तितक्यात अथांश माझ्या जवळ आला.

तो मस्ती करताना एक वेगळा आनंद होतो. म्हणतात ना लहान मुले आनंद असतात. त्यांची एक एक कृती आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणते. तो मस्ती करता करता माझ्या प्रश्नांची छान उत्तर देत होता.तो घोडा घोडा खेळत होता. आणि अचानक तो पलंगावरून पडला.माझ्या काळजाचा थरकाप उडाला.पण मी त्याला पकडले आणि तो पडता पडता वाचला.

एक त्याची ती कृती धाडस करणारी होती.पण ह्यातून एक कळाले की लहान मुलाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना वेळ देणे आवश्यक असते. त्यांचा सांभाळ करणे गरजेचे असते.

आज मी अभ्यास केला नाही.घरच्यांसोबत वेळ मिळाला. मी डोसा बनवला सगळ्यांसाठी एक नवीन प्रयोग...

सध्या गॅलरी मध्ये एक चहा पिताना माझ्या आयुष्याचा महत्वाचा निर्णयांचा विचार करतेय...

सोबत जेव्हा रेडिओ स्टेशन वर माझे आवडते गाणे लागले आहे... ह्यासारखे दुसरे सुख नाही...

आजची संध्याकाळ खूप उत्तम आहे...

जिवनात कोरोना मुळे स्वतः ला वेळ देणे नक्की जमत आहे...


Rate this content
Log in