Govind Gorde

Others

3  

Govind Gorde

Others

शब्दाने जो धनवान तोच खरा प्रतिभावान

शब्दाने जो धनवान तोच खरा प्रतिभावान

1 min
253


एका गुरुकुल आश्रमात एक गुरू आपल्या काही शिष्यांना विद्यादान देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्य करत असे त्यांना नवनवीन गोष्टी शिकवत त्यांना शिकवलेल्या गोष्टी कीती अवगत झाल्या आहेत याचे देखिल ते परीक्षण करत असत एके दिवशी दुसऱ्या आश्रमातील एक गुरू येतात आणि म्हणतात की राजाला अशा शिष्याची गरज आहे की तो हुशार आणि प्रतिभावंत असला पाहिजे. त्यावर त्या आश्रमातील गुरू म्हणतात माझे सर्व शिष्य प्रतिभावंत आहेत. तुम्हीच निवड करा एकाची मग त्या शिष्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला. परीक्षेत चार शिष्यांची निवड झाली आणि त्यांना सर्वांना एक प्रश्न विचारण्यात आला की ज्ञान म्हणजे काय? त्यावर पहिला शिष्य म्हणाला जे आपण काहीतरी शिकतो ते म्हणजे ज्ञान दुसरा शिष्य म्हणाला जे आपल्याला गुरू शिकवतात ते म्हणजे ज्ञान होय तिसरा शिष्य म्हणाला जे काही आपण अनुभवतो आणि तसे आपण वागतो ते म्हणजे ज्ञान आणि शेवटी चौथा क्रमांकाचा शिष्य उत्तर देतो, ज्ञान म्हणजे आपण आपल्या आचरणातुन ज्या माध्यमातून अंधारमय जीवनात प्रकाश घडवून आणतो आणि आपल्या आयुष्याबरोबर इतरांच्या आयुष्यातील प्रवास सुखकर करतो ते माध्यम म्हणजे ज्ञान होय. हे उत्तर एकूण त्या शिष्याची निवड करण्यात आली आणि त्या गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले की शब्दाने जो धनवान आहे तोच खरा प्रतिभावान म्हणून त्या शिष्याची निवड करण्यात आली.


तात्पर्य :- जो व्यक्ती शब्दाने धनवान आहे आणि शब्दाने इतरांच्या मनावर प्रभाव पाडतात ती कधी मागे पडत नसतात ती नेहमी प्रतिभावानच ठरत असतात.



Rate this content
Log in