STORYMIRROR

Govind Gorde

Others

3  

Govind Gorde

Others

आईची माया

आईची माया

2 mins
230

एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होते. त्यामध्ये आई वडील आणि त्यांची दोन मुले असा परिवार होता. आई वडील दोघेही कामासाठी शेतामध्ये जात होते त्यांची दोन्ही मुले शाळेत जात असे एक दिवस मोठ्या मुलाने शाळेमध्ये भांडण केले त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक यांनी आई वडिलांना बोलवून आणण्यासाठी सांगीतले. त्यावेळेस वडीलांनी शाळेमध्ये जाण्यासाठी नकार दिला परंतू आई शाळेत आली व मुख्याध्यापकाच्या केबीनमध्ये येवुन बसली. मुख्याध्यापकांनी तुमचा मुलगा सतत खोडी करतो तुम्ही एवढे कष्ट करता पण याला जराशी देखील जाणीव नाही. तुमचा लहान मुलगा अभ्यासात खुप हुशार आहे. त्याला तुमच्या कष्टाची जाणीव आहे. त्यावेळेस आई म्हणाली आम्ही दोघांनाही सारखंच जीव लावतो परंतू एक असा आणि एक असा आहे. त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही मुले मोठी होतात. लहान मुलगा जास्त शिकल्याने त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाते परंतू मोठ्या मुलाला कमी पगाराची नोकरी मिळते. वडिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दोन्ही मुलांना घराबाहेर काढले. लहान मुलाचा संसार चांगला चालु होता मोठ्या मुलाला मात्र जास्त पगार नसल्याने तो नेहमी वडीलांना न कळता आई कडून गुपचुप पैसे घेत होता आणि आई देखील मायेपोटी त्याला पैसे देत होती. परंतु काही दिवसांनी आई मरण पावते तेव्हा त्याला पैसे मिळणे बंद होते. मग तो संसारासाठी जास्त काम करू लागला. त्याला कळून चुकले की आई होती तोपर्यंत आपण सुखी होतो जास्त शिकलो असतो तर आपल्यालाही कमी कष्ट करावे लागले असते.

तात्पर्य:- जोपर्यंत आई आहे तोपर्यंत ती आपल्याला काहीही कमी पडून देत नाही तीची माया आपल्या जीवनात आनंद निर्माण करते.


Rate this content
Log in