STORYMIRROR

pratikshA Patil

Others Children

3  

pratikshA Patil

Others Children

शाळेची आठवण एक साठवण...

शाळेची आठवण एक साठवण...

4 mins
168

आयुष्यात नवीन गोष्टी शोधण्याच्या प्रयत्नात आपण जुनं किती सहजपणे विसरतो ना! 

आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजवर खूप लिहिले लोकांबद्दल, लोकांच्या मानसिकतेबद्दल,,आज विचार केला स्वतःबद्दल लिहावं. आजपर्यंत सामाजिक मानसिकतेवर लिहिणारी मी आज स्वतःबद्दल किती लिहू शकते हे पाहायचं होतं. आज मुद्दाम मराठीमध्ये लिहित आहे कारण आज ज्यांच्याबद्द्ल लिहिणार आहे तेच माझ्या आयुष्यात एवढे खास आहेत की त्यांच्याबद्दल इंग्रजी भाषेतून लिहिणं म्हणजे त्यांना परकं करणं असं होईल. 

विषय चालू होता स्वतःबद्दल लिहिण्याचा... स्वतःबद्दल लिहायचं झालच तर आधी येते सुरूवात.. ती सुरुवात ज्यामुळे मी आज इथे आहे. आजचा विषय आहे ती बारा वर्षे....., आणि त्या आठवणी! 


१२ वर्षे... बघायला किती मोठा काळ वाटतो ना?! पण त्या वर्षात जगताना कधीच असं वाटलं नाही की ही १२ वर्षे कधी संपणार? उलट आमच्यातील प्रत्येकाला हेच वाटत होतं की ही सुखद वर्षे कधीच संपू नये. अगदी पाटी-पेन्सिल पासून सुरू झालेला प्रवास अखेर दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेवर संपला. अगदी परिपाठापासून सुरू झालेला हा प्रवास अखेर सदिच्छा समारंभावर येऊन संपला. पण खरचं तो प्रवास तिथेच संपला का? एका सदिच्छा समारंभ या शब्दामुळे आपण त्या १२ वर्षातील आठवणी मागे ठेवू शकतो का? 

आजही आठवतात त्या गोड आठवणी, वर्गात पहिलं येऊन सुविचार कोण लिहिणार यासाठी केलेली ती केविलवाणी धडपड, आणि प्रश्न पाठांतर होण्यासाठी मारलेला तो रट्टा! आजही आठवतं,परिपाठ चालू असताना गुपचूप खाल्लेलं ते चाँक्लेट आणि एक रूपयाची भाकरवाडी सुद्धा वाटून जिथे खाल्ला तो शाळेचा कट्टा! प्रश्न पाठांतर नाही झाल्यानंतर अचानक आलेला तो ताप,ती डोकेदुखी आणि मैदानात चला म्हटल्यावर शहारलेला तो उत्साह! कबड्डीचा 'क' देखील माहित नसताना फक्त अभ्यासापासून सुटका व्हावी म्हणून टीममध्ये घेतलेला भाग आणि एंट्री चुकली की सलोनी मॅडमचा तो राग! आजही खूप आठवतो, तो करुणाचा बेंच, आपण केलेला टिफीन शेअर आणि डबा खाऊन झाल्यावर बेंच कोण साफ करणार ह्यासाठी केलेली ती भांडणं! 

आजही आठवतं, रुणालीने डब्यात आणलेला बेसनचा पोळा, सुस्मिताने आणलेल्या बटाट्याच्या काचरया, सलोनीचा देसी ठेचा आणि प्रज्ञा मॅडमची तर रोजची बटाट्याची भाजी! सरांनी प्रश्न लिहिलेल्या वह्या तपासायला सांगितल्यावर सगळ्यांना वाचवण्यासाठी ती केविलवाणी धडपड आणि 'प्रतिक्षा,सरांना आठवण करून नको देऊस' हे प्रत्येकाचे शब्द... तरी लाखो प्रयत्नानंतर सरांनी पकडलेलं ते खोटं आणि सर्वांना मारायला काठी तूच घेऊन यायची अशी सरांनी घातलेली अट! त्या काठीचा मार खायची कधी वेळच नाही आली पण तो मार खाल्ल्यानंतर अभिचा तो रडवेला चेहरा सगळं काही न बोलूनही बोलून जायचा, पाचवीला असताना श्रवण आणि कुणालचे प्रश्न पाठ करून घ्यायची दिलेली ती जबाबदारी आणि 'प्रतिक्षा,बघ हा तू आमच्याकडून प्रश्न पाठ करून नाही घेतलेस तर सर तुलाच ओरडतील' अशी त्यांनी दिलेली ती धमकी! मग कसंही करून त्यांच्याकडून पाठ करुन घेतलेले ते प्रश्न पण नेमक सरांच्या समोर गेल्यावर त्यांचं झालेलं ते त-त-प-प....पवारची ती चित्रे आणि आयुष, श्रीकांतचं ते एक वेगळचं जग, ओमकार,वृषभची तर वेगळीच शैली- 'प्रतिक्षा,शब्दांचे अर्थ लिहून दे ना...' त्यांची तर एक वेगळीच मागणी होती. साक्षीचा तो डाँनवाला रुबाब आणि आकांक्षाची ती भाईवाली दादागिरी! प्राजू सोबत केलेले ते फ्यूचर प्लॅन्स आणि वहीच्या मागच्या पानावरची ती पत्रं! किती गोड आणि सुखद आठवणी आहेत ना!आज त्या आठवणी मनातल्या एका कप्प्यात तुडूंब भरल्या जरी असल्या तरी त्यांचा गोडवा आणि त्या नंतरच समाधान आजही तितकचं आहे. आजही तुमच्यासाठी माझ्या मनात तीच जागा आहे जी गेले १२ वर्षांत होती.

आज सर्वांत जास्त कसली आठवण येत असेल तर ते म्हणजे शाळेची ती खिचडी! घरी खूप वेळा तशी खिचडी बनवण्याचा प्रयत्नदेखील केला पण त्यात आपल्या मैत्रीचा गोडवा कसा टाकू? त्यात आपल्या प्रेमाची सर कशी मिसळू? आपल्या भांडणाचा तो तिखटपणा आणि आपल्या गप्पांचा स्वाद कसा टाकू?सगळ्या गोष्टी किती सहजपणे बदलत गेल्या ना! आता त्या सगळ्या गोष्टी मागे राहिल्या आणि उरल्या त्या फक्त आठवणी... त्या १२ वर्षांनंतरचा हा प्रवास आयुष्यात कधीच नको होता. आजही आपण एकत्र आहोत पण फक्त एकमेकांच्या आठवणींमध्ये! या एका वर्षात काही लोक कायमचे दूर झाले तर काही दूर असूनही आजही आपलेसे वाटतात. काहींनी बोलणं बंद केलं तर काही आजही न चुकता मेसेज करतात. 

शेवटी फक्त एवढंच सांगेन की तो प्रवास जरी संपला असला तरीही त्या आठवणी मात्र नेहमीच मनात राहतील.आज तुम्हा सर्वांना वाटत असेल की प्रतिक्षा बोलत नाही, फोन करत नाही पण याचा अर्थ असा नाही आहे की मी त्या सगळ्या आठवणीच पुसून टाकल्या आहेत. प्रतिक्षा ग्रुपवर बोलत नाही, कोणी मेसेज केला तरी खूप दिवसांनी रिप्लाय देते याचा अर्थ मी तुम्हाला विसरली आहे असा तर होत नाही ना! आयुष्यात एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे शिकली आहे की काळानुसार बदलणं गरजेचं असतं, फक्त याच धडपडीत आहे. ग्रुपवर काही बोलत नाही म्हणजे ग्रुपवरचे मेसेज वाचत नाही असं नाही आहे. आजही रोज सगळे मेसेजेस वाचते. ग्रुपवर तुम्ही पाठवलेलं miss you all, good old days वाले मेसेज बघितल्यावर समजतं की मी एकटीच नाही आहे जी तुमच्या आठवणीत रमलेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की मी त्या गोष्टी बोलून दाखवल्या नाही. आणि मी हे कधी बोलून दाखवलं नाही याचा अर्थ असा नव्हता की माझ्यासाठी या गोष्टींना काहीच किंमत नाही आहे पण आयुष्यात काही गोष्टी,काही आठवणी मागे सोडाव्याच लागतात मग ते आपल्या मनात असो किंवा मनाविरुद्ध! आजकाल तुम्हा कोणालाच भेटत नाही याचा अर्थ असा कधीच नसतो की मी तुम्हाला टाळत आहे फक्त माझ्या आयुष्यातील ते वेळेचं गणित थोडं चुकलं आहे.. आज लोकांसाठी असलेली ती प्रतिक्षा तुम्हाला वेगळी देखील वाटत असेल पण मी पूर्ण प्रयत्न करेन तुमची ती प्रतू बनण्याचा........

खरचं, कासारे मँमची ती mumma's girl आणि तुमची प्रतू तुमच्यासाठी आधीसारखी बनू शकेल का?? 


                                  


Rate this content
Log in