BHARAT CHOUGALE

Others inspirational classics

3  

BHARAT CHOUGALE

Others inspirational classics

सद्गुरूसारखा असता पाठीराखा

सद्गुरूसारखा असता पाठीराखा

3 mins
346


              काल परवाचा प्रसंग.वेळ कशी असते पहा कुणीतरी म्हटलंय ही की वेळ कधी सांगून येत नाही आणि एक दोन न्हवे तर शंभर टक्के खरंदेखील आहे ते.  रविवारचा दिवस होता तो.त्याच्या आधल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री माझा पुतण्या संतोषने जिथं गाडी लावण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी माझी दुचाकी पाडली. वेळ होती रात्री नऊची. त्याच्याकडून त्यावेळी पेट्रोल कॉक बंद करायचा राहून गेला गाडी पडल्यामुळे ओव्हरफ्लो होऊन गाडीत असणारे 200 रुपयचे सर्वच्या सर्व पेट्रोल इंजिन ऑईलमद्धे उतरले. सकाळी नेहमीप्रमाणे पाहतो तर काय गाडी बटन स्टार्ट होईना फक्त ख$र$र असा आवाज येवू लागला.                    

   माझे गाव अत्यंत लहान असलेने गावात साधा टू व्हिलर मेकॅनिकल नाही त्यामुळे गाडीना काही प्रॉब्लेम आल्यास 5 किमी वरील कडगावशिवाय गत्यंतर नाही. मी सायंकाळी 3 वाजता कडगावातील ड्युमीन मेस्त्रीला घेऊन यायचे म्हणून आमच्या गावातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक दिनकर डेळेकर सर यांच्या दुचाकीवरून गेलो.तिथं गेल्यानंतर मेस्त्रींना गाडीचा प्रॉब्लेम सांगितला.त्यावर त्यांनी गाडी इथपर्यंत आणावी लागेल म्हणून सांगितले.मी गावातील रवी चौगले या मुलाच्या गाडीवरून घरी आलो व त्याला म्हणालो,"रवी तुझी हीच गाडी घेऊन आपण माझी गाडी बांधून घेऊन कडगावला जाऊया.त्यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते.त्यावेळी तो मला ,भाऊ मला आता शेतातून पेंडी (जनावरांचा ओला चारा) आणायला जायला पाहिजे असा म्हणाला. (गावातील सर्व आबालवृद्ध मला प्रेमआपुलकीनं *भाऊ*म्हणतात)            

एक काम करा ही माझी गाडी तुमची युनिकॉर्न गाडी चढाला ओढणार नाही तर तुम्ही दुसरी गाडी घ्या.  मी त्याचा हुकूम शिरसावंद्य मानून तीच गाडी घेऊन सुरेश चौगलेच्या घरी गेलो.घरी विचारपूस केली असता तो सकाळीच त्याच्या बहिणीला आणायला शिवडावला गेला असल्याचे समजले.तिथून तसाच माघारी आलो.तोपर्यंत रवी पेंडी आणायला गेला होता.       बरं मी आता कोणाला घेऊन जायचं या विचारात असता मला भूषण दिसला मी त्याला म्हणालो, "बाळा आता काय तू कोठे बाहेर जाणार आहेस का?"            नाही भाऊ का? भूषण उद्गारला       अरे मला माझी बंद पडलेली गाडी बांधुन कडगावला घेऊन जायची आहे.वेळ असला तर येशील का? क्षणाचाही विलंब न लावता भूषण हो म्हणाला.आणी लागलीच आम्ही गाडीला गाडी बांधून कडगावच्या दिशेने जाऊ लागलो.                    मदारीच्या आंब्याजवळील मोठा कॉर्नरही व्यवस्थित पार केला पण त्याच्या थोडं किंचित जाता क्षणी भूषणची गाडी थोडी डचमळली व माझी गाडीदेखील हलली.त्याच क्षणाला माझ्याकडून क्लच केंव्हा सुटला व डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी येऊन धडदिशी कधी पडलो मला समजलं नाही.रस्त्यावर पडता क्षणी फक्त मोठयाने आवाज झाला.व मी जाग्यावर बेशुद्ध पडलो.माझ्या पडण्याचा आवाज एवढा मोठा होता की तो आवाज ऐकून ऊस भांगलतेला ठेवून महिला लगोलग धावून आल्या.गाडी बांधलेली असल्याने पुढच्या गाडीने जवळजवळ पन्नास मीटर फरफटीत नेले. सोबत मागून माझा सद्गुरू माझे गुरुवर्य आदरनीय ए. डी.देसाई सर(कडगाव)यांच्या रुपात भक्ताला वाचविण्यासाठी दत्त म्हणून उभे.सरांना त् कोण पडल ठाऊक नाही.जवळ येऊन पाहतात तर मी!!             

सरांचे फक्त "भरत! बाळा तू" हे तुटक शब्द तेवढेच माझ्या कानावर पडले त्यानंतर मी बेशुद्धावस्थेत!   माझ्या गुरूंनी मला अक्षरशः उचलून घेतले त्यांचा पांढरा शर्ट रक्ताने लाल झालेला! त्या अवस्थेत मला जवळ असणाऱ्या डॉ.भोसले साहेब यांच्या दवाखान्यात घेऊन गेले.जवळजवळ मी अर्धा तास बेशुद्ध होतो.माझे सर घाबरे घुबरे झालेले! मी शुद्धीवर येण्यासाठी देवाकडे मनोमन आळवणी करत होते. मला डॉ. भोसले साहेबानी टाके घातलेले माहीत न्हवते.शेवटचा टाका घालतांना मला जाग आली.डॉ.साहेब मला म्हणाले ,"सर मी जे टाके घालतोय हे दुखतंय का? मी नाही म्हणालो.पण लगेच त्यांनी ओल्या जखमेवर ज्यावेळी हायड्रोजन टाकले त्यावेळी मात्र माझ्या तळपायाची कळ मस्तकात गेली व मी साहेब आता मात्र खूप वेदना होते म्हटल्यावर भोसले साहेबांचा जीव भांड्यात पडला कारण त्यांना हेच हवे होते की मला पूर्ण शुद्ध येणे.त्यावेळी माझी पाठराखण करणारे माझे गुरुवर्य ए. डी.देसाई सर मनोमन हर्षले.बाळा मी घरातून सांगून येतो व फोर व्हीलर घेऊन तुला गावी सोडून येतो.त्या क्षणी माझ्या गुरुवायांचे आभार मानायला माझ्याजवळ शब्द सुद्धा न्हवते. मी सरांना गावातील जमलेल्या मुलांसोबत (सुभाष सर सुधाकर विशाल ) घरी जातो म्हणालो न राहवून अंतकरणातुन thank you शब्द कधी येऊन गेला मला समजले नाही. सर राहू दे बाळा थँक्स कसलं ते माझं कर्तव्य होतं ते मी केलं एवढे म्हणू न आपल्या घराच्या दिशेने गेले.सद्गुरू करो असे कर्तव्यनिष्ठ माणुसकीने ओतप्रोत भरलेले माझ्या आदरणीय ए. डी. देसाई सरांसारखे शिक्षक जगातील सर्व विद्यार्थ्यांच्या परम भाग्यात असोत. माझ्या हाकेला ओ देऊन आलेला माझा चुलत भाऊ भूषण या सगळ्या प्रकरणात पुरता घाबरला होता.तो माझी गाडी घेऊन दुरुस्तीला टाकण्यासाठी ड्युमीन मेस्त्रीजवळ गेला होता. थोड्या वेळाने भूषण दवाखान्यात आला.सुभाष ढेकळे सर "भाऊ मी गोळ्या घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही गाडीवरून पुढं चला" म्हणाले.डॉ.भोसले साहेबांची फी देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व माझ्या घराच्या दिशेने दुचाकीवरून प्रस्थान केले. भूषण गाडी चालवत होता आणि एकच विचार मनात वारंवार घोळत होता ...सद्गुरूसारखा असता पाठीराखा.......


Rate this content
Log in