Dr. Rajvardhan Deshmukh

Others

3.5  

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

￰राजची राजप्रीती

￰राजची राजप्रीती

4 mins
173


प्रिय रोजनिशी,


नमस्कार महोदय,

मी एक डॉक्टर आहे. आज मी संयोजकाने ठरवून दिल्याप्रमाणे एक प्रेम पत्र लिहीत आहे. सर्वप्रथम असे लिखाण करण्याची संधी दिल्याबद्दल मी संयॊजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी हे प्रेमपत्र दिनांक 2 मेच्या चित्रास अनुसरून माझ्या पत्नीबद्दल लिहीत आहे. माझ्या जीवनात लग्नानंतर पत्नी म्हणजे जणू लक्ष्मीचे खरे रूप चालून आल्याुळे जे बदल घडून आले ते मला इथे सांगावेसे वाटतात.


प्रिय प्रीती,

    स्त्री म्हणजे खरच देवीचे स्वरूप. ती प्रत्येक नाते हे अगदी मनापासून जपत असते. प्रत्येकाला संकटाच्या काळात हिंमत देत असते. अडचणी किती हि असो प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल करून विकास घडवण्याचे काम स्त्री करत असते. अश्याच एका स्त्रीने माझे जीवन बदलवून जो सकारात्मक दृष्टिकोन तयार केला त्याची कहाणी आज मी या पत्रासम लेखात लिहित आहे.

    माझे पदव्युत्तर शिषण पूर्ण होत आले होते. आता वय बरेच झाल्यामुळे आणि शिक्षण पूर्ण होत आल्यामुळे लग्नाचा विषय सगळीकडेच चालू झाला होता. जो तो लग्नाच्या विषयावरून चेष्टा मस्करी करत होता. सोबतच्या बऱ्याच मित्रांची लग्न होत होती.काहीना तर मूलबाळपण झाले होती. मी मात्र उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न करायचे असे ठरवले होते. पण अधून मधून एखादी मुलगी आवडली तर स्वप्न रंगवण्याचे काम चालूच होते. घरच्यांनाही अधूनमधून कुठ्ल्यातरी स्थळाची माहिती येत असायची . पण परीक्षा झाल्याशिवाय योग येणार नव्हाता.

    बघता बघता दिवस निघून गेले आणि परीक्षाही संपल्या . पदवीउत्तर परीक्षाचा निकालही चांगला आला आणि चांगल्या ठिकाणी नोकरीस रुजू झालो . आता मात्र आयुष्यतला मोठा निर्णय घ्याचा होता. मनात प्रचंड चलबिचल चालू झाली होती . कधी कधी मनात प्रेम विवाहाचा विचारही येऊन जायचा . पण आईवडिलांना न विचारता घेतलेला निर्णय योग्य ठरेल का नाही याची भीती वाट्याची . वरतून आपल्याला आवडलेल्या मुलीला आपण आवडतच असू की नाही याची हि शंका यायची . शेवटी खूप खूप विचार करून ठरवले कि आईवडिलांच्याच आवडीच्या मुलीबरोबर लग्न करायचे .

   मग आता मुलगी बघायला पाहुणे बनून जाण्यायेण्याचा कार्यक्रम सुरु झाला . सुरवातीला गावातली चार शहाणे माणसे घेऊन जायचे ठरत असे. पण नंतर कधी आपल्याकडून नकार तर कधी तिकडून नकार यायचा . यातच नुसता वेळ आणि पैसाही वाया जाऊ लागला. आयुष्याचा जोडीदार निवडने आता तर अधीकच अवघड वाटू लागले.

आता ठरवले कि मुलगी पाहायला फक्त आईवडिलांनाच घेऊन जायचे. त्यांची निवड हीच ईश्वराची इच्छा असे समजायचे आणि कार्य संपन्न करायचे. आणि बघता बघता हा निर्णयच योग्य ठरला.

   एक मुलगी म्हणजेच माझी पत्नी माझ्या आईवडिलांना आणि मला पण आवडली. तिला पाहताच हीच आपल्या आयुष्याची जोडीदार असे वाटले.मग काय दोन्ही कुटुंबाचा होकार आला आणि अग्नीच्या साक्षीने तू माझ्या पदरात पडलीस .

   अगदी जुन्या पद्धतीने लग्न झाल्यामुळे एकमेकाला आपण नाही ओळखू शकलो . यामुळे सुरवातीला काहीवेळा वादही झाला पण नंतर हळू हळू एकमेकाला समजून घेत आपुलकी वाढत गेली. तू सुद्धा एकाच क्षेत्रातील असल्यामुळे मला येणाऱ्या बऱ्याच अडचणी सोडवण्यास तू मला मदत केलीस . कामाच्या ठिकानी कसे वागायचे आणि घरी कसे वागायचे हे तू सांगत समजवून देत गेलीस. जेवणात काय खायचे या पासून ते कपडे कसले घालायाचे सर्व पुन्हा नव्याने शिकवलेस. नकारात्मक चीड आणणाऱ्या विषयापासून दूर घेऊन जाऊन सकारात्मक दृष्टिकोन घडवून आणण्यास तू मला खूप मदत केलीस. दोन कुटुंब आणि माणसे जोडण्याचे काम तू केलेस. सर्व घराला नव्याने घरपण दिलेस. एखादया गोष्टीवरून जर वाद निर्माण झाला तर गैरसमज दूर करून सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम तू केले. अशीच संपूर्ण आयुष्यभर तुझी साथ मला मिळावी अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


तुझे नाव प्रिती आहे तुझ्या नावाबद्दल जे काही वाटले आणि सुचले तेपण इथे एका कवितेच्या स्वरूपात लिहीत आहे .


कवितेचे शीर्षक : काय वर्णावे गुण तुझे प्रिती


हसत खेळत राहणारी चंचल ती प्रिती

नेहमी यशाचे गीत गाणारी ती प्रिती


किलबिलणाऱ्या पक्षाचे गीत तु प्रिती

फुलपाखरू आणि फुलांची प्रीत तु प्रिती


जोडले तिने दोन घर अन नाती  

आनंद प्रगती असे तिच्या सोबती


लहान मोठ्यांना समजून घेइ प्रिती

जिथे जाई तिथे मिसळून जाई प्रिती


आनंद हास्य सोबत घेहून फिरते प्रिती

मुलगी, पत्नी, डॉक्टर शोभून दिसते प्रिती


गुणगाण प्रिती तुझे गाऊ मी किती

दुःखात धीर, जगण्यास हिंमत देती  


काय वर्णावे मी गुण तुझे प्रिती

शब्दच अपुर्ण अन कल्पना संपूनी जाती  



तुझ्याबद्दल जे काही वाटते आणि लग्नानंतरच्या काळात मी जे काही अनुभवले ते मी आणखी  एका कवितेच्या माध्यमातून पण तुला सांगावेसे वाटते . 


कवितेचे शीर्षक आहे !! माझी जीवनाची साथी!!


बालपण संपून तारुण्याची जाणीव झाली 

नकळत तुझी उणीव दिसून आली  


नसूनही सोबत समोर तू दिसे  

अलगद स्पर्शाने करी वेडेपिसे  


भेटण्यास तुझिया जीव आतुर होई  

धुंदीत तुझिया गुणगुणत राही  


क्षणोक्षणी जागोजागी शोधले तुला 

परी का ग उशिरा हेरलेस मला


दैवयोगाने आनंदी सोहळा चालूनी आला  

मंगलमय पावलांनी प्रवेश जीवनी केला 


घेतले सोबती पवित्र सप्तपदीचे फेरे  

जीवन हर्षाने बहरून आले सारे  


आनंदाने थाटलास नवा सुखी संसार

नावाची तु प्रिती भरले प्रेमाने घरदार  


जीवनास माझ्या नवी दिशा दिली

प्रिती अशी तु काय जादू केली  


नटली ग संध्या, बहरली दिन रात्री  

सात जन्माच्या सोबतीची देतसे खात्री  


क्षणभर राग तर क्षणभराचा दुरावा  

रंग जीवनी एकमेकांच्या भरावा  


ईश्वराने बनवली देवरूपी प्रिती

अर्धांगिनी तु माझी जिवनाची साथी


तुझा आणि फक्त तुझाच राज....


Rate this content
Log in

More marathi story from Dr. Rajvardhan Deshmukh