STORYMIRROR

Rohini Gandhewar

Others

3  

Rohini Gandhewar

Others

प्रवासातील आठवण

प्रवासातील आठवण

1 min
95

एकदा काय झाले की आम्ही चौधरी ट्रॅव्हल ने कश्मिर टुर वर असताना, पहेलगाम ला जातांना घोड्यावरून जायचे होते. घोड्यावरून दोन तीन कीलो मिटर प्रवास केल्यानंतर उतरतांना माझी सलवार बसायच्या जागेवरच, अडकून बरीच फाटली. मग काय तात्पुरते स्वेटर कमरे भोवती गुंडाळून घेतले. थंडी तर होतीच. आमच्या सोबत एक नासिक चे क्षीरसागर कुटुंब होते. एकाच डिपार्टमेंट ला असल्याने आमची लवकरच गट्टी जमली होती. सुनंदाताई म्हणाल्या इतकी थंडी असुन स्वेटर का नाही घालत ताई तू! 

सर्व घटना ऐकल्यावर त्यांनी, लगेच मला, त्यांनी स्वतः जीन्स पँट वर, जास्त थंडी म्हणुन घातलेला पलाझो, वॉश रूम मधे जाऊन, मला घालायला दिला. त्यामुळे पुढचा दिवसभराचा माझा प्रवास आनंदात झाला.

  इतके तत्पर प्रसंगावधान आणि त्याग करण्याची वृत्तीचे मिलन, मी प्रथमच अनुभवत होते.

ही त्यांची आठवण आयुष्यभर मी माझ्या ह्रदयात जपेन.

त्यांना धन्यवाद द्यायचे राहिले होते म्हणुन की काय.... सात वर्षांनी म्हणजे मागच्या वर्षी, नोव्हेंबर २०२२, दुबई टुर मधे अचानक त्यांची भेट हॉटेल मधे, नास्ता घेतांना झाली. इतका आनंद झाला म्हणुन सांगू... त्यांना आणि मला सुध्दा! अन् त्यांच्या नासिक गृप मधील मैत्रिणींना पण हा किस्सा मी ऐकवून त्यांचे मनोमन आभार मानले.


Rate this content
Log in