STORYMIRROR

Vaibhavi Kankonkar

Children Stories Romance Tragedy

3  

Vaibhavi Kankonkar

Children Stories Romance Tragedy

परी व राधा (भाग 3)

परी व राधा (भाग 3)

2 mins
185

पण त्या तिघी तोपर्यंत तिथून पळून गेल्या होत्या. मग त्या तिघी श्रीरामपूरीला पोहोचल्या त्या तिघी राजमहाला समोरआल्य द्वारपालाने त्यांना अडवले व येण्याचे काय प्रयोजनआहेअसे विचारणा केली त्यावर त्यांनी सांगितले कीआम्ही राजकुमारांसाठीऔषध घेऊनआलो आहोत. मग त्यांना द्वारपालानेआत सोडले.त्या तीघी आत जातात व राजासमोर ती आपल्या मुलींची व त्या फळांची खुप स्तुती करते व आता राजालाही वाटू लागतं की राजकुमारआता बरा होणार.त्यामुळे राजा स्वतःत्या तिघींना राजकुमारांकडे घेऊन जातो.त्या तिघी राजकुमाराला त्या फळीतील एक फळ खाऊ घालतात व ते खाऊन राजकुमारांची तब्येत अजून बिघडते व ते पाहून राजाला खूप राग येतो आणि राजा त्या तिघींना आजन्म तुरुंगात टाकण्याची शिक्षा देतो.


इथे राधा त्या तिघींची काळजी करत बसली होती एकआठवडा उलटला तरी त्या तिघींचा काहीच पत्ता नव्हता म्हणून ती विचार करते की आता तिलाच बाहेर पडून त्यांचाशोध घ्यावा लागेल.ती मग बाहेरगावी गेलेल्या तीच्या वडिलांसाठी छोटस पत्रात आपण घरातून बाहेर का पडलो आहोत हे लिहून ठेवले.

ती त्या तिघींच्या शोधात बाहेर पडली वाटेत तीला ती परी भेटली परीने तिला पाहताच परीला तिचं भविष्य दिसलं व परीने राधाला मदत करायची ठरवलं व परीने तिला एक औषधाची कुपी दिली व सांगितले कि राजकुमाराला खिरीतून हे औषध दे.

ती काही दिवसात श्रीरामपूरीला पोहोचलो व द्वारपालाने तिला अडवले व तीची चौकशी केली व तीला राजासमोर नेलं गेलं राजाने तिने आणलेले औषध आधी एका माणसावर आजमावून बघितलं नंतर राजकुमारला दिलं व राजकुमाराला खुप छान वाटू लागले व तो बरा झाला. नंतर राजाने तीला काय हव आहे हे विचारताच ती म्हणाली की महाराज माझ्या आई व बहिणींना शोधून काढा मला दुसरं काही नको. नंतर राजा तुरुंगात असलेल्या त्या तिघींना आणायचा आदेश देतो. त्या तिघी समोर आल्यावर राजा राधाला विचारतो हीच आहे का तुझी आई व बहिणी ? त्याना बघून राधाला खूप रडायला आलं व ती राजाकडे विनंती करू लागली की तीच्या आईला व बहिणींना सोडा. राजालाही दया येते व तीच्या आईला व बहिणीस मुक्त करतो. 


राजकुमार राजाला आपलं लग्न राधाशी लावून द्यावे व काही दिवसात राजकुमार व राधाचा लग्न सोहळा पार पडतो व ती सुखाने राहू लागतात. 

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन