STORYMIRROR

Vaibhavi Kankonkar

Children Stories

3  

Vaibhavi Kankonkar

Children Stories

परी आणि राधा भाग 1

परी आणि राधा भाग 1

2 mins
255

सोनपूर नावाचं एक छोटंसं खेडेगाव होते. त्या गावात अनेक कुटुंबे राहतं असत. त्यात रामसिंहसुद्धा आपल्या कुटुंबासमावेत राहत असत.त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी रत्नांबाईं व एक छोटी मुलगी राधा राहतं असत.  ते त्या गावातील इतर कटुंबाप्रमाणे गुण्यागोविंदाने राहत होते. 


एक दिवस रामसिंह काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता व घरी रत्नांबाईं व राधा एकट्याच होत्या. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्या नदीवर कपडे धुवायला गेल्या आज त्यांना जरा उशीर झाला होता. त्यामुळे त्या नदीवर एकट्याच होत्या त्या भरभर कपडे धुवायला लागल्या. राधाच्या काळजीमुळे भरभर चालत होत्या व त्यांचा पाय चुकून तिथे उन खात पडलेल्या विषारी सापावर पडला व त्याने तिला दंश केला व त्यांचा तिथेच तडफडून तडफडून मृत्यू झाला. छोटी राधा बिचारी घरी एकटीच आईच्या आठवणी रडू लागली.  दुपार झाल्यावर नदीवर कोणीच जात नसत म्हणून रत्नांबाईंकडे कोणाचं लक्ष जात नाही नंतर संध्याकाळी गावातील काही मंडळी शेतावरून परतत असताना रत्नांबाई त्यांना नदीकाठी पडलेल्या दिसल्या त्या लोकांनी तिला तिच्या घरी नेले व त्या लोकांनी वैद्यबुवांना बोलावले वैद्यबुवांना सांगितले की त्या सर्पदंशाने मरण पावल्या आहेत. 


  इतक्यात रामसिंहसुद्धा आला व आपल्या बायकोची अशी अवस्था पाहुन त्यांनी हंबरडा फोडला राधाला काहीच समजत नव्हते ती सुध्दा तीच्या बाबांना बिलगून रडू लागली.  असेच काही दिवस गेले रामसिंह राधासाठी स्वतःला सावरलं व पुन्हा कामावर जाऊ लागले. पण राधाची खाण्या-पिण्याची आबाळ होऊ लागली. त्यामुळे ते चिंतीत होते. त्यांनी आपली चिंता त्यांचा एका मित्राला बोलून दाखवली त्यावर त्यांचा मित्राने त्यांना दुसरं लग्न करायचं सुचवले. त्यांनी काही दिवसांनी राधासाठी आपलं दुसरं लग्न केलं. .

त्यांच्या दुसर्या पत्नीचे नाव सुनंदा असे होते. काही दिवस सुनंदा बाईंनी राधाचे लाड केले परंतु तिच्यातील सावत्रपणा जागा झाला.ती सतत राधाचा छळ करू लागली ती स्वतः काही काम करत नसत व राधाला सारी कामे करायला लावत असे व तिला जेवायला उरलं-सुरलेली जेवण देत. रामसिंह काही बोलला तर ती म्हणायची की मुलीची जात आहे सगळी कामं करता यायला हवी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन