परी आणि राधा भाग - २
परी आणि राधा भाग - २
हा हा म्हणता अशीच काही वर्षे निघून गेली. राधा आता मोठी झाली होती व ती खुप सुंदर दिसत होती. तिचे कपडे जरी ठिगळे लावून शिकवलेले असले तरी ते तिचे सौंदर्य अजून वाढवत होते. ती एखाद्या राजकन्येपेक्षाही सुंदर होती. तिचे कमळाप्रमाणे सुंदर डोळे होते, ती हसली की तिचे दात डाळींबाच्या गाण्याप्रमाणे तिच्या नाजूक रेशमी,मुलायम ओठांवर दिसत असत. तिच्या हनुवटीवर असलेला तीळ ती हसल्यावर खुपच खुलून दिसे.
या उलट सुनंदाच्या मुली काहीच काम न करता दिवसभर नट्टा - पट्टा करायच्या. गावभर ह्याचा-त्याच्या घरी जाऊन गप्पा-गोष्टीत वेळ घालवच्या. शेजारच्या राज्यातील राजकुमाराशी लग्नाची स्वप्ने पाहायच्या. त्या नट्टा-पट्टा करुन देखील राधापुढे अवसेचा चंद्रच दिसायच्या.
एक दिवस गावात दवंडी पिटवली गेली कि शेजारच्या गावातील राजा देववर्मा यांचा एकूलता एक मुलगा म्हणजेच श्रीरामपूरीचा राजकुमार सूर्यसेन. हा एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे व राजवैद्यांच्या कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. त्यामुळे राजकुमारांना कुणी निरोगी करू शकला तर राजा देववर्मा शंभर सोन्याच्या मोहरा देतील.
ही अशी दवंडी ऐकून सुनंदाबाई खुप आनंदीत होतात व विचार करू लागतात की जर आपण राजकुमाराचा आजार बरा केला तर शंभर सोन्याच्या मोहरा मिळतीलच परंतु आपल्या मोठ्या मुलीचं लग्नसुद्धा राजकुमाराशी लावून देऊ. ती संध्याकाळी आपल्या मुलीसह गुपचुप एका मांत्रीकाकडे जाते व तो मांत्रीक काहीतरी जादूटोणा करतो व त्या तिघींना सांगतो की श्रीरामपूरीला जाताना एका घोर अरण्यात एक वृद्ध परी राहते.तिचा एक सुंदर फळा-फुलांचा बगीचा आहे त्या बगीच्यातली
फळं खुप गुणकारी आहेत व त्या फळांचे सेवन केल्याने मनुष्याला कुठलाही रोग होत नाही व झाल्यास तो त्वरित बरा होतो.
हे ऐकून सुनंदाबाई व त्यांच्या मुली राधाला आपण राजकुमारासाठी औषध घेऊन जात आहोत व चार दिवसात परत येऊ अस सांगितले. व त्या तिघी त्या वृद्ध परीच्या बंगल्यावर जायला निघाल्या. काही तासांत त्या जंगलात पोहोचल्या व त्या मांत्रीकाने सांगितलेल्या वाटेवरुन खाणाखुणा ओळखत त्या परीच्या बंगल्यावर पोहोचल्या.त्या बंगल्यात आत जाण्यासाठी फाटका जवळ आल्या व त्या भली मोठी सुरक्षा भिंत असलेलं भलं मोठं फाटक उघडलं व समोरचं दृश्य पाहून त्यांचे डोळे पांढरे पडले त्या आ वासून उभ्या राहिल्या परीचा बंगला व बाग अतिशय सुंदर दिसत होती त्या मांत्रीकाने वर्णन केले त्यापेक्षा दसपट सुंदर होती ती जागा व परीचा बंगला.
त्या बागेत सगळ्या प्रकारची फुलझाडे,फळझाडे होती पण ती झाडे अतिसामान्य व खुप निराळी होती. त्या बागेत मोठे मोठे आंबे होते जे झाडाच्या वर नाही तर जमीनीतून येत होते. एक आंबा पंधरा-वीस लोक मिळूनसुद्धा संपवू शकले नव्हते. अश्या प्रकारची अनेक निरनिराळ फळे होती त्या बागेत. त्या तिघी परीच्या बागेतून काही मध्यम आकाराच फळे
एका टोपलीत गोळा करू लागल्या इतक्यात परीसुद्धा बागेत आली व काय करत आहात अस विचारताच त्या तिघी परीशी उद्धट पणे बोलू लागल्या. परीला बोल्यण्यात गुंतवून त्यांनी तेथून पळ काढला.परीला त्यांचा प्रचंड राग आला व त्या तिघींना शाप दिला की "जो कोणी ह्या फळांचे सेवन करणार त्याला खूप त्रास होइल.
