पाऊस आणि बरंच काही
पाऊस आणि बरंच काही
पाऊस आणि माझं नातं,
तसं काही खास नाही,
पाऊस आला की मात्र,
भिजण्याच एक वेगळंच सुख मिळतं,
एवढं मात्र खरं आहे...
पहिला पाऊस आला की ,
पसरतो सर्वत्र गंध मातीचा,
जो जगातल्या महागड्या सेंट,
पेक्षाही उच्च दर्जाचा असतो..
तो महागडा सेंट फक्त कपड्याना
चिकटून बसतो,
पण मातीचा गंध मात्र
विस्कटलेल्या,भटकलेल्या,
विचाराने छिन्नविच्छिन्न झालेल्या तनाला,
तो शांत करत असतो,
असा हा पहिल्या पाऊसाच्या मातीचा गंध...
पाऊस चांगला पडला,
की होते धरती हिरवीगार,
वावरात चिखल तुडवतांना,
पायाला काटा टोचला तरी,
नाही जाणवत त्याची अंगार,
म्हणून हे पावसा,
तुझे खूप खूप आभार...
पावसा तू नीट पडला,
की नाही राहत कसलीच भीती,
जोमाने आमची पीकं बहरती
कास्तकार्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते,
अन आमचे माय बाप ही,
खुशीन शेतात घाम गाळते,
पण तू नाही येत कधी कधी,
की भरते मनात धडकी,
ना काम ना धंदे,
राहावं लागतं त्या पडीक जमिनीसारखं,
तेव्हा जीव होतो आमचा फिरस्ती
प्यायच्या पाण्यासाठी ही,
करतो कोसो दूर भटकंती,
पाणी अडवा पाणी जिरवा,
अशी गुंफण करावं लागतं प्रिती...
राक्षस रूप घेऊन जेव्हा तू ,
सतत ढंगातून सतत पडत असतो,
तेव्हा तुला कुणीतरी दुखावलं का??
हाचं प्रश्न पडतो आमच्या मनीं,
मग मात्र उडते आमची तारांबळ,
येतो नदीला महापूर,
जनजीवन विस्कळीत,
माजतो सर्व बाजूला हाहाकार,
मग आमच्या तोंडून निघते,
हे पावसा तू थांब,
एवढी आमची एकच पुकार...
पावसाच्या या चमत्कारिक रुपावर,
सुचत आम्हां कवींना ओळी
तिला ओलेचिंब पाहतांना,
मन भरून जाई,
असा हा पाऊस आणि अशी तुझी किमया,
तुझ्या प्रत्येकच रुपावर,
फिदा आहे सारी दुनिया...
