नवरात्र
नवरात्र
नवरात्र आलो की सगळीकडे प्रसन्न आणि उत्साहाचे वातावरण तयार होते .प्रत्येक जण आपापल्या देवीची पूजा करतात आणि नवरात्र म्हणजे नऊ दुर्गा देवीचे नऊ रूपांची आराधना करतात.
आमच्या घराण्याची कुलस्वामिनी कुलदैवत जोगेश्वरी देवी आहे. जोगेश्वरी देवीचे स्थान म्हणजे ती वसलेली आहे धुळे जिल्ह्यात थाळनेर गावात. थाळनेर गाव लहान आहे .तिथे शेतकरी राहतात . हे गाव सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आजोळ आहे . जोगेश्वरी देवीची कहाणी किंवा अख्यायिका जी की पूर्वजांनी सांगितलेली आहे. ही देवी पूर्णपणे मूळ रूपातच आहे म्हणजे तिची मूर्ती नाहीये तर तांदळाच आहे. फार पूर्वी म्हणजे पेशवेकाळात एक संस्थानिक राजा होता. ..त्याने या जोगेश्वरी देवीची स्थापना केली तेव्हा त्याने मंदिर बांधायला घेतले आणि सभामंडप बांधला पण त्याच्या स्वप्नात गेली आणि तिने सांगितले की माझे मंदिर बांधू नको. कारण मी जिथे स्थापन झाली आहे. तेथे माझे भक्त शेतकरी आहेत .माझे स्थान शेतात आहे तर त्यांना राहायला झप्पल नाहीये म्हणून मला पण नको. मी त्यांच्यासारखे साधीच राहील नंतर सभामंडप पडून गेला तिथे फक्त एक चौथरा आहे आणि त्यावर एक कडुनिंबाचे झाड आहे ते सावलीसाठी लावलेले आहे .
अगदी छोटेसे मंदिर आहे म्हणजे फक्त देवीच आहे .तिथे आत कोणालाही बसता येत नाही. आजही तसेच आहे .कोणी बांधायचा प्रयत्न केला तर मोठे मंदिर तयार होत नाही .विशेष म्हणजे तिथे पूजा सांगायला कोणीही पुजारी नाही .प्रत्येक जण येऊन आपापली पूजा करतात नेवेद्य सुद्धा दाखवतात .विशेष म्हणजे पूर्वी नैवेद्य म्हणून गूळ खोबरं दाखवत होते. कारण देवी ने सांगितले होते मला जास्त काही नको तुमचा भोळा भाव आणि भक्ती पाहिजे. कारण तिथे राहणारे सर्व साधी माणसं आहेत. चौथऱ्यावर बसायला जागा आहे. देवीच्या जवळ जाण्यासाठी छोटी पाऊलवाट आहे .छोट्या टेकडीवर ती वसलेली आहे .दाट झाडी काट्याकुट्यातून रस्ता आहे .परंतु खूप सुंदर वातावरण आहे. मंदिराच्या मागे पाण्याचा छोटासा प्रवाह आहे .त्या ठिकाणी राहणारी एक बाई शेळ्या चारत असते .तीच रोज देवीच्या मंदिरात रात्री दिवा लावते देवीची सेवा करते मंदिर व बाहेरचा चौथरा झाडते. परत मोबदल्यात तिची काही अपेक्षा नसते आम्ही दरवर्षी जातो .तेव्हा तिची ओटी भरून तिला साडी-चोळी दक्षिणा व प्रसाद देतो .तिला नमस्कार करतो. ती भरभरून आशीर्वाद देते ,तिच्या रूपात देवीच असते .त्या भागात जास्त मनुष्यवस्ती नाही. फक्त दोन शेती आहेत .घरात लग्नकार्य शुभकार्य झाले ही सर्व जण देवीच्या दर्शनाला जातो .तिच्या कृपेचा वरदहस्त सदैव आमच्या घरावर आहे त्यामुळे आमचे कुटुंब अत्यंत सुखी आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे.
