STORYMIRROR

Kusum Patil

Others

2  

Kusum Patil

Others

मनात दडपलेली शांतता आणि नैसर्गिक रहस्य...

मनात दडपलेली शांतता आणि नैसर्गिक रहस्य...

4 mins
140

=================================

सूर या शब्दाने बोलले जाते कोण तू ! भास तू .... शब्द नवा श्वास तू !


   अचानक मनात दडपलेली शांतता जागी झाली , अन् कुठेतरी मनात दडपलेल्या गोष्टींना शांतता मिळू लागली.अन् त्याच शांततेने प्रश्न निर्माण केला तो म्हणजे रसायनशास्त्रांनी गुणधर्म तयार होतो , पण त्या गुणधर्माला काही शास्त्र असते. आणि त्या शास्त्रपद्धतीने सोडवलेल्या गुणधर्माला रसायन शास्त्र म्हणतात.


    या रसायनशास्त्राने माझ्या आयुष्यात अनेक रसायनांचे गुणधर्म बनवले होते. अविश्वासाचा पाया विश्वासात कसा बदलायचा हे पण रसायनशास्त्रांमुळेचं शिकले. त्याच एका गुणधर्मात अविश्वासाची मैत्री विश्वासात कशी बदलायची याची रसायनीक अभिक्रिया घडू लागली. पण त्या अभिक्रियेला नाव काय दयायचे माहित नव्हते....


      "पाहिले तर, रसायनांचे जीवनच खुप अवघड ! " एकाच वेळी त्यात अनेक रसायने एकत्र करून अनेक अवघड अभिक्रिया तयार होतात , आणि त्याच अभिक्रिया पुढे जीवनात कोरोना व्हायरस सारखे दृश्य तयार करते.आणि त्या दृश्याला थांबवता पण येत नाही आणखी सामोरे सुद्धा जाता येत नाही. निर्माण होतात त्या फक्त *समस्या* आणि *मृत्यु* ...

   मग याला जीवन कसे म्हणायचे ............


    मग आठवली ती खिडकी तिच्यातुन बाहेर डोकावताना निर्माण झाला तो माझा श्वास. त्या श्वासाने अनेक प्रश्न रसायनिक अभिक्रिये सारखे निर्माण केले होते. त्या श्वासाच्या सानिध्यात असलेले ते निरागस वृक्ष ! त्याला पाहून माझा श्वास कुठेतरी घुसमटत होता. त्याला मी एक प्रश्न विचारला अरे ते तूच वृक्ष आहेस का ? ज्यामुळे काही महिन्यांन पाठीमागे तुझ्या मंदगार वाऱ्याने श्वास घेत होते. ते वृक्ष म्हणाले, अगं हो मी तेच वृक्ष आहे. आणि तु मला अशी कशी विसरलीस ! मी म्हणाले , अरे तुझ्या त्या फांदया कापल्या गेल्या आहेत ना ! त्यामुळे माझा श्वास कुठेतरी घुसमटत आहे रे ! पण काय ? ते वृक्ष म्हणतं,रसायनांच्या पहिल्या गुणधर्मांमानुसार असं साध्य होत कि फांदया कापल्या मुळे वृक्षांचे सौदर्य वाढते.


      पहिल्या गुणधर्मानुसार हे योग्यच होते. पण वृक्षाला झालेल्या वेदना माझ्या मनाला होतात याच काय ? प्रश्नाचे उत्तर न देता , खिडकी बाहेर एक वेगळीच अभिक्रिया तयार झालेली. अनेक नवीन वायुंनी रसायनशास्त्रांमध्ये भाग घेतला होता. पण त्या रसायनिक अभिक्रिया चुकीच्या येत नव्हत्या. त्या कुठेतरी योग्य होत्या. पण त्या वृक्षांच्या सानिध्यात आल्या होत्या त्यामुळे अनेक अभिक्रियांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता. कुठेतरी हि अभिक्रिया चुकण्याची भीती होती आणि कुठेतरी हिअभिक्रिया आनंद निर्माण करणारी होती. या अभिक्रियेत निर्माण झालेले नवीन घटक म्हणजे *बुध* आणि *शुक्र* ! 


     माझ्या जीवनात बुध वायुने अत्यंत चांगले स्थान निर्माण केले होते पण ते शुक्र ताऱ्याला आवडत नव्हते. तो शुक्र तारा नेहमी त्याच्या विरोधात होता. पण मला काहीच कळत नव्हते. हि अभिक्रिया नेमकी कशी तयार होत आहे. माझी आणि बुध वायूची अभिक्रिया घडत असताना कधी अतिशय आनंद , दुरावा आणि अबोला निर्माण होण्याची उत्तरे मिळत होती. पण तो शुक्रतारा रसायनांना उष्णता दिल्याप्रमाणे एकेक अभिक्रिया मुक्त होत होत्या. संभवता होती ती *जिवलग मैत्रित्वाची !* बिचारा माझा श्वास कुठे अडकला होता यांची रसायनिक अभिक्रियाच तयार होत नव्हती. मग हि अभिक्रिया झालीचं पाहिजे त्यामुळेचं कळणार होते कि माझा श्वास कुठे घुसमटतो आहे.... 


    दुसऱ्या गुणधर्मानुसार असे साध्य केले , जीवन खुप सुंदर आहे आणि सोपे आहे. मग तीचं अभिक्रिया तयार करण्यासाठी तिसरा रसायन घटक निर्माण झाला तो म्हणजे *गुरु* ! आतातर सारेचं काही कळेना झाले होते. त्या तिसऱ्या वायू अगदी स्पष्ट रसायनिक अभिक्रिया केल्या होत्या. रोजचा दिवसेंदिवस अभिक्रिया ह्या फक्त त्यावरच अवलबूंन होत्या. पण त्यातही प्रश्न निर्माण झाला तो माझ्याशी निगडित होता. बुध आणि गुरु हे एकाच गुणधर्माचे होते पण शुक्रतारा हा विलग होता.


     दुसऱ्या गुणधर्माप्रमाणे तिसरा रसायन योग्य होता तो माझ्या जीवनासाठी ! पण काय सतत निर्माण होणाऱ्या गोष्टी याचं उत्तर मात्र त्या निरागस वृक्षाकडे होते, कारण माझा श्वास तिथे अडकला होता.


    पण काय हो , त्या दुसरा गुणधर्म माझ्या जीवनातला एक भागचं बनला होता. त्याच्याशिवाय माझी रोजची रसायनिक अभिक्रियाच निर्माण होत नव्हती. पण मध्ये येत होता तो शुक्रतारा याला माझ्या जिवनातली अंत्यत महत्वाची रसानिक अभिक्रिया निर्माण करायची होती. पण एकीकडे बुध वायुने माझ्यावर राज्य गाजवले होते. अन् बुध हा जिवनाचा राजा बनला होता आणि शुक्रतारा शिपाई ! 


       मला आवडले नाही मी म्हणाले, त्या वृक्षाला अरे माझ्या जीवनात जितकं महत्व तु बुध वायुला दिलेस तितकं महत्व शुक्रताऱ्याला पण दे ! बुध, गुरु, शुक्र ह्या तीन अभिक्रियांचा पण एक गुणधर्म होऊ शकतो. मग तो तु तयार कर ! क्षणाचा विचार न करता त्या वृक्षाने उत्तर दिले. रसायनिक अभिक्रिया होईल पण , तुझ्या जीवनात रसायनिक अभिक्रियेचा व्हायरस तयार होईल आणि तोच व्हायरस, कोरोना सारखा प्रश्न निर्माण करेल...


    आणि या तुझा श्वास घुसमटेल आणि तो व्हायरस तुझा मृत्यु करेल!  शेवटी उत्तरे समोर आलीत आणि निर्माण झालेत ते केवळ प्रश्न !!!! 

    आणि हिच ती मनात दडपलेली शांतता आणि नैसर्गिक रहस्य होते......

==================================


Rate this content
Log in