STORYMIRROR

Kusum Patil

Others

2  

Kusum Patil

Others

गोष्ट ती स्वप्नापलीकडची भाग १

गोष्ट ती स्वप्नापलीकडची भाग १

2 mins
48

    माझा श्वास घुसमटत होता...! मोठं - मोठयाने आवाज आक्रोशाने रडत होता...!! जीवनकाल मोजावा तसा, तो श्वास माझ्या अंतरी येऊन धडधडत्या ठोक्यांना बोलत होता. अन् मी मात्र स्तब्ध होते.जीव एकांतात सोडून, एका अनामिकतेने स्वतःला जणू जखडून टाकले होते.सुन्न पडले, माझ्यासहित आजूबाजूची निसर्गता.. हळुवार झाडांच्या फांद्यांचा आवाज जसा नकळतपणे येऊन छळतो, अगदी तसाच आवाज माझ्या मनात खोलवर रुतून बसला होता., अर्थात शाब्दीक भावनेचा तो आवाज होता..त्या आवाजाला शोधत एका स्वप्नात हरवुन गेले. पण काहीच समजत नव्हते, खरचं ती मी आहे का ? असा दावा मनाला होऊन भिडत होता.भिडणाऱ्या प्रत्येक श्वासात त्या सहवासाची एकरूपता बंद होती.अन् मी मात्र त्या बंदीचा एक तुरूंगवासातल्या गुन्हेगारीत शिक्षा ठोठावल्याप्रमाणे भोगत होते.

   विचार करावा का पुन्हा ? या वाक्याशीही सहमत नव्हते.."मन उन्नाड भटकलेल्या पाखराला, आज विस्तवाचा शोक होता."अनेक अवस्था नव्हे, तर अनेक दृश्याअभावी मी अडकत गेले होते. काहीच समजत नव्हते काय करावं.. डोळे नुसते एकेक थेंब टिपताना लपत होते.का लपत होते माहित नव्हते,आज पुन्हा.! त्याच डोळ्यांना आठवली "गोष्ट ती स्वप्नापलीकडची..."अन् हरवले पुन्हा त्या क्षणात....

    आज आठवला तो दिवस एकेकाळचा.!जिथे कोणीच नव्हते तिथे मी एकटी चालत होते. चालताना अनेक वेळा प्रश्न पडायचा, कधी मी प्रेमात पडले का ? ह्या प्रश्नाला नेहमीच माझं स्मित हास्य कोरलेलं असायचे. अन् बिनधास्त पुढे चालत राहायची....'मन हे बेधुंद.! यावा कोणी राजकुमार अन् सावरून घ्यावे सारे क्षण क्षणात..' या मतलबी ओळींशी मी सतत तुलना करत बसायची. वाटायचे कधी तरी यावा असा प्रियकर अन् गावे गीत अंतरी या रंगी...पण काय ? चित्र अदृश्यात बदलले होते.ते म्हणतात ना.,

  "भेट व्हावी हि कशी

  जरी अनामिक बोल,

  राहिला अपुरा काळ

  तरी अंतरी तो अबोल...!"


Rate this content
Log in