Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Meenakshi Bandre

Children Stories Inspirational


4.0  

Meenakshi Bandre

Children Stories Inspirational


मित्रप्रेम

मित्रप्रेम

1 min 36 1 min 36

संजू एका सुखवस्तू कुटुंबातला मुलगा. रोज शाळेत जाणे, अभ्यास करणे व मित्रांसोबत खेळणे असा छान त्याचा नित्यक्रम चालला होता. अचानक 'कोरोना' या रोगाने थैमान घातले, सगळंच बंद केले. घरच्या नोकर-चाकरांचे येणेही बंद झाले.


अशातच संजूला त्याचा वर्गमित्र दिपकची आठवण झाली. गेल्याच वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई चार घरची धुणीभांडी करून कसेबसे घर चालवते. पण लॉकडाऊनमुळे तिचेही कामावर जाणे बंद झाले असेल, त्यांच्या घरी दुसरे कोणी कमावणारे नाही. या परिस्थितीमध्ये दिपक व त्याची आई कसे राहत असतील या विचाराने संजू अस्वस्थ झाला. त्याने दिपकविषयी वाटणारी चिंता आईला सांगितली व त्याला मदत करण्याची इच्छाही दर्शवलीे.


संजू व त्याचे वडिल दोघेही मास्क लावून दुकानावर गेले. वाणसामान घेऊन दोघे थेट दिपकच्या घरी गेले. संजूला पाहून दिपकला आनंद झाला. संजूच्या हातात किरणामालाची पिशवी पाहून तो सारेकाही समजून गेला. दिपकच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. या अडचणीच्या काळात आपल्या मुलाच्या मित्राने न मागता मदत केलेली पाहून दिपकच्या आईचा कंठ दाटून आला.


या प्रसंगातून त्याच्या लक्षात आले की आपले असे अनेक मित्र या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीत असतील. त्यासाठी त्याने मित्रांच्या मदतीने शाळेचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला. त्यात विभागातील गरजू लोकांची यादी तयार करून मित्रांना, शिक्षकांना मदतीचे आवाहन केले. संजूने सुट्टीत फिरायला जाण्यासाठी ठेवलेले पैसेही या मदतकार्यात दिले. संजूच्या रूपाने या लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.


Rate this content
Log in