STORYMIRROR

जयेश झोमटे

Children Stories Horror Thriller

3  

जयेश झोमटे

Children Stories Horror Thriller

महावीक भग 2

महावीक भग 2

10 mins
206

जयविक सीज 1 


महावीक भाग 2 


आज माऊली हॉस्पिटल वर आकाशात अंधारासारखे काळे ढग  जमा होऊ लागलेले, त्यासोबतच वा-याने सुद्धा रौद्र रुप धारण केल होत, अशातच काहिवेळाने पाऊस सुद्धा धो-धो बरसायला सुरुवात झाली, त्या बरसणा-या पावसात जेव्हा जेव्हा दोन काले ढग विद्युत घर्षन होत एकत्रितरित्या घासले जायचे.त्यावेळेस जो मोठा... कानठळ्या बसवणारा... आवाज होयचा, त्या आवाजासरशी एक , गुलाबी रंगाची  वीज त्या सीटी हॉस्पिटलच्या वर आकाशात चमकली जायची , वीज चमकताच काहीक्षणा पुरता सर्व अंधार बाजूला होत आजुबाजुचा परिसर लक्ख पणे उजळुन निघायचा, ज्याने ते हॉस्पिटल भेसुर वाटत होत . निसर्गराजाने आपल हे रुप काही क्षणातच चेंज केल होत, कसल्या तरी अभद्र चाहुलीची जाण तो करुन देत होता , जणु कोणत्यातरी अनामिक शक्तिने मणुष्यवस्तीत शिरकाव केला होता, ज्या अमानविय शक्तिला मणुष्यतलावर रहाण्याचा आधीकार नव्हता, ती शक्ति कोणती आहे , तीच कटकारस्थान काय आहे त्यामागच ठोस कारण त्या परमेश्वरालाच ठावुक होत .जो ह्या अखंड सृष्टीचा मालक आहे , जरी त्याच आस्तित्व ह्या पृथ्वीवर नसेल , तरी सुद्धा तो उपस्थीत आहे! त्याला पाहण्यासाठी त्याच्याच कुलात जन्म होऊ लागत , आणि ह्या मोठ्या विश्वात अशे मोजकेच भाग्यवान असतात ! ज्याना ही संधी मिळते  , त्यातलेच ते 3 जण दिव्य शक्ति असलेल्या stone ( माणिक ) चे मेंबर्स होते !


इकडे माऊली हॉस्पिटल मध्ये प्रोफेसर डिसोझा  ,ती छोटी नक्षीदार पेटी उराशी कवटालुन कावरेबावरे होत .पुढे तर कधी पाठिमागे पाहतच घाई-घाईने आपले पावले उचलत पुढे -पुढे जात होते , थोड्या वेळ अगोदरच  चांग व त्याच्या साथीदारांना प्रोफेसर यानी आपल्या दिशेने येताना पाहिल होत, त्याचकारणाने भितीपोटी त्यानी तेथुन पळ काढला होता, आणि ह्याच घाई-घाईत  त्यांची एका हॉस्पिटल च्या वॉर्ड बॉय शी धडक बसली, धडक बसल्याने दोघे सुद्धा विरुद्ध दिशेला पाठीमागे पडले,धडक खुपच जोराने बसली होती ,त्या वॉर्ड बॉय जवल असलेल्या  खुप सा-या जुन्या पुराण्या फाईल ,  धक्का बसल्याने फरशीवर अस्तव्यसत होत पडल्या, प्रोफेसर डीसोझा यांस कडे असलेली ती नक्षीदार पेटी सुद्धा धक्क्याने  हातामधुन खाली फरशीवर पडली , पेटी पडताक्षणी उघडली गेली, त्यातच त्या तीन रंगाच्या स्टोन सुद्धा मंद गतीने बाहेर पडल्या, त्या सरशी एक विज पुन्हा आकाशात कडाडली तो आवाज पुर्णत हॉस्पिटल मध्ये असा काही घुमला की जणू मेघगर्जना झाली असावी .व पुन्हा ती पेटी त्याच प्रकारे बंद सुद्धा झाली, घाईत असल्याने प्रोफेसर डीसोझांना मात्र ह्या गोष्टीची चुणूक ही नाही लागली , की त्या स्टोन त्या नक्षीदार पेटी मध्ये नसुन त्या files च्या ढिगखाली आहेत ! 


" मी काय विचारतोय त्याच फक्त खर -खर उत्तर दे ? " 

चांग त्या नर्स कडे पाहत हळकेच शांत आवाजात म्हणाला, ती नर्स पुर्णत संमोहित झाली होती. त्या नर्स चे डोळे लाल रंगाने चमकुन निघालेले ,व  बेपहोमेट चा तो गोल ता-यांच्या आकृतीचा लॉकेट आता क्षणी चांग ने आपल्या गळ्यात घातला होता , तो लॉकेट सुद्धा त्याच प्रकारे लाल रंगाने चमकुन निघाला होता. त्या नर्सची नजर त्या लॉकेट वरच एकटक खिळून होती .

" मला सांग ? कोण आल होत आमच्या अगोदर ?" 

चांग त्या नर्सला म्हणाला , तस शुन्यात पाहत ती नर्स म्हणाली

" एक 56 -57 वयाचा इसम आला होता ,"    

" वर्णन सांग त्याच !? " 

" डोळ्यांवर एक चष्मा, अंगात सफेद रंगाचा शर्ट ,व खाली एक काळी पेंट "

" हातात काही होत का त्याच्या ? " .   

चांग संशयित नजरेने पाहत म्हणाला ! 

"   एक नक्षीदार पेटी होती त्या पेटीवर तीन देवांचे चिन्ह होते " !     पुन्हा शुन्यात पाहत ती नर्स म्हणाली ! 

" कोणाबदल काही विचारत होता का? " ? 

 चांग अस म्हणाला असेल , की तोच त्याचा फोन खण,खणू लागला, तस तो आडबाजुला आला, व त्याने आपला फोन बाहेर काढला, स्क्रीनवर बॉस अस नाव दिसुन येत होत, 

" हा बॉस .....!  " चांग म्हणाला ! 

" चांग मी मायरा बोलतीये! तू तुझी काळी शक्ति वापरतोयस का? 

 फोन वर एका स्त्रीचा आवाज येत  होता , ती बॉसची सेक्रेटरी मायरा होती . तिने चांग ला प्रश्न केला, त्यावर चांग म्हणाला ! 

" हो mam मी माझ्या काळ्या शक्ति चा वापर केला आहे! " 

" कोणत्या शक्ति चा वापर करतोयस तु? ! "  

मायरा पुन्हा त्या चांगला  म्हणाली 

" sorry mam ! ते एक गुपित असत जे मी तुम्हाला सांगु शकत नाही ? मी एका iluminati संघटनेचा सदस्य आहे! माझ्या देवाच नाव फक्त बॉस ला समजू..शकत बाकी कोणालाही नाही?."  

" ठीके ! मग बोल बॉसशी? ,अस म्हणतच, त्या स्त्रीने बॉसला फोन सोपवला , कारण आता  समोरुन एका माणसाचा आवाज येत होता , तो आवाज खुपच भरडा होता,जणू एक प्रकारे राग ,द्वेष, क्प्टीपणा त्यात ठोसून-ठोसून भरल होत, जर त्या अनोलखी इसमाचा आवाजच इतका कुरुप होता तर तो माणुस कसा असेल, हे विचार करुनच अंगावर सर्रकन काटा येत होता .  

" चांग ! मी तुला तुझ्या शक्तिचा वापर करण्यास कोणतही बंधन घालणार नाही ! कारणे कलियुगास ते मान्य नाही तु बिनधास्त तुझ्या काळ्या शक्तिंचा वापर कर ..... पण! 

" पण..? .......पण काय बॉस ? थांबलात का बोलाना पुढे !  

चांग बॉसला... म्हणाला , 

" चांग ज्या प्रकारे आपण काळ्या सैतानाला पुजणारे हस्तक आहोत, त्याच प्रकारे....त्या दगडाला...पुजणारे सुद्धा आहेत, त्याचे सुद्धा हस्तक आहेत !? मी काय बोलतोय समजत ना तुला ? 

" पण बॉस ! त्या म्हाता-या भटूरड्यांची येवढी लायकी नाहीये .? की ते आपला सामना करु शकतात..?  आपल्या कडे इतकी पावर आहे की आपण त्या थेरड्याना सहज दोन मिनिटात गारद करु ?

बॉसच्या प्रतिक्रीयेवर चांग म्हणाला 


" चांग अती मूर्ख पणा नकोय,? त्या तीन स्टोन च्या आजुबाजुला काही नकारातम्क शक्ति वास करत असतील. तर त्या शक्ति सोबतच त्याच्या वापरकरत्याचा सुद्धा अंत होऊ शकतो . त्या तीन स्टोन तुला वाटतात तितक्या काही साधारण स्टोन नाहीत चांग ?अफाट,पंचमहाभुतांची कित्येक द्विगुणीत शक्ति आहे त्यांत,जर मला त्या मिळाल्या तर कलीकंडार असुर ह्या कलियुगात पुनर जिवीत होइन? ती भविष्यवाणी ना भूतो,ना भविष्यती मला  पुर्ण करण्यास ह्या भुतळावरची कोणतीच शक्ति मला अडवु शकणार नाही! आणि मी वंकाळ पाताळातुन कली ला ह्या जगात कलियुग प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा एकदा जन्म देणार , ही हाहाहा , हाहाहा , ही हाहाहा एक भयानक असा हसण्याचा आवाज हाहाहा , ........!!!!!!" 

तर मित्रांनो चांग च्या बॉसच नाव वंकाळ होत , आतीपाखंडी ,महाक्रूर मणुष्य देहात वावरणारा हा वंकाळ साक्षात एक सैतान होता सैतान, त्याचे विचार ,कुविचारी होते, त्याला कलीचा मोह होता, त्यातच त्याने कित्येक देश -विदेश आलटून - पालटून तपास्या करत खुद कलीचे हस्तक जमवले होते , एक -एक करत लाखो करोडो जमा झालेले, 

त्यातच त्याला त्या कली च्या भविष्यकाळ वाणी बदल समजल, की पृथ्वीवर 3 माणिक ( स्टोन) एका गुहेत कित्येक करोडो वर्षापासुन जमिनीत आत भु-गर्भात गाडले गेलेले आहेत , व ह्या तीन स्टोन मध्ये, 3 देवांची अफाट शक्ति सामावली आहे, ह्या तीन स्टोन ची एक अशी खासियत होती, की ह्या स्टोन पाताळाच द्वार काहीही वेळा पुरता का असेन उघडू/खोलु शकत होत्या , 

त्यातच एका हस्तकाने वंकाळ ला खबर दिली की त्या तीन स्टोन एका प्रोफेसरला मिळाल्या आहेत, ही बातमी ऐकताच वंकाळ आनंदाने नाचु लागला,इतक्या वर्षांची मेहनत सफल जी झाली होती , त्यातच वंकाळ ने ताबडतोब चांग व दहा -बारा आफ्रिकन्स ना प्रोफेसरांच्या घरी पाठवल, पण एनवेळेस प्रोफेसरांना कोणीतरी पुढच्या धोक्यापासुन आधीच सावध केल होत ,त्यातच ते स्टोन सहीत पळायन करण्यात यशस्वीपणे पास झाले होते , व पुढे काय घडल हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल! .

" ठीके बॉस ! तुम्ही म्हणाल तस ! मी माझ्या शक्ति वापरणार नाही! 

चांग अस म्हणताच फोन दोन्ही कडुन कट झाला . एकवेळ पुन्हा चांग त्या पाच आफ्रिकन्स  जवळ आला , व त्याने आफ्रिकन भाषेत आपला एक प्लान त्या पाचही जनांना सांगण्यास सुरवात केली.

" तुम्ही पाच जण वेग- वेगळे होत त्या प्रोफेसरला शोधा? आणि हो काहीही झाल, तरी आपल्या काळ्या शक्तिचा वापर करु नका ? या आता ?" 


चांग हे सर्व आफ्रिकन भाषेत म्हणाला , कारण ते पाचजण सुद्धा आफ्रिकनच होते, रंगाने काळे , शरीराच्या आकाराने मोठे हे आफ्रिकन पाहताच कोणाच्याही मनात धडकी भरली जात होती, हे सुद्धा सैतानाचे हस्तक होते , जगात न जाणे अशे कित्येक सैतानाचे हस्तक असतील , जे आपणास ठावूक नाही मित्रानो, जे परमेश्वराला न पुजता साक्षात सैतानाला पुजतात , त्याची पुजा करतात . ह्या हस्तकांकडे काळ्या सैतानी शक्ति सुद्धा असतात , त्याचा एक ताजा नमुना आपण पाहिलाच आहे असो पाहुयात पुढे -

चांग ने आपल गल्यातल लोकिट पुन्हा काढत पेंट मध्ये ठेवल , त्यासरशी ते संमोहित सुद्धा तुटल गेल, आणि मग एक-दोनदा डोळे मिचकावत त्या नर्स शुद्धीवर आल्या , सर्व प्रथम त्यांनी आजुबाजुला पाहिल पण पुढे किवा आसपास आता कोणीही नव्हत. 


" ओ साहेब येढी कसली घाई हो ?  "  

हॉस्पिटल चा वॉर्ड आपल्या डोक्याला हात लावतच उभा राहुन थोड रागातच म्हणाला व खाली पडलेल्या काही बाही फाईलस तो एका वर एक ऊचलत थरा-थर ठेवत रचू  लागला , प्रोफेसर यांनी ती पेटी आपल्या हातात घेतली , व म्हणाले .

" सॉरी हा भाऊ! माझ जरा लक्ष नव्हत . मी जरा dr: महाजन यांची केबीन शोधतोय ? तुम्ही जरा मदत कराल का ? खुप मदत होईल हो तुमची! " प्रोफेसर डीसोझा आपल्या नम्र आवाजात म्हणाले, त्या आवाजात नम्रपणा होता, तो आवाज ऐकून त्या वॉर्ड बॉय चा राग थोडा कमी झाला व तो प्रोफेसरां कडे पाहत म्हणाला.

" dr: महाजन का? त्यांची केबीन वर 3 फ्लोर वर आहे! पण मला नाही वाटत ते तुम्हाला भेटु शकतील? त्यांच्या मुलाच ऑपरेशन चालु होणार आहे ना थोड्याच वेळात ! पुढे काहीही ऐकु न घेता प्रोफेसर थेट बाजुच्या लिफ्ट मध्ये घुसले, की तोच त्या वॉर्ड बॉय ने पुन्हा एक आवाज दिला, 

" ओ भाऊ तुमच्या गोळ्या घ्या की ?"

लाल- हिरवी - निळी अश्या तीन रंगाच्या स्टोन हातात घेत तो वॉर्ड बॉय लिफ्टच्या दिशेने दाखवत म्हणाला. परंतु लिफ्टच दार केव्हाच बंद झाल होत. 

" काय माणुस हाय!? गोळ्या न घेता निघुन गेला.जाऊदे आपल्याला करायचय " 

अस म्हणतच त्या वॉर्ड बॉय ने त्या तीन स्टोन पुढेच एका गणपतीच छोटस मंदिर होत ,तिथे मूर्ती समोर ठेवल्या, ज्या क्षणी त्या तीन स्टोन गणरायाच्या समोर ठेवल्या गेल्या, त्या क्षणी पुर्ण हॉस्पिटल ची लाईट, कमी जास्त होवू लागली , कॉम्प्युटर सिस्टीम, मोबाईल रेंज , wifi, सर्व यंत्रणा hang होवु लागल्या. जणु देवाचाच काहितरी संकेत असाव. पण काहीक्षणात सर्व पाहिल्या सारख झाल गेल . त्या तीन स्टोन ठेवून तो वॉर्ड बॉय सुद्धा.. निघुन गेला . हा घडलेला विचित्रप्रकार पाहुन एकवेळ त्याला सुद्धा विचित्र वाटल, पण मित्रांनो जर त्या वॉर्ड बॉय ला तीन स्टोन ची खरी खासियत कळाली असती. तर त्याच्या मनात नक्कीच त्या शक्तिचा लोभ निर्माण होऊ लागला असता .

हो की नाही मित्रानो...


लिफ्ट उघडताच आतमधुन प्रोफेसर बाहेर पडले , त्यानी एक आवंढा गिळून भीत-भीत आजुबाजुला एक कटाक्ष टाकला , चांग व त्या 5 मोठ्या काळ्या अफ्रिकन राक्षसांचा चेहरा न राहुन-राहुन त्यांच्या डोळ्यांसमोर येत होता , ज्याने क्षणा क्षणाला भीतिने पोटात गोळा येत होता, रात्रीची वेळ असल्याने थर्ड़ फ्लोर 7 - 8 माणस सोडून पुर्णत रिकाम होत , घड्याळाची टिक-टिक काय ती ऐकु येत होती, जी मनात एक वेगळीच भिती निर्माण करु पाहत होती, उराशी पेटी कवटालुण प्रोफेसर एक-एक पाऊल पुढे टाकत जात होते,  राहुन राहुन कोणीतरी आपल्याला चोरुण पाहतय हा भास त्यांच्या मनाला खुणावत होता अचानक त्यांची नजर एका केबीन वर पडली , त्या दरवाज्यावर एक पट्टी होती,त्या पट्टीवर लाल अक्षरात dr: स्वप्निल महाजन अस लिहिल होत .ते वाचताच प्रोफेसर कुमारांच्या चेह-यावर एक निर्मल अस हसु आल. धाड-धाड पावल उचलून त्यानी ती केबीन गाठली , दार उघडताच , समोर पाठमोरे खुर्चीत बसलेले dr: महाजन प्रोफेसरांना दिसुन आले. त्यांच्या हातात एक xray होता,  तेच ते पाहत होते , त्याना पाहताच त्यानी एक वाक्या उच्चारल .

" स्वप्निल , i मला तुझ्याशी काहीतरी खाजगी बोलायचय ..? खुप -खुप म्हणजे खुप important आहे...? " 

प्रोफेसर डिसोझा खुर्चीत बसलेल्या पाठमो-या dr:महाजन यांच्या आकृती कडे पाहत म्हणाले .

" या, या , प्रोफेसर बसा..? मी तुमचीच वाट पाहत होतो?" 

 खुर्ची वर पाठमोरे बसलेले dr: महाजन म्हणाले , त्यांच्या आवाजात कमालिचा बदल झाला होता , हे मात्र प्रोफेसरांना जाणवल नाही, जणु त्या खुर्चीत बसलेले dr:महाजन नव्हतेच कोणीतरी भामटा होता,जो आवाजाची नक्कल करुन पाठमोरा हुंकार भरत होता, 

" पण तुला कस माहित की ? मी आलोय ते ? 

प्रोफेसर संशयित नजरेने पाहत म्हणाले.

" नर्स म्हणाली ! कॉल आला होता .

" हो हो विसरलोच मी ?!" 

प्रोफेसर म्हणाले ! 

" अरे मग बोलना.... काय बोलायच ?"  Dr:महाजन म्हणालें.

" हो ऐक स्वप्निल ! तुला माहितीये ना की ? गेल्या 2 महिन्यांन अगोदर मी एका मोहिमे साठी केदारनाथ ला गेलो होतो, ? " 

" हम्म!" dr:महाजन यांनी एक हुंकार भरला. 

" त्या मोहिमेवर माझ्या एका असिस्टंटला नक्षीकाम केलेली एक छोठीशी पेटी मिळाली. त्याने ती पेटी माझ्याकडे सोपावली " ! 

" हम्म जरा पाहु तर अस काय आहे त्या पेटीत?" 

dr:महाजन यांनी आपला एक हात वाढवला व म्हणाले! 

" हे बघ स्वप्निल ह्या पेटीत 3 स्टोन (माणिक) आहेत ,ह्या कोणी साधारण स्टोन नसुन, ह्यात साक्षात परमेश्वराच वास आहे,आस्तित्व आहे त्याच , कल्कि अवतार आहे, जे एका 

राक्षसाच "! प्रोफेसर डिसोझा पुढे काही बोलनार की तोच खाडकन dr:महाजन आपल्या खुर्ची वरून उठले व त्यानी वळुन प्रोफेसर डिसोझा यांच्या कडे पाहिल , आणि त्याचवेळेस प्रोफेसर डोळे फाडून पुढच दृष्ये पाहु लागले , जणु एक आश्चर्यकारक झटका त्यांना बसला असावा , त्याक्षणी त्यांच्या तोंडून एक आवाज निघाला- 

" तु....??????"  

" दौड,दौड के आया, मौत को सामने पाया !आणि हो प्रोफेसर राक्षस नाही हा म्हणायच ? कली देव म्हणायच समजल? ह्या सृष्टीचा एकच देव आहे ... ? एकच युग आहे कलियुग ...... ? 

चांग ... प्रोफेसर यांच्स कडे छद्मी हस्य करत पाहत म्हणाला. त्याला पाहताच प्रोफेसर कुमार यानी आपल्या उराशी ती लहान पेटी अजुनच घट्ट धरली व मागे -मागे ते सरकू लागले , जणु धुम ठोकण्याचा विचार ते करत असावेत, 

" अं..... अं..... अं प्रोफेसर ? भागने की मत सोचो तुम चारो तरफ से हमारे चंगुल में घेरो हुये हो ? " 

चांग प्रोफेसर कडे पाहत म्हणाला . तरी सुद्धा प्रोफेसरांनी एक चोरटा प्रयत्न कराव ह्या हेतूने एक गिरकी घेतली , जोरात एका हाताने दार उघडले,त्यांनी आपला एक पाऊल पुढे टाकला दूसर पाऊल पुढे ठेवणार की तोच , हवेमधुन एक काळा कुट्ट असा हाताचा मुक्का त्यांना आपल्या दोन्ही डोळ्यां समोरुन येताना दिसला व दुस-याक्षणीच तो मुक्का  चेह-यावर बसला गेला , आघात इतका शक्तिशाली होता , की त्या पंच ने प्रोफेसर अक्षरक्ष हवेत उडाले ,व मागे -उडून जात dr:महाजन यांच्या काचेच्या टेबलावर आदळले , त्यासरशी सपाट असा तो काचेचा टेबल प्रोफेसरांच वजन काही कसांभाळू शकला नाही त्याचा खळ,खळ आवाज होत चुराडा झाला, लहान-लहान तुकडे सर्वत्र पसरले जात -आजुबाजुला काचा पसरल्या गेल्या ,प्रोफेसर यांच वय जास्त असल्याने हा मार काही केल्या ते पचवू शकले नाहीत,  त्या टेबलाच्या काचांवरच बेशुद्धावस्था मध्ये प्रोफेसर निर्जीव देहाप्रमाणे पडून राहिले , प्रोफेसरांचा डोळ्यांवर लावलेला तो चश्मा दोन तुकडे होत.कोठेतरी केबीन मध्ये हरवला होता . punch लागलेल्या जागी एक मोठा काला असा निशाण उमटला होता .त्यातून नेमकेच एक छोठीशी रक्ताची धार सुद्धा निघून आली होती , 


"अरे... ये तू...येडा हाय का रताळ्या ? येवढ्या जोरात का मारलस.? .. हा म्हातारा कधी मेला ना ? बॉस सोडणार नाही आपल्याला तुझ्या सोबत...माझी पण तिरडी निघेल मग बस्स बोंबलत ! "

चांग त्या आफ्रिकन माणसाला पाहत म्हणाला व त्याने लागलीच प्रोफेसरांची नाडी तपासुन पाहिली , जी चालु होती,

" thank god जिवंत आहे हा ? तु तोंड काय बघतो रे माझ रताळ्या !उचल ह्या म्हाता-याला !  

चांग त्या समोर उभ्या असलेल्या अफ्रिकन माणसाला म्हणाला. चांग  मराठीतून बोलल्याने त्या आफ्रिकन ला काही समजल, किवा उमजल नाही तस चांग ने पुन्हा तेच वाक्य आफ्रिकन भाषेत उच्चारल, तस  प्रोफेसर यांच बेशुद्धावस्था मधल शरीर त्या आफ्रिकन माणसाने अलगद उचलून आपल्या खांद्यावर घेतल, व 

चांग ने ती बाजुलाच खाली पडून असलेली बंद पेटी उचलून  आपल्या हातात घेतली , व ते दोघे सुद्धा हॉस्पिटल च्या मागच्या दरवाज्यामधुन बाहेर आले, मागची बाजु असल्याने तिथे अंधारशिवाय कोणीही नव्हत! काहिवेळाने एक काळ्या रंगाची गाडी त्या दोघांच्या समोर येऊन थांबली तसे त्या आफ्रीकन माणसाने प्रोफेसर एंकल डीसोझा यांच बेशुद्धावस्था मधल शरीर आत ठेवल व ते दोघे सुद्धा.. गाडीत बसले. तस मोठा आवाज होत,पाठिमागुन काल धुर...सोडत गाडी पुढे निघुन गेली.......! 


क्रमशः 


भाग.... 3 लवकरच....


Rate this content
Log in