Hole Sandeep

Others

3  

Hole Sandeep

Others

मेत्री

मेत्री

2 mins
154


या प्रश्नाच उत्तर द्यायच थोडसं कठीण आहे कारण की असा ठोस पुरावा आत्तापर्यंत तरी सापडलेला नाही.


तरीही काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.


माझे दुसरे मित्र जेव्हा अचानक एकमेकांना भेटतात. मग ते माझी पण आठवण काढतात, ते माझ्या बद्दल पण गप्पा मारतात (चांगल्या आणि वाईट). आणि मग ठरवतात की चला आता संदिप ला कॉल करुन बोलुया. मि माझ्या मोबाईलवर जेव्हा फोन आलेला पाहतो तेंव्हा पहीला विचार मनात येतो की, अरे आज कसा काय याने फोन केला? आणि त्या क्षणापर्यंत माझ्या मनात किंवा डोक्यात त्या मित्रांबद्दल काहीच विचार नसतो. तेंव्हा तर मला जाणवले नाही की कोणीतरी माझी आठवण काढत आहे.


आता दुसरा पैलू - कधी कधी सारखं आईची आठवण येत असते आणि अचानक आई चा फोन येतो आणि म्हणते, कसा आहेस बाळा? तुझीच आठवण येतेय आज, आता या आठवणीला काय म्हणावं ? इथे आपल्याला म्हणता येईल की हो, आईची मनापासून खूप आठवण येत असेल तर आईला ते जाणवतं.


अजुन एक मुद्दा, जेव्हा ब्रेकअप होते तेंव्हा काही मुली लवकर मोव्ह ऑन होतात. तिला दुसरा मुलगा भेटतो दुसरे प्रेमप्रकरण सुरू होते आणि लग्न पण होते. दुसऱ्या बाजूला जो पहिला मुलगा आहे तो त्या मुलीची दिवसरात्र आठवण काढत बसतो आणि ती मुलगी तोपर्यंत सर्व विसरलेली असते आणि तिच्या संसारात व्यस्त होते. तसंच काही वेळा मुलींबरोबर होते. मुलगा 'मोव्ह ऑन' होतो आणि मुलगी आठवण काढत बसते.


रिलेशनशीप मध्ये असणाऱ्या लोकांच काय होत ते पण पाहुयात. अचानक रात्री २ वाजता मुलगी बॉयफ्रेंड ला फोन करते आणि म्हणते की, " तुझी आठवण येत आहे". आणि त्याच वेळेला मुलगा पण गाढ झोपेतुन सावध होत म्हणतो की, " मी तुलाच फोन करणार होतो, मलापण तुझी आठवण येत आहे." अशा आठवणीला काय म्हणावं? तर रिलेशन जपण्यासाठी हे असं बोलाव लागत. पण लोकांना वाटतं की हे किती एकमेकांची आठवण काढतात.


आता शेवटचा मुदा - नेहमीच आपण स्वतः हुन आपल्या लाडक्या म्हणजेच खोडसर मेत्रीनी ला फोन करून आपली आठवण करून देतो, पण खरच तिला आपली आठवण करून देण इतक गरजेचे होते का? 


जर एखादा जवळचा व्यक्ती वारला तर आपल्याला त्या व्यक्तीची नेहमी मनापासून आठवण येते, पण ते त्या व्यक्तिला कस समजणार की आपण त्याची आठवण काढतोय?


असा सगळा खेळ आहे आठवणींचा. आणि आजच्या धक्काधकीच्या जीवनात प्रत्येकजण स्वतःच्याच समस्यांनी वेढलेला आहे. काही लोकांना तर आठवण तेंव्हाच येते जेंव्हा गरज किंवा पैसे पाहिजे असतात आणि जेव्हा त्या व्यक्तिचा फोन आलेला आपल्याला दिसतो तेंव्हाच जाणवतं की समोरच्या व्यक्तीला आपली आठवण आली आहे.


धन्यवाद!! 


बघ माझी आठवण येते का?


Rate this content
Log in