Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

मढ्यावरचं लोणी

मढ्यावरचं लोणी

3 mins
1.5K


मालकीनबाय उद्या न्हाय जमायचं यायला.

अरे असे काय करतो? .उद्या तर खूप म्हणजे खूप काम आहे. गेस्ट येताहेत माझ्याकडे.

पण मालकीनबाय एकच दिस सुटी द्या हो. उद्याच्याला तरी डागदरला दावून आनतो. लई तरास व्हाया लागलाय आता म्हता-याला.

अरे, मागच्याच महिन्यात पण सुटी घेतली होतीस ना तू?

पन म्हागच्या म्हैन्यापेक्षाबी हालत लई खराब झालीये त्याची.

दुस-या कोणाला तरी सांग मग

मालकीनबाय दुसरा कोनी आसता तर कायला हुभा –हायलो असतो तुमच्या म्होर?

अरे पण उद्या नाही देऊ शकत मी तुला सुटी. आलरेडी मागच्या महिन्यातही एक सुटी घेऊन झालीये तुझी. दिवाळीत दोन-दोन सुट्या आणि त्याही सलग घेतल्या तेव्हाच मी तुला वॉर्निंग दिली होती की इथून पुढे तुला एकही दिवस सुटी मिळणार नाही म्हणून. तरीही मागच्या महिन्यात हातापाया पडून का होईना सुटी मिळवलीच तू. हे बघ माझ्याकडे उद्या येणारे गेस्ट खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा खूप उपयोग करून घ्यायचा आहे मला . 

मालकीनबाय-----

अरे ऐक ना डॉक्टरकडे जास्तीत जास्त एखादा तास जाईल तुझा. त्यानंतर येऊन जा. आणि कुठे सरकारी दवाखान्यातच न्यायचंय ना. तो जवळच आहे माझ्या घरापासून. नंतर बायकोसोबत तुझ्या वडलांना घरी पाठवून दे आणि तू सरळ कामावर ये.

मालकीनबाय हवं तर पैसे कापून घ्या उद्याचे

छट! अरे तुझ्या त्या दोन पाच रुपयांसाठी माझ्या लाखोंच्या डील नाही लावू शकत मी डावावर.

मालकीनबाय मेहेरबानी करा हो

नाही म्हणजे नाही..........

__________________________________________________________________________

........ मालकीनबाय -------

एक शब्द बोलू नकोस जिथे कुठे असशील तिथून लग्गेच निघून ये कामावर

मालकीनबाय-----------------

मला काहीही ऐकायचं नाहीये. तुला सुटी मिळणार नाही हे मी किती कळवळून सांगितलं होतं रे, तरी आज तू गायब. काही लाजलज्जा?

मालकीनबाय --------


तू माझ्याशी वाद घालू नको. मी तुला सांगितलं कामावर यायचं म्हणजे यायचं. तू मला आठवडाभर आधी बोलला असता तर काहीतरी अॅड्जेस्ट तरी करता आलं असतं रे. हे बघ माझी फजिती करू नकोस. येऊनच जा.

मालकीनबाय मी तीन हप्त्यांपास्न म्हता-याला डागदरकडं न्ह्यायला सुटी मागत हुतो....

किती बोलतोस रे तू? तुला उद्या देते सुटी पण आज येऊनच जा.

मालकीनबाय, ऐका ना-----

अरे मघापासून तुझंच ऐकतेय मी. आणि मी तुझी काळजी आहे म्हणूनच बोलतेय रे लहान-लहान मुलं आहेत तुला. बायको आहे. तुला कामाचा कंटाळा करून कसे चालेल?

तसं न्हाय मालकीनबाय, हिथं------------

हे बघ जास्त इकडे-तिकडे करण्यात वेळ घालवू नको सरळ घरी ये. गेस्ट येतीलच आता. कुठे आहेस आता तू?

लोणी घ्यायला आलोय मालकीनबाय.

वा रे पठ्ठे शाब्बास! काय पावभाजीची पार्टी करतोस काय रे?

न्हाय मालकीनबाय त्याचं काय हाय ------------

अरे मग जे काही आहे ते सांग की पटकन. घुटमळतोस काय असा? कोणाला लावायला घेऊन चालला लोणी?

त्ये बामनदेवानं म्हागीतलं हाय.

कसली पूजा करतोयस रे?

मढ्याच्या टाळूवर ठेवाय लागतं म्हनला.

कोणाच्या मढ्यावर?

म्हता-याच्या! तरास लईच व्हाढल्यानं काल रातच्यालाच गेला माझा म्हतारा.

अरे मग बरंच झालं की. खाणार एक तोंड कमी झालं. आता पुरत जाईल तुला पगार. पण ऐक ना घरी बायकापोरं आहेतच ना मढ्यापाशी? मग एक काम कर त्याच दुकानातून आणखी एक किलो लोणी घे. अमुलच घे बरं का. रिक्षा धर आणि घरी ये. एक तासात मोकळा करते तुला.

बरं मालकीनबाय, अजून काय आनायचं का?

काही नको, अरे सगळी व्यवस्था करून ठेवलीये मी. फक्त बटर चिकन, पनीर माखनवाला, मुगाचा शिरा, चिकन पुलाव आणि लच्छा पराठे बनवायचे आहेत. ये लवकर.


Rate this content
Log in