कर्माचा सिद्धांत
कर्माचा सिद्धांत


एकदा बादशाह अकबर यांनी बिरबलाला विचारले, "माझ्यासारख्या, साऱ्या प्रजेची नीट देखभाल करणाऱ्या प्रजाहीतदक्ष राज्यकर्त्याच्या राज्यातही काही माणसं कमनशिबी, भिक्षेकरी, व्याधीग्रस्त आणि परावलंबी कसे काय?"
बिरबल म्हणाला, "जहाँपनाह, आपण कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं प्रारब्ध नाही बदलू शकणार, कारण हे ते लोक आहेत जे मागच्या जन्मी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून परनिंदा करण्यात धन्यता मानत होते. मनुष्य जन्माचं मोल समजून न घेता गुलामगिरीच्या मानसिकतेतून वेळेचा अपव्यय करत होते. दुसऱ्यांची निंदा करताना धादांत खोटं बरळत होते. डोंबाऱ्याच्या हातातली माकडे झाले होते हे. डोंबाऱ्याच्या प्रचंड आहारी गेल्याने ईश्वराची सोडून डोंबाऱ्याची भक्ती करू लागले होते. कर्माचा सिद्धांत कोणालाही सोडत नाही. आणि हां, जहाँपनाह, यामध्ये तुमचे काही लांबचे नातेवाईकही आहेत बरं का."
"बरं बरं, पुरे आता!" असं म्हणून बादशाह अकबरांनी बिरबलाला शांत राहण्यास फर्मावले.