Aniket Maske

Others

4.0  

Aniket Maske

Others

माय डॅड माय हिरो

माय डॅड माय हिरो

1 min
178


बाप म्हणजे कल्पवृक्षच...


दगडातला देव मला कैकांनी दावला

माणसातला देव बापा तुझ्यात घावला II


"बाप"हा दिसायला जरी छोटा शब्द आहे. पण त्याचा अर्थ आभाळाएवढा आहे. मग तो कसाही असो श्रीमंत गरीब, व्यसनी, भिकारी, आंधळा, पांगळा पण तो बापच असतो. मनाताल्या मनात रडणारा आपलं दुःख आतल्या आत गिळुन टाकणारा, आजवर आईवर इतकं लिहलं पण बापावर का नाही याला एक कारण म्हणजे बापाची व्याप्ती ही शब्दात न मावणारी आहे. काहीजण बापाच्या ओरडण्याला धाक म्हणतात पण खरंतर हा धाकामागे प्रेम दडलेलं असतं.जसं कल्पवृक्ष हे इच्छा पुर्तीचे झाड म्हणुन ओळखले जाते. तसंच आपण जन्माला आल्यापासुन आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा बाप मला कल्पवृक्षच भासतो. मला एकच वाटत की बाबा तुम्ही कमवा, किंवा घरी बसुन रहा याचा मला काहीच फरक पडत नाही. फक्त तुम्ही आहात या कल्पनेनंच आधार वाटतो तुम्ही जेवढे कष्ट केलेत कदाचित तेवढे मला सोसणार नाहीत पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर साथ सोडलीत तर मला तुमच्याशिवाय काहीच जमणार नाही.


Rate this content
Log in