@Aniket Maske

Children Stories Thriller

3  

@Aniket Maske

Children Stories Thriller

भूतकाळ बदलणारं यंत्र...

भूतकाळ बदलणारं यंत्र...

2 mins
199


गेलेली वेळ परत येत नाही अस म्हणतात. तरी प्रत्येक माणसाला आयुष्यात काहीतरी चमत्कार घडावा असे वाटत असते. आपल्या भुतकाळाचा आपल्या वर्तमानावर तथा भविष्यावर बराचसा परिणाम जाणवतो. त्यामुळे आपले वर्तमानातले वर्तन चांगले ठेवावे असे अनेकजण सांगतात काळाच्या ओघात आपण बर्याच गोष्टी विसरतो पण काळ आपली पाठ सोडत नाही. तो सदैव आपल्या डोक्यावर मिर्या वाटत असतो. 

माझा एक मित्र आहे अमेय नावाचा त्याला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. तो नेहमी नवनवीन कल्पनांच्या शोधात असतो. तो एक दिवस माझ्याकडे आला मला म्हणाला "तुला एक जादु दाखवतो."मी घाबरलो कारण त्याची ख्यातीच तशी होती. तो कधी काय करेल याचा भरवसा कुणालाच नव्हता. 

तो पुढे बोलु लागला, "मी एक असं यंत्र बनवतोय ज्याने माणसाचा भुतकाळ बदलु शकेल..."

मी आश्चर्याने त्याच्याकडे बघु लागलो म्हणालो, "हे कसं शक्य आहे." मी त्याच्या कल्पनेला हसु लागलो.

तो चिडुन म्हणाला, "आता हसुन घे माझी पास्ट चेंजर मशीन तयार झाल्यावर तुझाच भुतकाळ बदलतो पहिला." असं बोलुन अमेय निघुन गेला. 

दोन महिन्यांनी परत भेटला " माझी पास्ट चेंजर मशीन तयार झाली आहे. चल तुला गम्मत दाखवतो." असं बोलुन माझ्या हाताला धरुन घेऊन गेला. तिथे बरीच गर्दी जमली नवीन मशीन बघायला. त्यातला एक माणुस त्या मशीनवर बसला. मशीन सुरु झालं त्यानं बरेच खुन, दरोडे त्याच्या भुतकाळात घातले होते तो माणुस म्हणाला, " मी माझ्या पास्ट मध्ये दरोडेखोर होतो पण या मशीनच्या मदतीने मला माझा भुतकाळ बदलायचा आहे." अमेय ने मशीन सुरु केलं. आणि चमत्कार म्हणावा की काय मला कळेना. तो माणुस जो दरोडेखोर होता त्याच्या भुतकाळात तो पोलिस दिसत होता. अशा तर्हेने अनेकांनी आपला भुतकाळ बदलुन घेण्यासाठी त्या मशीनचा उपयोग करुन घेऊ लागले. पण काही दिवसांनी वारे उलटे वाहु लागले. 

ज्या ज्या लोकांनी मशीनच्या साहाय्याने आपला भुतकाळ बदलला होता त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. अमेयची आणि माझी भलतीच तंतरली. कारण मशीन सक्सेसफुल झाल्यानंतर मी ही त्याच्यासोबत जोडलो गेलो होतो. शेवटी पोलीस आमच्या पर्यंत पोहचले. आम्हाला पकडु लागले मी जोरजोरात ओरडु लागलो " सोडा मला, साहेब मी काय नाय केलं. पोलिसांनी माझ्या पायावर स्सनकन काठी मारली.

तसा मी बेडवरुन खाली पडलो. आलार्म वाजत होता तो बंद केला. "हे स्वप्न होतं तर" मी स्वताशीच पुटपुटलो. "थँक गॉड" किती भयानक होतं सगळं नको तो बदल जो एखाद्याचा जीव घेईल आपलं रुटींग लाईफच बरी. भुतकाळाचा एवढा विचार कोण करत. गेलेली वेळ परत येतच नाही तर त्याचा विचार का करायचा नवीन दिवस नवी सुरवात असं म्हणत पुढे जात राहायचं..... 


Rate this content
Log in