Vishwanath Shirdhonkar

Others

5.0  

Vishwanath Shirdhonkar

Others

माणसापेक्षा गाढव बरा !!!!

माणसापेक्षा गाढव बरा !!!!

8 mins
750


 - " गाढवे तुम्ही खरोखर गाढवच आहात . "

- साहेब रागाने म्हणाले. पण राजाभाऊ गाढवे शांत होते . त्यांना मुळीच राग आला नाही . उलट विनम्रपणे ते सहज म्हणाले , " धन्यवाद सर . "

आता साहेब चवताळले . त्यांना वाटलं राजाभाऊ गाढवे त्यांची थट्टा करत आहे . 

-" अहो गाढवे मी तुम्हाला चक्क गाढव म्हटलय . धन्यवाद कसला देताय ? "

- " मग काय द्यायला हवं सर ? " राजभाऊ गाढव्यांनी अगदी शांतपणे विचारलं .  

- " काही देऊ नका . " आता साहेबांचा पारा आणखीनच वाढला होता , " काही देऊ नका मला . नीट धड काम करा म्हणजे माझ्यावर उपकार होतील "

- " यस सर . " 

- राजाभाऊ गाढव्यांना समजलंच नाही की  त्यांच कुठे चुकलं आणि याहूनही हे की साहेबांना राग येण्याचे मुळात कारण काय होते ? त्यांनी साहेबांच्या समोरून फाईल घेतली , कागदं गोळा केली व म्हणाले ,

- " येऊ साहेब ."

- " नाही जेवण करूनच जा ." साहेब रागाने म्हणाले . 

- " यस सर " पण गाढवे शांतच होते . 

- साहेबांचा राग अजूनही कमी झालेला नव्हता . साहेबांच्या जेवण्याच्या निमंत्रणाला कोणताही प्रतिसाद न देता राजाभाऊ गाढवे चुपचाप केबिनच्या बाहेर आले व आपल्या जागेवर येउन बसले .

-" काय राजाभाऊ, साहेब आज परत तुम्हाला गाढव म्हणाले ? आता तर साहेबांचे नाव ' गिनीज बुक ' मध्ये धाडायला हवं ." राजाराम शिपायानीही आज परत राजाभाऊंची  थट्टा केली . - " राजाराम , कर तू पण माझी थट्टा कर . अरे पण कावळ्याच्या श्रापाने गाय का कुठं मरण पावेते ? राजाभाऊ  तितक्याच शांत पणे म्हणाले . 

- " म्हणजे आपले साहेब कावळा ? " राजाराम शिपायाला हसू आलं , " सांगतो साहेबांना ."

- " जा सांग . " तितक्याच शांतपणे राजाभाऊ म्हणाले , " अरे राजाराम , "गाढव इतका वाईट प्राणी नसतो . गरीब प्राणी बेचारा . कुणाचं काय घेतो रे तो . सारखे सगळे त्याच्या मागं लागतात .  "

- अहो राजाभाऊ  राहूद्या तुमचं गदर्भ पुराण . . गाढवाबद्धल मला मुळीच आपुलकी नाही . "

- राजाभाऊ  गाढवे आपल्या कामाला लागले . खरं तर नोटशीटवर साहेबांनीचं सामान विकत घेण्यासाठी  स्वाक्षरी करून आपली स्वीकृति दिली होती . ऑर्डर फार मोठी होती , त्यासाठी हेडऑफिसहूँन अगोदरच मंजूरी आलेली होती .सर्व शाखांमधून अनेक दिवसांपासून वस्तूंची मागणी होती . म्हणून गाढवे सप्लाई ऑर्डर देऊन मोकळे झाले.यात त्यांच काही चुकलं असं त्यांना वाटलं नव्हतं . पण साहेबांच गणित वेगळं होतं . हे सर्वाना ठाऊक होतं  . व सप्लायर साहेबांना त्यांच्या घरी जाऊन काही भेट देण्याच्या अगोदरच राजाभाऊ गाढव्यांनी आर्डर दिल्यामुळे ते नाराज झाले .  पण राजाभाऊ गाढव्यांना याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं .ते साधे सरळ,भोळे, आणि सरळ वाटेने चालणारे,कर्तव्य दक्ष,धर्मभीरु, खाल्ल्या मिठाला जागणारे प्रामाणिक माणूस होते.त्यांच्या याच स्वभावामुळे आजच्या काळात त्यांचा कोणाशीच निभाव होत नसे .

-राजाभाऊ गाढवे तडजोडीसाठी कधी ही तयार नसायचे . घर असो किंवा बाहेर , तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता . त्यांच्या याच तत्वनिष्ठपणामुळे व प्रामाणिकपणामुळे त्यांचा सतत अपमान होतं . त्यांना कमी लेखले जात . त्यांची सर्व थट्टा करीत असे , त्यांना घालून पाडून बोलत असे . पण राजाभाऊ गाढवे याची फारशी दखल घेत नसे व जास्त काळजीही करत नसे .  राजाभाऊ गाढव्यांचे घरातही कुणाशी  फारसे पटत नसे व त्यांना कुणी फारसे विचारात ही नसे . पगाराचे पैसे प्रत्येक एक तारखेला बायकोच्या हातावर ठेवल्या नंतर राजाभाऊ गाढवे ही घरात फारसे कोणाशी संबध ठेवत नसे . एकूण घरात राहूनही राजाभाऊ गाढवे या जगात एकटेच होते . आणि म्हणून गाढव्यांच्या  आयुष्यात वेगळं असं काहीच नव्हतं , महत्वाचं असं काहीच नव्हतं . महत्वाचं होतं ते म्हणजे , त्यांचा नियमितपणा आणि प्रामाणिकपणा . रोज दहा  मिनिटं अगोदर गाढवे ऑफिसमधे आपल्या खुर्चीवर दिसायचे , आणि संध्याकाळी  दहा मिनिटांपेक्षा जास्त ऑफिसमध्ये  थांबत ही नसे . मधल्या सुटीत ते डबा , जागेवर बसूनच खात असे , तो ही पांच मिनिटांच्या आत . रविवारचा सबंध  दिवस ते झोपून किंवा लोळून काढायचे . राजाभाऊ गाढव्यांना एकचं मुलगा होता तो ही बाहेर गावी नोकरी निमित्त असायचा .  . घरात बायको , आई , वडील , धाकटा भाऊ , त्याची बायको आणि त्यांचे दोन पोरं हीच मंडळी होती . म्हणून रविवारी देखील त्यांच्या डोक्याला कोणताही ताप नसे . एकूण राजाभाऊ गाढवे आडनावाच्या या माणसाचे आयुष्य अगदी सुखात आणि सुरळीत होतं . 

- लहान पणापासून राजाभाऊ  गाढवे अण्णांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या तोंडून हे ऐकत आले होते  " तू अगदी गाढव आहेस . किंवा  गाढवा सारखा आहेस . किंवा एखाद वेळेस म्हणायचे , " गाढवा सारखा वागू नकोस  . " आणि तेव्हा त्या बालपणापासूनच राजाभाऊ गाढव्यांना  गाढव या प्राण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले . गाढव हा प्राणी कसा वागतो . म्हणजे त्याच्या  सारखं वागू नको हे जे अण्णा नेहमी म्हणतात त्याप्रमाणे तरी निदान कळेल की आपण कुठं चुकत आहोत . 

- पण राजाभाऊ  गाढव्यांना  गाढवाच्या वागणुकीबद्दल काहीच कळू शकले नाही याचे त्यांना नेहमी आश्चर्य वाटायचे . पुढे शाळेत मास्तर त्यांना काही विचारायचे आणि गाढवे त्याच उत्तर बरोबर नाही देऊ शकले तर मास्तर म्हणायचे , " - गाढवा पुढं गीता वाचून काय उपयोग . बाकावर बैस बाबा तू . "

- मास्तर कंटाळायाचे पण राजाभाऊ  गाढव्यांना  प्रश्न पडायचा की गाढवापुढे गीता वाचण्याची गरज कोणाला पडली. आणि गाढवापुढे गीता वाचणारा मूर्ख की शहाणा ? गाढवाचा काय दोष त्यात ? यानंतर राजाभाऊ  गाढव्यांना गाढव नावाच्या प्राण्याशी खरोखरच खूप आपुलकी वाटू लागली  . 

- पुढे त्यांना स्वत:साठी सतत गाढव संबोधन ऐकून ऐकून गाढवाबद्दल जवळीक वाटू लागली . पण त्याचीही एकाद्या पुराणासारखी वेगळी कथा आहे . म्हणजे आटपाट नगर नव्हते . पण एकदा राजाभाऊ गाढवे प्रवासाहून परतत होते . सकाळची वेळ होती . त्यांना ऑफिसमध्ये पोहोचायची घाई होती . अशातच गजबजलेल्या रस्त्यावर अचानक कोणी तरी एका पिसाळलेल्या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यावर  काठी उगारली .ते कुत्रं नेमकं यांच्यावर धावून आलं . राजाभाऊ गाढव्यांना वाचायलाही जागा नव्हती . पण अचानक दोन गाढवं एक मेकांच्या मागे ओरडत  धावत समोर आले आणि अंगावर आलेला कुत्रा बाजूला झाला . तेव्हा गाढव्यांना असं वाटलं की त्यांच्यासाठी दोन गाढवं कसे देवा सारखे धावून आले त्यांच्या मदतीला . त्या दिवसापासून गाढवे त्या गाढवांचे मनात उपकार मानू लागले . मागून त्यांचा मालक धावत येत होता . तो मात्र गाढव्यांशी आदळला . हरकत नाही कुत्र्या पेक्षा , माणूस चालेल . पण या दोघांमध्ये गाढव मात्र नक्कीच उत्तम . पिसाळलेला कुत्रा चावला असता तर १४ इंजेक्शन लावावे लागले असते . म्हणजे गाढवाची एक वेळा लाथ खाणं परवडेल , पण भटक्या कुत्र्याचं चावण केव्हाही परवडण्या सारखं नाही .त्या दिवशीपासून गाढव्यांच हे ठाम मत झालं . आणि हे ते प्रत्येकाला बोलून दाखवूही लागले की माणसापेक्षा गाढव केव्हाही बरा . .   

- आपल्याला कुत्र्यापासून गाढवानीच वाचविलं सतत हा  विचार करून करून गाढव्यांना त्या गाढवांबद्दल आपुलकी वाटू लागली . व त्यांनी गाढवाबद्दल आणखीन माहिती गोळा करण्याचे ठरविले . आणि खरोखरच एका सुट्टीच्या दिवशी राजाभाऊ शहराच्या बाहेर एका कुम्भाराकड़े जाऊन पोहचले . कुम्भाराने राजाभाऊंना गाढवाबद्दल त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा बर्याच गोष्टी सांगितल्या . कुम्भाराला भेटल्या नंतरच राजभाऊंना गाढवाबद्दल बरीच नवी माहीत मिळाली . त्या दिवशी गाढवाच्या अनेक विशिष्टते बद्दल देखिल गाढव्यांना माहिती मिळाली .                                                                                                   --कुम्भाराने त्यांना सांगितले की , जगातला सर्वश्रेठ आणि चांगला असा प्राणी गाढवच असतो . साधा , सरळ , भोळा-भाबडा , आणि स्वामिभक्त गाढवामधे कोल्ह्यासारखी चालबाजी नसते , तर सिंहासारखी क्रूरता नसते . महत्वाचे म्हणजे गाढव कामचुकार नसतो आणि आळशीही नसतो . किती ही ओझे असो , कुत्र्यासारखा भुंकायला सुरवात करत नाही . गाढ़ावाची सहनशक्ती अचाट असते . कुत्रा पाळण्यापेक्षा गाढव पाळणे केव्हा ही चांगले .कुत्र्यांसारखा गाढव माणसांना चावयला धावत नाही . कुत्रा भुंकण्याशिवाय काहीच कामाचा नाही.ठाउक नाही लोकं घरात कुत्रे का पाळतात आणि त्यात आपली प्रतिष्ठा का समजतात? विशेष म्हणजे कुत्र्यांच्या चावण्याला सर्व घाबरतात , अगदी माणसाला सुद्धा चावता येतं जेव्हा की गाढव कोणालाही चावत नाही , आणि कोणाला घाबरवत देखिल नाही . किती मोठा गुण आहे गाढ़वाचा . याचा विचार करायला हवा की नाही ? गाढव बहुदा एकटाच ओरडतो पण कुत्रा सगळ्या कुत्र्यांना गोळा करून सर्वांची झोप मोड़ करतो , आणि पहाटे ओरडल्यास सर्वांना भीती वाटते . कुत्रा कोणाच्या कामधंद्यात मदत करत नाहीं , जेव्हा की गाढव दिवसभर ओझं उचलतं असतो . गाढव कुम्हाराचा खरा मित्र असून त्याच्या जिव्हाळ्याचा देखिल असतो आणि आता तर राजभाऊंचा देखिल जिव्हाळ्याचा झालेला आहे .     

--संध्याकाळचे पांच वाजले होते . ऑफिसमधे राजभाऊ आपलं सामान आवरत होते . ते आता घरी निघण्याच्या तयारीत होते इतक्यात राजाराम शिपायाने त्यांना साहेब बोलावित असल्याचा निरोप दिला . राजाराम शिपायाच्या डोळ्यात राजाभाऊना खोडसरपणा दिसत होता , जणू सांगत होता की साहेब तुम्हाला आत परत गाढव म्हणणार आहे . पण राजाभाऊना त्याची काही काळजी नव्हतीच . साहेबांच्या केबिनमधे आंत शिरताच साहेब म्हणाले , ‘ या राजाभाऊ . ‘     

--चक्क राजाभाऊ ? आज गाढव नाही ? राजाभाऊना आश्चर्य वाटले .                             –‘ बसा. ‘ साहेब म्हणाले .                                                            –-साहेब राजाभाऊना आश्चर्याचे धक्केच देत होते . साहेबांकडून इतक्या विनम्रतेची कल्पनाच नव्हती , आणि इतका आदर आता तर कमालच झाली . राजाभाऊचे मन आशंकित झाले . जरुर काही गड़बड़ आहे . राजाभाऊ विचार करू लागले . पण साहेब हसत होते .                –‘काय झाले सर ? ‘ राजाभाऊ ने आपल्या स्वभावाप्रमाणे विनम्रतेने विचारले .                             –‘ काही नाही राजाभाऊ , आय एम् सॉरी . सकाळी विनाकारण मी तुम्हाला रागावलो . तुम्हाला गाढव म्हणालो . रियली आय एम् सॉरी . ‘ साहेब परत एकदा सॉरी म्हणाले ,  ’ तुम्ही पण काय विचार करत असाल माझ्याबद्दल? ‘ राजाभाऊनी काहीच उत्तर दिले नाही. –साहेबांनी परत विचारले , ‘ राजाभाऊ , माझ्याचबद्दल विचार करता आहात ना ? ‘ -- नाही साहेब . ‘                                                                – ‘ मग ? ‘                                                                       – ‘ मी तर गाढवाबद्दल विचार करतोय . ‘ अचानक साळसूदपणे राजाभाऊ म्हणाले .                 – ‘ काय ? ‘ साहेब दचकले . आश्चर्याने राजाभाऊकड़े बघत म्हणाले , ‘ काय म्हणताय राजाभाऊ तुम्हीं ? ‘                                                              --‘ काही नाही सर .’ राजाभाऊ म्हणाले , ‘ आपण बोलावले मला . काही काम आहे का ? ‘ राजाभाऊ विनम्रतेने म्हणाले . त्यांना सकाळची घटना आठवली . साहेबांचे सकाळचे रागावण्याचे कारण आठवले , ‘ सर , आपण अजूनही सप्लाय आर्डर रद्द करू शकतो . मी लगेच पत्र लिहून आणतो , आपण सही करा म्हणजे मी लगेच सप्लायरला त्याच्या घरीच जाऊन देतो . अजून तर त्याने काही सामान धाड्लेच नसेल . ‘                               --‘राहू दया . मी याचसाठी तुम्हाला बोलाविले आहे . ‘ साहेब म्हणाले , ‘ मी आत्ता लंचमधे घरी गेलो होतो ना तेव्हा तो सप्लायर पण माझ्या मागोमाग घरी आला होता . हातपाय जोडत होता . माफ़ी मागत होता . मी पण विचार केला , जाऊ दया नेहमीचाच व्यवहार आहे . ‘ साहेबांची नजर मात्र खाली होती .                              – ‘ अति उत्तम ‘ राजाभाऊंच्या तोंडातून लगेच हे शब्द बाहर पडले , ‘ सर चांगल झालं तो आपल्याला घरी भेटला . ‘ --साहेब आता परत राजभाऊंकड़े आश्चर्याने बघत होते , पण राजाभाऊ मात्र शांत होते .                                                              –‘ आणखिन काही काम आहे का ? ‘                                                              – ‘ नाही . ‘                                                                        – सर येऊ मी ? ‘                                                            –‘ होय . ‘ साहेब म्हणाले आणि राजाभाऊ बाहर पडले .                                       -–बाहेर येताच क्षणी राजाराम शिपायाने परत राजभाऊंची छेड़ काढली , ‘ काय झालं राजाभाऊ ? साहेबांनी परत तुम्हाला गाढव म्हटलं ? पण तुम्हीं साहेबांना सड़ेतोड़ उत्तर का देत नाही ? ‘ – ‘ त्याची गरज नाही . ‘ राजाभाऊ शांतपणे म्हणाले , ‘ पण राजाराम, तू मला एक गोष्ट सांग . गाढव फ़क्त गवतच खातों का रे ? लाच नाही खात ? ‘ – राजाराम शिपाई बऱ्याच वेळ जोरजोराने हसत होता . राजभाऊ शांतपणे ऑफिसच्या बाहेर पड़त होते .  

 ********* समाप्त ***********                                                              


Rate this content
Log in