Sunil Jawale

Others

2  

Sunil Jawale

Others

लव्ह इन सिमला

लव्ह इन सिमला

26 mins
54


           हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामधील व्हीनस इन हॉलिडे होममध्ये काल संध्याकाळी आलेले मुलींचे ग्रुप्स अजूनही मऊशार दुलईमध्ये शिरून साखर झोपेत लोळत पडले होते. पहाटेची हवीहवीशी गुलाबी थंडी अनुभवत दुलई डोक्यावर ओढून सर्वजणी गुबगुबीत बेडवर झोपून मधुर स्वप्नांच्या मनोराज्यात रमल्या होत्या.

            भारत सरकारच्या मिनिस्ट्री आॕफ यूथ अफेयर्स अँड स्पोर्टस व हिमाचलप्रदेश युनिव्हर्सिटी संयुक्त विद्यमाने आयोजित 25th नॕशनल यूथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी सिमल्याला पुणे - मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागातून निवड झालेल्या स्पर्धक मुलां - मुलींच्या टीम्स येऊन दाखल होत होत्या. हा सोहळा २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत चालणार होता. प्रथमच सिमल्याला विमेन्स हाॕकी टीमसोबत आलेली कल्चलर प्रोग्रामची महिला टीम कालका स्टेशनवरून दुपारी सव्वा बाराची सिमला फेस्टिव्हल स्पेशल टाॕय ट्रेन प्रदीर्घ पल्ला पार पाडून संध्याकाळी साडे पाच वाजता सिमला स्टेशनवर पोहोचली होती. लहानसेच पण ऐतिहासिक तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेले हे रेल्वे स्टेशन प्रसिद्ध होते. स्टेशनवर उतरलेल्या स्पर्धकांना फेस्टिव्हलच्या आयोजकांनी रिसीव करून आपआपल्या हाॕटेल्सवर पोहोचवण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली होती. अजूनही देशभरातील काॕलेजेसमधून स्टुडंडसचे ग्रुप्स येणे चालूच होते. 

            पहिल्यांदाच यूथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेत असलेल्या फायनल इयर इंजिनियरींग कॉलेजच्या व आयआयटीयन्स मुंबईकर्स २५-३० विद्यार्थिनींचा एक मोठा गट रात्री व्हीनस हाॕलिडे होमवर दाखल झाला होता. सिमल्यातील कडाक्याच्या थंडीची अजिबात सवय नसलेल्या मुंबईकर्स जेवूनखाऊन लवकरच आपआपल्या रूम्समध्ये चौघींमध्ये एक रूम शेअर करून बिनधास्त झोपून गेल्या होत्या. 

           सकाळ झाली होती. गुबगुबीत गादीवर मुलायम ब्लँकेटमध्ये स्वतःला गुरफटून घेतलेली गरिमा चौधरी जागी झाली हैती. हलकेच ब्लँकेट चेहऱ्यावरून मागे सारत भला मोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या निसर्गाचे मोहक आगळेवेगळे निखरून आलेले रूपडे न्याहाळत ती लोळत पडली होती. खिडकीच्या तावदानावर बाहेरील झाडांच्या पर्णसंभाराच्या सावल्या नाचत त्यातून कोवळ्या उन्हाची तिरीप आत डोकावून तिच्या गुलाबी गो-यागोमट्या चेहऱ्यावर येत तिला छेडत होती. कोवळ्या उन्हाचा उबदारपणा हवाहवासा वाटत होता. बाहेर पडलेला धुक्याचा दाट पडदा हळूहळू विरून जात होता.

            खिडकीबाहेरील निळ्याशार आकाशात कमान बनवून पक्ष्यांच्या झुंडीमागून झुंडी उडतांना दिसत होत्या. उंचच्या उंच हिरव्याकंच झाडांच्या ओळी रांगेत उभ्या राहून हवेवर लहरत होत्या. शिवालिक पर्वतरांगाची दूर दूर अंतरावर व्यापून असलेली बर्फाच्छादित सोनेरी गिरीशिखरे डोळे दिपवून टाकत तिला भुलवत होते. 

        इतक्यात सीन पलटी होत टीम मॕनेजर स्वाती जोग मॕडमचा आसूड ओढल्यासारखा कडकता आवाज कानी पडला. तिच्या अंगावरील मऊशार ब्लँकेट खसदिशी ओढले जात वैतागलेल्या स्वातीचा रागीट चेहरा समोर दिसला. गरिमा खडबडून बेडवर उठून बसली. 

' अरीं ओ ss महारानियों...अब उठो भी। आठ वाजून गेलेत बघा तरी कितीवेळ अजून आळशासारख्या लोळत पडणार आहात? चला खाली लवकर.. नाश्ता तयार आहे!'

' होss होss मॕम... हे काय जागीच होते मी... आवरून येते पटकन तुम्ही व्हा पुढे ... आलोच आम्ही!' गरिमा ब्लँकेटची घडी घालत काॕटवर बसून म्हणाली.

' आणि या शेफाली, नीता आणि वैष्णवीलाही घेऊन ये... किती हाका मारतेयं पण कोणीही उठायचे नाव घेत नाही... येतेयंस ना !'

' होss मॕम आलेच !' म्हणत तिने काॕटवरून टुणकन उडी मारत बाजूला सिंगल बेडवर झोपलेल्या शेफालीच्या जवळ येऊन उभी राहिली. तोंडाचा पट्टा चालवतच तिने शेफालीच्या अंगावरील ब्लँकेट ओढून बाजूला फेकले. स्वाती रूमच्या बाहेर निघून गेली होती.

' अगं ए पोरींनो उठतायं आता कीआणू बादली भरुन पाणी आणि ओतू थोबाडावर!ती महामाया मलाच ओरडून गेली इतक्यात... जसा काही मीच ठेका घेतलायं सगळ्यांचा!'

' गरिमा काय यारss अगं होss उठलो ना आम्ही आता... तू पळ बाथरूममध्ये आवरून घे आणि आटोपले म्हणजे सांग मग मी जाते!' म्हणत शेफालीने पुन्हा डोक्यावर ब्लँकेट ओढून घेत बेडवर पाय पोटाशी घेऊन पुन्हा झोपून गेली.

' नहीं सुधरेंगे हम ... जाऊ दे मला काय... नाश्ता संपून गेला म्हणजे बसतील ठणाणा बोंबलत !' म्हणत ती टूथब्राशवर पेस्ट लावून टाॕवेल खांद्यावर टाकून बाथरूममध्ये पळाली. तोवर नीता व वैशू ही तिची बडबड ऐकत बेडवर उठून बसल्या होत्या. त्यांनी टाॕवेल घेऊन शेजारच्या रूममधील बाथरूम्सकडे पळत सुटल्या.

          सिमल्याचा टूरिस्ट लोकांचे खास आकर्षण असलेला माल रोड गर्दीने ओसंडून वाहत होता. रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना थाटलेली विविध दुकाने पर्यटकांना त्यांच्याकडे खेचून घेत होती. सुंदर सुंदर रंगातील गरम लोकरी स्वेटर्स, शाली, कानटोप्या काचेच्या दरवाजाआड शो पीसेस म्हणून लावले होते. काश्मिरी डिझाईन्सचे कुडते व सलवार डिस्प्ले होत असलेल्या एका दुकानात मुलींचा गट शिरला. दुकानदाराने भाव कमी करावा म्हणून घासाघीस करीत मोठ्याने कलकलाट करीत होता. सकाळी सकाळी बोहनी व्हावी म्हणून दुकानदार एकापेक्षा एक सुंदर रंगसंगती व डिझाईनच्या कपड्यांचा ढीग ग्राहकांपुढ्यात टाकून मिठ्ठास वाणीने वर्णने करीत भुलवू पाहत होते. गरिमाने एक रोझमेरी कलरचा कुडता अंगावर लावून आरशात स्वतःला न्याहाळत उभी होती. यूथ फेस्टिव्हलच्या आयोजकांकडून मिळालेली यूथ फेस्टिव्हलचा लोगो झळकत असलेले शाॕर्ट लाल ब्लेझर्स टाईट जीन्सपँटवर चढवून डोक्यावर वुलनची लांब गोंडा असलेल्या कानटोप्या घातलेल्या मुलींनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

            गरिमाच्या मैत्रिणी दुकानात उभ्या राहून कपड्याचे ढीग उपसून एकेक ड्रेस ओढून बाहेर काढत अंगावर लावून बघत दुकानदाराशी वाद घालत होत्या. सिमल्याच्या गुलाबी थंडीत शाॕपिंग जोरात चालू होते. गरिमाला एक रोझमेरी पिंकवर काळ्या रंगात पानांची डिझाईन्सवाला टिकली वर्कचा चमचमता स्लीव्हलेस टाॕप आवडला होता. शेफालीला सांगून पाठीमागून शोल्डरवर लावून पाहिला तर पंजाबी स्टाईल टाॕप घेरदार तर होता पण जरा ढगळ व जास्तच लांब वाटत होता. मोठ्या मुश्किलीने दुकानदाराला पटवून किंमत नक्की केली होती पण साईझमध्ये येत नसल्याने गरिमा खट्टू झाली.

' अरीं मेमसाब... चिंता की कोई बात नही हमारे टेलर मास्टर फिटिंग करवा देंगे... हां और एक्स्ट्रा चार्ज भी नहीं देना पडेगा.. पसंद आया हो तर रख लिजिए ना!' दुकानदार तिला गळ घालत मनवत होता.

' ओयेss गरिमा... रख ले ना इतना कह रहा वों तों!' शेफालीने गरिमाकडे पाहत म्हटले.

' नको जाऊ दे... नाही फिटिंग व्यवस्थित केली तर पैसे फुकट जायचे... रंग आणि पॕटर्न आवडला म्हणून जरा रूखरूख लागून राहिलीयं!' 

' मेमसाब... उधर हमारे टेलर मास्टरजी है... जाईए अपना बाॕडी फिटिंग का नाप दिजीए... एकदम परफेक्ट फिटिंग करा देंगे!' म्हणत त्याने तो टाॕप एका पो-याकडे देत टेलरकडे पाठवला. गरिमा नाईलाने तिकडे वळली. तिच्या सोबतच्या मुलींनींही काश्मिरी शाली व हातमोजे घेतले होते. 

' शुबहान अल्लाह क्या सुंदर लगती हो... हायेss जालिमा मार डाला... अरज करता हूँ..

' यह जो प्यार

या इश्क होता है

जिन्दगी में बस

इक बार होता है

दिला तों खुशी से

मचलता है पर

बडी मुश्किल से

इजहार होता है !'

टेलरच्या समोर मापे द्यायला उभा असलेला एक गबरू नौजवान आरशात पाठीमागे येऊन थांबलेल्या गरिमाला पाहताच केसांचा कोंबडा फोडून डोळे विस्फारून पाहू लागला. आरशात तिच्याकडे पाहत कमरेत झुकून एक फक्कडसा शेर पेश केला होता. अचानक गरिमाचा संताप झाला. तिच्या रागाचा पारा चढून येत गोरापान गोल गोबरा चेहरा लालबुंद दिसू लागला. त्याचा आगाऊपणा तिला अजिबात आवडला नव्हता. ती डोळे मोठाले करीत ती रागाने त्या उर्मट तरूणाकडे पायापासून डोक्यापर्यंत खुन्नसने पाहत उभी राहिली.

' ओयेss मजनू... लडकी देखी नहीं बस् हो गए शुरू... क्या मतलब है तुम्हारा... मैं इजहार करू प्यार का ? अरे जा... तेरे जैसे बहुत देखें हमने!'

' शायरीका मतलब समझा दूं... अगर कहो तों ?'

' पता नहीं आजकल लोगों को लडकियों के छेडने दुकानें भी कम पडने लगी है... जहां देंखे हो गए शुरू?' गरिमा त्याचा पाणउतारा करीत तार स्वरात बडबडू लागली. तिचा वरच्या पट्टीतला आवाज ऐकून नीता, शेफाली व रश्मि तिच्याकडे धावत आल्या.

' गरिमा ... अगं काय झालं... कोणावर एवढी तुटून पडलीस ?'

' अगं बघ ना... हे मजनू महाशय कसले काहीतरीच बडबडतायं... म्हणे प्यार का इजहार बडी मुश्किल से होता है... आता मी काय याच्या गळ्यात माळ घालू?' गरिमा तणतणत म्हणाली. 

' जहें नसीब मोहतरमा... काश ऐसा होता !' 

' ओयेss मिस्टर हमारी भोलाभाली गरिमाके क्यों पीछे पडे हो... हम बाकी क्या मर गई क्या ? वैसे सचही तो कहा है तुमने... ये कम्बख्त इश्क है ही ऐसी जालिम चीज!' गोरीपान सडसडीत बांधा असलेली रश्मि समोरच्या युवकाकडे डोळे विस्फारून कौतुकाने पाहत म्हणाली. शेफालीलाही तो आवडला होता. एखाद्या फिल्मी हीरोला लाजवेल असा देखणा मुखडा, जाॕय मुखर्जी स्टाईल केसांचा कोंबडा पाडलेला व तसलाच दणकट देह असलेल्या तरूणाने गरिमाच्या मैत्रिणींना भुरळ पाडली होती. टेलर मास्टरच्या समोरचे ब्लेझर उचलून अंगावर चढवत तो डोळ्यांच्या पापण्या मोहकपणे नाचवत बोलत होता. तगडा, उंचशा गो-यापान हँडसम हीरोवर फिदा होत रश्मिने जबाब देत कमरेत झुकून बोटे छातीला भिडवून एक फक्कडसा शेर पेश केला.

' अरज किया है..

 । बहुत कुछ कहना

चाहती हूँ तुमसे

पर तुम्हें खोने के

डर से मेरा दिल

कुछ कहने की

इजाजत नहीं देता... ।

आदाब ... !'

रश्मिने हात लांबवर नाचवून कपाळावर आणत त्याला मुजरा केला.

त्याच्या चेहऱ्यावरून हसण्याची लहर चमकून गेली. नकळत पुन्हा एक शेर तोंडून बाहेर पडला.

' इस से पहले मैंने तो

जिन्दगी कहां जी थी

तुम्हारे आने से मैंने

खुशियाँ महसूस की'

' बहुत खूब.. बहुत खूब जी!' रश्मि दाद देत हसत म्हणाली. गरिमाचा अंगाचा तिळपापड होत ती किंचाळत बोलू लागली.

' रश्मि... अगं तुला कळतेयं का तो छेड काढतोयं आपली... आणि तू त्याला दाद देऊन शायरी काय करतेयंस?' गरिमा जवळजवळ ओरडून म्हणाली.

' हमें मंजूर है... काश मुझे कहा होता... मैं तो खुशी के मारे मर जाती?' रश्मि स्वप्नाळू डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली.

' हैल्लो हँडसम ... आपका नाम और काम ?' नीताने गरिमाला टेलरच्या पुढ्यात ढकलून त्याच्यासमोर येत विचारले. 

' जी मैं राहुल... राहुल पाटील! सर से पावतक मराठी हूँ... तुमचे मराठीत बोलणे ऐकून मैत्री करावीशी वाटली म्हणून मोहतरमा से कुछ शेरोशायरी शेअर किया!'

' तुम्हीसुध्दा यूथ फेस्टिव्हलला आला आहात ? मुंबईकर की पुणेकर ?' शेफालीने त्याच्या ब्लेझरवर निरखून पाहत म्हणाली.

' जी नही... बस् यूं समझिए यहींपर कुछ छोटासा कामधंधा कर के गुजारा कर लेता हूँ!' तो डोळ्यावर आलेली केसांची झुल्फे मानेला झटका देऊन मागे उडवत म्हणाला. त्याची दिलकश अदा पाहून रश्मि चक्कर येऊन पडायचीच बाकी होती. त्या तरूणाने मुंबईकर्स गर्ल्सवर जादू केली होती. गरिमालाही तो मनातून आवडला होता पण लगेच घास न टाकण्याच्या हेकेखोर स्वभावामुळे ती त्याला टाकून बोलली होती. रश्मिने जवळजवळ त्याच्याशी मैत्रीच केल्याचे पाहत ती रश्मिवर डाफारली.

' माय डियर रश्मिजी... फिर से बता रहीं हूँ... इश्क विश्क फरमाना है तों बाहर लेके जाईए जनाब को... यहां शोर मत करो... मेरे मेझरमेंटस गलत हो जाएंगे तो मुझ से बुरा कोई नहीं होगा... हां!' गरिमा छाती व कमरेभोवती टेप लपेटून टेलरला ३६ - २४ इंच म्हणून माप सांगत होती.

' दीदी... घुटने से नीचे छह इंच लम्बा रखू ?' टेलरने विचारले.

' नहीं रेss दस इंच रख... हवा में उडना चहिए ... इसलिये तों दे रही हूँ ना आल्टर कराने?' 

' जैसा आप ठीक समझे... शोल्डर और कमर में फिटिंग बराबर कर दूंगा?'

' हां.. जरा चेस्ट और कमरपर टाईट करो और ये बनाकर कब मिलेगा भाई ? कल डान्स काॕम्पिटेशन में पहनूंगी... होगा ना?'

' कल सुबह इसी समय आ जाईएगा !'

' अरे भैय्या ... और मेरावाला कुडता?' राहुलने लगेचच विचारले.

' जी... आप भी मेमसाहब के साथ सुबह दस बजे आ जाना... कपडा तैय्यार रखूंगा!' 

' क्याss... क्या कहा भैय्याजी... उनके साथ? लेकिन पूछो तों मेमसाहब को चलेगा?'

' मि. राहुल चालूगिरी बंद करा... त्याला माहित नाही आपण अनोळखी आहोत!' गरिमा दटावत म्हणाली.

' पण आता आता तर आपण ओळख होऊन परिचित झालो आहोत ना... फिर अजनबी क्यूँ भई?'

' हे बघा ... तुम्हाला लव्ह फिव्हर चढलेला आहे ... मला नाही! चला वाट मोकळी करा !'

' राहुलसर.. एकेक काॕफी हो जाए... ठण्ड के मारे जान निकली जा रही है!' नीताने भीतभीत गरिमाकडे पाहत म्हटले.

' येस्सss मॕम... इटस माय प्लेझर... चलिए .... सभीं फ्रेंडस को आज मैं ट्रीट देता हूँ!'

' नीता, शेफाली रश्मि तुम्ही जा हवं तर त्याच्यासोबत... ओळख ना पाळख म्हणे आपला म्हणा... मवाली दिसतोयं एक नंबर... आणि तुम्ही कितपत ओळखता गं त्याला... आपण यूथ फेस्टिव्हलला पार्टिसिपन्ट म्हणून आलोयं की लव्हबर्डस म्हणून? जा... तुम्ही मी वैशूला घेऊन पुढे जातेयं?'

' अरे वाहss जान ना पेहचान मैं तेरा मेहमान... भाषातंर छान केलं बाकी ! पर यार ऐसी भी क्या बेरूखी... मी काय मवाली दिसतोयं का हो मिस... ?' तो रश्मिकडे पाहत विचारू लागला.

' मी रश्मि... रश्मि मोहिते पक्की मुंबईकर! मवाली नाही होss छेss! तुम्ही तर लव इन टोकियोमधले जाॕय मुखर्जी दिसतायं डिट्टो... बरं आता अजून थांबलो तर भूचाल येईल... स्सो जाऊ दे राहुल काॕफी पुन्हा कधीतरी... तबतक के लिये बायss बायss !'

' बाय... ठीक जशी तुमची मर्जी... हे बघा पुढे चौकात सिमला काॕर्नर नावाचे छान हाॕटेल आहे तिथे जाऊन नाश्तापाणी करून घ्या!' राहुल म्हणाला.

' सकाळी हादडला आहात ना आमलेट पाव आणि आता अजून काय? बकासुर शिरलायं का पोटात ?' गरिमा चडफडत रश्मिला टोमणा देत म्हणाली.

' आज असे चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत मिस गरिमाच्या?' राहुल हलकेच रश्मिच्या कानापाशी कुजबुजला.

' देव जाणे... कसला मरी मायचा फेरा आलायं जणू? बरं तुम्ही याल का गव्हर्नमेंट काॕलेजमध्ये ?' रश्मि म्हणाली.

' पण का ?'

' उद्याच्या डान्स इव्हेन्टमध्ये गरिमा परफाॕर्म करणार आहे. संध्याकाळी सहा वाजता या!'

' आणि मॕडमना पुन्हा फेरा आला तर ?' 

' ते बघू आपण बट यू मस्ट बी देअर!'

' ओकेss ओकेss जय हो मरी आई की !' राहुलसह तिघीजणी खो खो हसून एकमेकांना टाळी देत शाॕपच्या बाहेर पडल्या. गरिमा तरातरा पुढे चालत सुटली. आज्ञाधारक मंदसर वैष्णवी तिच्यामागून धावत येत होती.

---------------------------------------

       आज गरिमाची टोळी माल रोडवरून विन्डो शाॕपिंगचा लुत्फ उठवत टीपी करीत हिंडत होता. खरंतर खरेदीला खूप वाव होता या मार्केटला पण सगळ्याजणींनी पैसे सोबत जेमतेमच आणले असल्याने केवळ मार्केट सर्व्हे करीत फिरत टाईमपास करीत होत्या. 

' ऐss शेफू डार्लिंग... येतेस माझ्याबरोबर कालच्या शाॕपमध्ये ? कुडता परत घ्यायचायं ना... काल अल्टर ठेवला असेल तर ... आणि होss तुझा कालचा बाॕडीबिल्डर जाॕय मुखर्जीही भेटेल ना तिथे?'

' नको बाबा... तू जा हवे तर फिरून फिरून पाय दुखायला लागलेत... त्यात ह्या मुली तिबेटीयन व लक्कर बाजारातही जायचे प्लॕन करताहेत... आम्ही थांबतो इथेच... तू धावत जा आणि पळत ये... वैष्णवी येईल तुझ्याबरोबर... गरीब गाय बिचारी ना?आणि काय होss गरिमा मॕडम काल जाॕय मुखर्जीवर तोंडसुख घेत होता ... आता मात्र वेध लागलेत का भेटायचे?' शेफाली बडबडत होती.

' अगं चल ना असं काय करतेसं... खरंच सांगते तो हीरो वाट बघत असेल तुझी?'

' माझी नाही काही... तुझी म्हण ! तुझ्यावर लट्टू झाला होता हे काय मला कळले नव्हते?' डोळे बारीक करून पाहत शेफाली तिला म्हणाली

' म्हणून नीता, तू आणि रश्मि गोंडा घोळत होत्या त्याच्या मागे मागे... मला तर लफंगा वाटतो कोणीतरी !'

' बरं बरं बाई.... लफंगा तर लफंगा! आम्हाला काही जोडी जमवायची नाहीये...सहज गंमत म्हणून आम्हीही खेचत होतो त्याची!' रश्मि जरा घुश्श्यात येतच म्हणाली.

' बरं राहिले... मीच जाते ! थोडावेळ इथेच थांबा सगळ्याजणी!'

' तू आता जातेस का ?' रश्मि तिला धक्का मारत ढकलून म्हणाली. गरिमाने कॕप काढून टाकत केस सारखे करून पाठीमागे मोकळे सोडले. पर्समधून लहानसा आरसा काढून त्यात पाहून ओठांवरून लिपस्टिक फिरवून पावडरचा पफ हलकेच गालावर फिरवला. खांद्यावर बॕग अडकवून रागाने दाणदाण पावले टाकत तेथून निघाली. 

' अगं... ड्रेस आणायला जाते आहे की नवरा? बघा तरी कशी नटलीयं ही नवरी... आता जाॕय गेला कामातून... अग ऐss पोरी लवकर ये जास्त वाट पाहायला लावू नको हं !' नीताने ओरडून तिला हाक मारून सांगितले.

          गरिमा माल रोडवरून भराभरा चालत दुकानावरील बोर्ड बघून खात्री करून घेत कालच्या दुकानात शिरली. इकडेतिकडे पाहत तिने टेलरच्या काचेच्या पार्टिशनकडे नजर टाकली. घड्याळाचे काटे सव्वा दहा वाजल्याचे दाखवित होते. राहुल अजूनही तिथे आला नव्हता. 'त्याला भेटायला मन कसे अधीर झालेयं आज... नुसती हुरहूर लागून राहिलीयं मनात... काय करू ... वाट पाहू का ? पण मैत्रिणी शंख करतील त्याचे काय ?' विचारात गुंतत ती टेलर मास्टरच्या काऊन्टरवर कधी आली ते तिला कळलेच नव्हते. तो दुसऱ्याच एका तरूणीचे टेप लावून मेझरमेंट घेत अवतीभवती फिरत होता. गरिमाकडे लक्ष जाताच त्याने आवाज देत म्हटले.

' मेमसाहिबा... आपका कुडता बना के रखा है... वहाँपर आपका पैकेट रखा है... उसे ले लिजीएगा!' गरिमाने नाईलाजाने टेबलावर ठेवलेली एक कागदी बॕग उचलली. दाराकडे नजर फिरवून पाहिले. छेss राहुल अजूनही आलेलाच नव्हता. आता वाट पाहण्यात अर्थ नाही मनाशी पुटपुटत ती दुकानाच्या बाहेर पडली. 'आजच्या डान्समध्ये चमचमता घेरदार लाँग कुडता काय भारी दिसेल... नाही?' मनाशी पुटपुटत हातातील कागदी बॕग शोल्डर बॕगेत कोंबून भरत ती मागेपुढे पाहत चालत होती. 'खरंतर दहा वाजता यायचे राहुल सांगत होता... विसरला असेल बहुधा ... नाहीतर कामात असेल?' ती निराश होत झपाझप पावले उचलत माल रोडवरून चालत होती. तिचे भावगंभीर डोळे गर्दीत राहुललाच शोधत होते. ती मैत्रिणींच्या ग्रुपला जाॕईन होत तिबेटियन बाजारला जाण्यासाठी पायऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याने खाली उतरू लागली. तिबेटीयन बाजारमध्ये एकापेक्षा एक मनमोहक शाली व स्वेटर्स उलगडून पाहत सगळ्याजणी एकेक स्टाॕल पालथा घालत फिरत होत्या. तिबेटी मुली त्यांच्या मागेमागे येत खरेदीसाठी गळ घालत होत्या.

' अगं शेफूss गडबड झालीय यार !' गरिमा काव-याबाव-या नजरेने पाहत म्हणाली.

' वाss जिथे गरिमा तिथे गडबड हे ठरलेलेच असते... काय झाले बाईसाहेब आता?' शेफाली बडबडली.

' अग म्हणजे मी माल रोडवरच्या शाॕपमधून जे पॕकेट घेतले ना... ?'

' हो मग त्याचे काय ?' शेफालीने वैतागून म्हटले.

' अगं त्यात माझा कुडता नाहीच मुळी... कुठलातरी वेगळाच पुरूषी कुडता दिसतोयं... बहुधा राहुलचा असावा!'

' अग पण ही गडबड झालीच कशी ... तू बघून घेतला नाहीस दुकानामध्ये?' 

' नाही ना... टेलरने दाखविले ते पॕकेट उचलून आणले. अदलाबदल झालीयं खरं ड्रेसेसची... आता काय करू ?'

' ओहss माय गाॕड... अग तू काय वेंधळी मुलगी आहेस... आता हा पायऱ्यांचा उंच गड चढून पुन्हा माल रोडवर यायचे... थट्टा वाटली का? चल जाऊ दे... येईल तुला शोधत तो!'

' तो कसा येईल... त्याला माहित आहे आपण कुठे उतरलो आहोत ते?'

' मी सांगितले होते त्याला की आज संध्याकाळी लेकबाझारनजीकच्या गव्हर्नमेंट काॕलेजमध्ये आपली कल्चरल प्रोग्राम काॕम्पिटिशन आहे. तर बघ कदाचित तिथे येईलही आणि तुझा परफाॕर्मन्स आहे ना... जतिन नौटियालच्या राता लंबिया लंबिया रेss गाण्यावर ... बघ तो नक्की येईल तू नको टेंशन घेऊ !' 

' खरं सांगतेस ?'

' आता काय स्टँप पेपरवर लिहून देऊ तुला ?'

' तसं नाही ग पण ?'

' हे बघ आता जरी तू दमछाक करून माल रोडवरच्या शाॕपमध्ये गेलीस आणि त्यापूर्वी जाॕय येऊन तुझे पॕकेट घेऊन गेला असेल तर... झाली ना पंचाईत... आता काय पण बिण मांडू नकोस... तुला आधीच पसंत केलेयं... लव्ह इन सिमला... क्या बोलती हो?'

' तूss ना एक नंबरची चहाटळ मुलगी आहेस... दुसरं काही सुचतच नाही का तुला? जाऊ दे चल कुठे चलायचं तिथे?' गरिमा रागाने फणफणत बोलत होती.

' हो अगं सुचतं ना...लव्ह इन सिमला बघायचा आहे!' शेफाली खळाळून हसत म्हणत.

' अग पोरींनो येथून अजून थोडे पुढे गेलो तर इथले लोअर मार्केट आहे. तिथे स्थानिक लोकांनी दुकाने थाटली आहेत. मीठ मिरची ते मसाल्यापर्यंतचे सगळे आमटेम्स मिळतात... स्ट्रीट फूडस तर खूपच स्वस्त व टेस्टी मिळतात म्हणे ... वडा, समोसा पापडी या सगळ्याच वस्तू आणि शंकरलाल मिठाईवाल्याकडची खास पाकात टम्म भिजलेली जिलेबी आणि सोबत जाडसर रबडी खूपच फेमस आहे म्हणे... चला जाऊ या का ?' मितालीने विचारले.

' अग होss जाऊ या पण या गरिमाचा चेहरा असा का उतरलेला आहे ? की गल है सोण्णिये ?' नीलमने गरिमाचा गालगुच्चा घेत थट्टा करीत म्हटले.

' कुछ नहीं यार... दिल का मामला है?'

' मतलब... मैं कुछ समझी नही?'

' अरीं यारss तू पण मंदच आहेस... दिल अदलीबदली हो चुका है!'

' ओहss इनका दिल उनके पास और... ?' गरिमाने रागावून बडबडत असलेल्या नीलमला पाठीवर बुक्का हाणत गप्प केले.

' तों बात यहांतक पहुँच चुकी है.... शिमला में राजकुमार मिल गया है?' मनवाने तिचा कान पीळत विचारले.

' अग ही शेफूपण ना काय तोंडाला येईल बडबडत असते... तू नको डोकं घालू यात ... जलेबी खानी है ना... चलो मैं खिलाती हूँ!' गरिमा दोघी तिघींना ढकलत पुढे नेऊ लागली. हसण्याच्या जोरदार आवाज व गोंगाटाने रस्त्यावरील पब्लिक थांबून काॕलेजकन्यांची धमाल मस्ती पाहत राहिले. 

---------------------------------------

            संध्याकाळी गव्हर्नमेंट काॕलेजचे आॕडिटोरियम मुला - मुलींनी तुडुंब भरून गेले होते. आजच्या डान्स कॕम्पिटिशनमध्ये ब-याच स्टेट युनिव्हर्सिटीजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आज ड्यूएट साँगवर डान्सचा राऊंड होता. गरिमा तिसऱ्या नंबरवर येणार होती. तिच्यासोबत नाजूकशी मधुल पुरूषी वेषात साथ देणार होती. मधुल मघापासून कुडता - पायजमा घालून डोक्यावर फेटा बांधून तयार होऊन बसली होती. गरिमाला काहीच सुचत नव्हते ' माझा पसंतीचा टिकलीवर्क कुडता घेऊन राहुल खरोखरच येईल का ?' शेफालीला दहावेळा तरी विचारून झाले होते. ती ही सारखी आतबाहेर चकरा टाकत राहुलची वाट बघत होती. आपला आजचा डान्स राहुलने पाहायलाच हवा.. गरिमा गेले चार दिवस जबरदस्त रिहर्सल करीत मधुललाही तिच्या साथीने नाचवत होती. खरंतर मधुल एकाच कडव्यात साथीला येणार होती. वेळ निघून जात होता. स्टेजवर पहिला परफाॕर्मन्स संपला होता आणि आता सिंघमच्या ' चुन लिया चुन लिया... पगले से दिल ने तुझ को चुन लिया...साथियाss' गाण्याची धून कानावर पडू लागली. दुसऱ्या नंबरच्या जोडीने स्टेजवर एन्ट्री घेतली होती.

        आता पुढील पाचच मिनिटात तिला स्टेजवर यायचे होते. पण अजूनही ड्रेसचे सिलेक्शन होत नव्हते. स्टेजवर डान्स सुरू झाल्याच्या गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. गरिमाला दरदरून घाम फुटला ती प्रचंड अस्वस्थ झाली. एकतर राहुलची लागून राहिलेली ओढ व दुसरा कुडता... दोन्हीही डोळ्यापुढे येत होते. तिचा धीर खचू लागला. मधुल तिच्याजवळ येऊन तयार राहण्यास तिचे कान उपटून गेली होती.

           दुरूनच शेफालीला हातात त्या शाॕपची कागदी बॕग घेऊन येतांना पाहताच तिचा जीव भांड्यात पडला. शेफाली धावतच स्टेजमागच्या मेकअप रूममध्ये शिरली व बॕगेतून ड्रेस ओढून गरिमाच्या अंगावर फेकला. गरिमाने चेंजिंग रूममध्ये जाता जाता शेफालीला विचारलेच.

' ऐ ss ... आलायं का तो ?' गरिमा ड्रेस अंगावर चढवत आतून विचारीत होती.

' तरीच म्हटले.. ड्रेसचा नुसता बहाणा आहे... राहुलची वाट पाहणे चालले आहे... जशी पाण्यातून बहेर काढलेल्या मासोळीसारखी तडफडतेयं आमची गरिमा... !' गरिमा काळ्या लेगीन्सवर गुलाबी चमचमता कुडता चढवून रूमच्या बाहेर पडली. तोच आयोजक मुलींनी तिला स्टेजवर जाण्यासाठी तयार राहायला सांगितले. तिने केस मोकळे सोडून ब्रश फिरवत सारखे केले. तिचा चेहरा आता कुठे उजळला होता. ती शेफालीच्या उत्तराकडे डोळे लावून एकटक पाहत होती पण ती काही सांगतच नव्हती.

'शेफूss मी तुला काही विचारले होते?'

' अग... म्हणजे ते नाही आलेत पण त्यांचा माणूस घेऊन आलायं हे पॕकेट... बरं तू सोबत आणलेले पॕकेट माझ्याकडे दे बघू... तो बाहेर थांबला असेल ताटकळत.., मी आलेच त्याला राहुलचे पॕकेट देऊन... तोवर तू जा स्टेजवर!' शेफालीने गरिमाने देऊ केलेले पॕकेट खसकन ओढून हातात घेतले व अबऊट टर्न घेत बाहेर पळत गेली. स्टेजवरची अनाऊन्सर गरिमाचे नाव पुकारून तिच्या काॕलेज व डान्सच्या गाण्याची ओळख करून देत बोलत होती. गरिमाच्या छातीत धडधड सुरू होत ती भीतीने शहारून उठली. मधुलची एन्ट्री थोड्या वेळाने म्हणजे मधल्या कडव्यात व्हायची होती. रेकाॕर्डवर ' तेरी मेरी गल है... इक मशहूर' ची धून वाजू लागली. पोटात भीतीने गोळा उठून ती स्टॕच्यूसारखी स्तब्ध उभी होती. अखेर मधुलने तिला धक्का मारून स्टेजवर ढकलले. 

        स्टेजवर एन्ट्रीलाच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट सुरू होत शिट्ट्यांचे आवाज घुमू लागले. गरिमाने स्वतःला सावरून डान्समध्ये स्वतःला झोकून दिले. आॕडियन्सकडे पाहता ती कमनीय देहाची लयबध्द हालचाल करीत केसांचा पिसारा उडवत वेगवान स्टेप्सवर थिरकत स्टेजवर गिरक्या घेऊ लागली. पहिल्याच डान्स पीसेसमधील लाजबाब अदांनी प्रेक्षकांना घायाळ करीत त्यांची मने कधीच काबीज केली. खरं म्हणजे गाण्यातही प्रचंड जोश होता व पंजाबी धाटणीच्या उडत्या गाण्याने आॕडिटोरियमध्ये धमाल उडवून दिली. नाजूकशा कमनीय देहाचे लटकेझटके व बिजलीसारखी सळसळती देहबोली प्रेक्षकांवर गारूड करून दिली. मधुलने एन्ट्री घेतली. गरिमा तिच्या भोवताली गिरक्या घेत छमाछम नाचत होती. तिने मधुलचे हात हातात घेत स्टेप्स टाकायला सुरूवात केली. गाण्याच्या पार्श्वसंगीतात ढोलाचे जोरकस आवाज व टाळ्यांचा कोरस यामुळे डान्समध्ये वेग आला. सा-या आॕडिटोरियममध्ये टाळ्या ठेक्यावर पडत भरघोस साथ मिळू लागली. साडेतीन मिनिटाचे गाणे कधी संपले ते कळलेच नव्हते. प्रेक्षकांमधून वन्स मोअर - वन्स मोअरचा पुकारा होऊ लागला. डान्सला जबरदस्त वेग असल्याने दोघींचाही ऊर लोहाराच्या भात्यासारखा धापापत होता. प्रोग्राम मॕनेजर्स टीमने तिला खुणेनेच विचारले की वन्स मोअर देऊ या का ? गरिमाने थोडे थांबून श्वास भरुन घेत त्यांना गाणे प्ले करायची खूण केली.

          पुन्हा गाणे रेकाॕर्डवर वाजू लागले. गरिमाने ठेका धरत पावले उचलायला सुरूवात केली. मधुलही तिच्या जोडीला येत पुरूष को डान्सरची भूमिका बजावत नाचू लागली. पुन्हा एकदा स्टेजवर वादळ अवतरले. सारा आॕडिटोरियम टाळ्यांचा कोरस देत मस्तीत दणदणू लागला. शिट्ट्यांच्या कर्णकर्कश आवाजांनी परीसीमा गाठली. प्रेक्षक उभे राहून तिला साथ देत हात उंचावून ठेक्याबरोबर ताल धरीत नाचू लागले. प्रचंड गडबड गोंधळात वन्स मोअरही संपला. प्रत्येकाने डान्सला पसंती दिल्याचे कळत होते.

           गरिमा धावतच स्टेजच्या मागे पळाली. तिथे थांबून डान्स बघत थांबलेल्या शेफालीने तिला एकदम मिठीतच सामावून घेतले व कौतुकाचा वर्षाव करू लागली. गरिमाने बाजी जिंकली होती. सरते शेवटी एक्सपेक्टेड विनर तीच ठरणार आहे म्हणून प्रोग्राम मॕनेजर्सपैकी एक गोडशी मुलगी कानात कुजबूजून अभिनंदन करीत निघून गेली. मिनिस्ट्री आॕफ यूथ अफेयर्सची सेक्रेटरी बीना वर्मा विंगेत येऊन गरिमाच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन गेली. एवढा प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता की विनर म्हणून पब्लिकतर्फे शिक्कामोर्तब होऊन गेले होते. प्रेक्षकांमधून गरिमा गरिमा नावाचा जल्लोष चाललेला कानी पडत होता. गरिमाने मधुलला छातीशी धरून उत्तम साथ दिल्याबद्दल कौतुक केले. गरिमा चेंज करून बाहेर आली तोच शेफालीने मुठीत धरून ठेवलेली एक चिठ्ठी गुपचूप तिच्या हातात दिली.

         गरिमाचा पूर्ण कोरम प्रेक्षकांमध्ये येऊन बसला. स्टेजवर पुष्पा फिल्मचे सामेssसामेss हे हल्लीच्या काळात प्रचंड गाजत असलेले गाणे वाजू लागले. एक फटीचर दाढीवाला तरूण पाय तिरका फेकून जमीनीला घासून ओढत सोबतच्या नाजूकशा पार्टनरला साथ देत धुसमुळेपणाने नाचत होता. चवळीच्या शेंगेसारखी फ्लेक्झिबल बाॕडी असलेली नाजूक चणीची तरूणी उड्या घेत दाणदाण नाचत होती. गरिमाला हसू आवरत नव्हते. 

         गरिमाने न राहवून हळूच चिठ्ठी उघडली व पर्सच्या आड लपवून वाचू लागली. राहुलने तिच्या कार्यक्रमाला हजर न राहू शकल्याबद्दल दिलगीर असल्याचे लिहिले होते. कपड्यांची अदलाबदल होणे हे नियतीचाच संकेत असून तो फक्त एकमेकांना जवळ आणण्यासाठीच होता. उद्या सकाळी दहा वाजता तोशाली राॕयल व्ह्यू या हाॕटेलमध्ये भेटायला बोलाविले. हाॕलिडे होमपासून वळणावळणाच्या टार रोडने जवळच्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या जराच पुढे आल्यावर पूर्वेस हे हाॕटेल असल्याचा मॕपही काढून दिला होता. उद्या जाऊ का मी भेटायला.. सोबत कोणाला नेऊ.. रश्मि... शेफाली की आणि कोणी ? छेss पण त्यामुळे सर्व कंपूत उगाच गवगवा व्हायचा.. मग एकटीनेच जायचे? रस्ता कळेल का? येथील पहाडी चक्राकार रस्त्याचा हिशेब काही वेगळाच होता. चक्रव्यूह भेदणे सोपे पण रस्त्याने जात पत्ता शोधणे कर्मकठीण... आपल्यासारखी मुंबईकरला नक्कीच घोटाळ्यात पाडणार हे लोकेशन ... राहुलच आला असता हाॕलिडे होमवर तर ? नको रेss बाबा ती ढालगज भवानी स्वाती फाडून खाईल मला! उद्या आपल्या ग्रुपसोबत हाॕलिडे होम परिसरातच पकडापकडी खेळत हळूच सटकता येईल ? बघू उद्याचे उद्या !' म्हणत तिने चिठ्ठी चुरगाळून टाकत खाली फेकून दिली. गरिमाने शेफालीचे एवढी धावपळ केली म्हणून तोंडभरून आभार मानले व चिठ्ठी दिलगीरी व्यक्त केल्याबद्दल असल्याचे तिला सांगितले. स्टेजवर जवळजवळ बारा परफाॕर्मन्सेस झाले होते. परीक्षक टीम आपसात चर्चा करू लागली. आता विजेता घोषित व्हायचे बाकी होते. आॕडिटोरियममध्ये गरिमा गरिमा नावाचा धोषा लागून राहिला होता. सारे स्टुडंटस उस्फूर्तपणे गरिमा नावाला पसंती देत आरडाओरडा करीत होते. अखेरीस या राऊंडची विजेती म्हणून गरिमाचे नाव स्टेजवरून पुकारले गेले. गरिमासोबत तिघी- चौघीं उठून तिच्यासोबत स्टेजवर आल्या. गरिमाने चांदीचा मोठा चषक स्वीकारून प्रेक्षकांना उंचावून दाखवत माईकवर थँक्यू थँक्यू म्हणत होती. संपूर्ण आॕडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणदणत होते.

---------------------------------------

        दोन्ही बाजूने उंच उंच व विस्तीर्ण पर्णसंभाराची छत्री मिरवत असलेल्या हिमालयीन वृक्षराजीमधून वळणावळणाचा रस्ता खाली उतरून येत होता. संपूर्ण परिसरावर अजून धुक्याची चादर ओढलेली असून आता सुर्यकिरणे झिरपून येत विरळ होऊ लागली होती. हलकासा हिमवर्षाव चालू होता. रस्त्यावरही ब-यापैकी बर्फाचा थर साचला होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने खाली खोल खोल दरी दिसत होती. तर डावीकडे हिमवर्षावात पांढरीशुभ्र झालेली गिरीशिखरे व झाडांच्या ओळी दिसत होत्या. घोंगावत आलेल्या वा-याचा केवढा तरी मोठा आवाज कानी पडत होता. डोक्यावर लाल गोंडेदार कानटोपी व जीन्स पँटवर लाल ब्लेझर घातलेली गरिमा झपाट्याने हाॕलिडे होमपासून दूर पळत जात होती. निसर्गाचे रांगडे रूप बघून छातीत धस्स होत होत होते. रस्त्यावर तुरळक वाहतुक चालू होती. मध्येच केव्हातरी पायी चालणारे लोक भेटत होते. कडाक्याची चावरी थंडी अंगाला झोंबत होती. गव्हर्नमेंट स्कूलला वळसा घेत डावीकडे रस्ता खाली येत पुढील वळणे वरून दिसत होती. गरिमाने चालण्याचा वेग वाढवला व आपल्याच धुंदीत गुंग होत ती नकळत मधला दुसराच जोडरस्ता पार करून हाय वे वर आली. तिथे सिटी बसच्या स्टाॕपवर थांबलेल्या माणसांच्या घोळक्याला तिने सिटी कोर्टचा रस्ता विचारला. एका वयस्कर गृहस्थाने तिला आपादमस्तक न्याहाळून पाहत ती नवखी असल्याचे ओळखले. त्याने समोरून येत असलेल्या मिनीबसकडे अंगुलिनिर्देश करून त्यातून जायला सांगितले. सिटीबस येऊन थांबली. गरिमा बसच्या मागे धावत येत पटकन आत शिरली. बसमधील प्रवासी बहुधा आधीच्या स्टाॕपवर उतरून गेलेले असावे कारण ती एकटीच प्रवासी बसमध्ये होती. कंडक्टरला सिटी कोर्ट म्हणून वीसची नोट हातावर ठेवली. त्याने तिकिट पंच करून सुट्या पैशांसह तिच्याहाती सोपवले. बस वळणावळणाच्या कार्ट रोडवरून खाली उतरू लागली. पाचच मिनिटात बस सिटी कोर्ट समोरच्या स्टाॕपवर येऊन उभी राहिली. सिटी कोर्ट .., सिटी कोर्ट कंडक्टरने पुकारा केल्याबरोबर गरिमा सीटवरून उठून येत पटदिशी खाली उतरली. हा शेवटचा थांबा असल्याने बस माघारी वळून सिटीमध्ये निघून गेली. 

           गरिमा रस्त्यावर एकटीच उभी होती. आता पुढे कुठे जायचे ? गरिमा विचारात पडली... राहुलने चिठ्ठीत दिलेला मॕप चिठ्ठीबरोबरच गायब झाला होता. गरिमा चिठ्ठी फेकून दिल्याचा पश्चाताप करीत हाय वे पासून उजवीकडे जाणाऱ्या जोडरस्त्याकडे पाहत उभी होती. हाकेच्या अंतरावर असलेले हाॕटेल तोशाली राॕयल व्ह्यू गर्द झाडांच्या दाटीत दडलेले असल्याने हाय वे वरून दिसत नव्हते. वास्तविक तो जोडरस्ता तिला हाॕटेलपर्यंत घेऊन जाणार होता. मन चलबिचल होत तिचा निर्णय होत नव्हता. तिला आता काहीच आठवत नव्हते. ती सिटी कोर्टच्या इमारतीसमोरून चालत जात हाय वे वरून पुढे निघाली. यापुढे तर कसलीच वस्ती असल्याची चिन्हे दिसत नव्हती. चक्राकार वळणे घेत ती ब-याच खाली उतरून आली पण कुठेही हाॕटेलचा थांगपत्ता लागत नव्हता. राहुलने तिला अशा ठिकाणी बोलवावे याचा राग मनात खदखदून उसळून येत होता. चालून चालून पाय दुखायला लागले. एवढ्या मोठ्या हमरस्त्यावर चिटपाखरूदेखील दिसत नव्हते. आता चिंतेची जागा भीतीने घेतली होती. कुठला एखादा वन्य प्राणी हाय वे वर येऊन उभा राहिला तर... विचारानेच तिला कापरे भरले. ती हमसाहमशी रडू लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर ती येऊन बसली. तो कट्टा एका पुलाचा असून त्याच्या ब-याच खालून खळाळत वाहत असलेल्या ओढ्याकडे नजर जाताच छातीत धस्स होत आणखीच घाबरून गेली. डोक्याला हात लावून ती हुंदके देत रडत होती. धुक्याचा पडदा पूर्णपणे नाहीसा होत खालील खोल खोल दिसत असलेल्या जंगलाच्या भागाचे दर्शन होऊ लागले. ती ब-याच उंचीवर असल्याचे तिला कळत होते. पुढे जायची हिंमत होत नव्हती. नशीबावर हवाला ठेवून आलेल्या रस्त्यावर डोळे लावून बसून राहिली. काही वेळ भयाण शांततेत जाताच तिच्या कानावर कुठलेतरी वाहन येत असल्याचा आवाज पडला. ती रस्त्याच्या मधोमध जाऊन उभी राहिली. समोरून येणारे वाहन दृष्टीपथात आले होते. ती एक टपावर लाल दिवा असलेली स्कार्पियो जीप होती. डावीकडील हेडलाईटच्या बाजूला लावलेल्या बोर्डवर भारत सरकार व सिमला वनविभागाचा लोगो बघून तिला हिंमत आली. 'चला निदान सरकारी जीप तरी मिळाली... यात धोका नसणारच!' तिने जवळ येऊन थांबलेल्या जीपकडे निरखून पाहिले. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या राहुलला बघून जिवात जीव येत ती धावतच जीपच्या नजीक येत उभी राहिले. अजूनही तिचे संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होते. राहुल पटकन खाली उतरून आला तोच गरिमाने त्याला घट्ट मिठी मारून कुशीत शिरून ढसाढसा रडू लागली.

' गरिमा डार्लिंग अग मी आलोयं ना... तू हरवली होतीस वाटते... तू सिटी कोर्टच्या बाजूच्या छोट्या रस्त्याने का नाही आलीस... हाॕटेल तिथेच तर आहे!'

' ते मला नाही माहित... पण तू मला अशा निर्जन स्थानावर बोलाविलेच का? अरेss जीवच जायचा बाकी होता. या नवख्या पहाडी प्रदेशात मी पहिल्यांदा येतेयं... मला इथले रस्ते कसे बरे कळणार ना ? मी म्हणते एवढे लांबचे हाॕटेल निवडायचेच कशाला? ते काही नाही... तू मला हाॕलिडे होमवर सोड पाहू... मला नाही यायचे तुझ्यासोबत !' गरिमा हुंदके देत बोलत होती.

' अग तू हाॕलिडे होमपासून मधल्या लहान रस्त्याने आली असतीस तर फक्त पंधरा मिनिटाचे वाॕकिंग डिस्टन्स होते. मी मॕप काढून दिला होता तसा... आहे कुठे तो ?'

' फेकून दिला... !'

' तरीच तू भुलभुलैय्यातन फिरत आहेस ना ? तू हाय वे वरून आलीस का?'

' होss रेss सिटी बसने कोर्टापर्यंत आले आणि पुढे रस्ता कळलाच नाही!'

' ओकेss ओकेss आता भिऊ नकोस मी आलोयं ना... मी हाॕटेलवर वाट पाहून कंटाळलो म्हणून आलो या हाय वे ने ... मला अंदाज होताच तू अशी काही तरी गडबड केली असशील!'

' जिथे गरिमा तिथे गडबड ही ठरलेली आहे!' ती मिठीतून अलग होऊन हसत हसत म्हणाली.

' असं कोण म्हणालं ?'

' शेफाली... मी टेलरकडून तुझे पॕकेट उचलून आणले तेव्हा! तू आला होतास नंतर तिथे? आणि हो माझा परफाॕर्मन्स बघायला का नाही आलास? दुसऱ्या कोणाकडे तरी माझा ड्रेस पाठवून दिलास ते ? तुला माहित आहे .... मी त्या राऊंडची विनर ठरलेयं !' गरिमा हुरळून जात आनंदाने सांगत होती.

' अरेच्या... तर मी यायला हवे होते... पण यार काय सांगू... एक अर्जंट मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने नाही जमले यायला... आय ॲम एक्स्ट्रीमली साॕरी गरिमा! बरं चल बस जीपमध्ये!'

' कोणाची आहे रेss जीप ? तू इथे आहेस कामाला म्हणजे ड्रायव्हर वगैरे आहेस की काय तू?' गरिमा जीपमध्ये येऊन बसली. राहुलने जीप वळवून यू टर्न घेतला व सिटी कोर्टच्या दिशेने जीप धावू लागली.

' कायss मी आणि ड्रायव्हर ? तुला मी असा दिसतोयं का?'

' हां ... तसे नाही रेss आणि मिटिंगमध्ये बिझी होतास म्हणजे ... तू नेमके काय काम करतोसं आणि कोण आहेस ?'

' वेलss गरिमा... माझ्याविषयी काहीही माहिती नसतांना तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास... तुझ्या फार काही अपेक्षा नाहीत बघून खूपच बरे वाटले... पण डार्लिंग तुला निराश नाही करणार मी... मी आहे इथला फाॕरेस्ट आॕफिसर ॲन आयएफएस ग्रेड वन गव्हर्नमेंट आॕफिसर ! सिमला स्टेशनपासून जवळच फाॕरेस्ट डिपार्टमेंटची मोठी शासकीय इमारत आहे. तेथील फाॕरेस्ट काॕलनीसमध्ये माझा मोठा बंगला आहे!'

' कायss खरं सांगतोस तू ? ओहss माय गाॕड मी स्वप्नात तर नाही ना ?' गरिमा हर्षवायू होत किंचाळून म्हणाली.

' येस्सss डियर इटस अ ट्र्यू... आणि तुझ्यामागे लागण्याचे आणखीही एक कारण आहे!'

' म्हणजेss आपण भेटलो तो योगायोग नव्हता ?'

' नाही तू सिमल्यात आल्याचे व तुला भेटण्यासाठी तुझ्या डॕडनीच माझ्या आईला कळविले होते... म्हणजे लग्नासंदर्भात बोलणी करायला!'

' अरेss काय ... तू एकावर एक आश्चर्याचे बाॕम्ब टाकत धक्के देत सुटलास की.... माझे डॕड माझ्यासाठी आयएसएस आॕफिसरचे स्थळ बघतील असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते... बरं तू म्हणतोस हे जर खरे आहे तर याला पुरावा काय ?' तिने भुवया उंचावून कपाळावर आठ्या पाडत विचारले. त्याबरोबर राहुलने ब्लेझरच्या आतील खिशातून गरिमाचा साडीवरचा सुंदर फोटो बाहेर काढून तिच्याकडे दिला व तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखून पाहू लागला.

' अरे बाप रेss बाप... म्हणजे इथंपर्यत गोष्टी पुढे गेलेल्या आहेत म्हणायचे आणि मला काहीच कसे ठाऊक नाही?' ती फोटोकडे एकटक पाहत विचारीत होती.

' ते मला नाही माहित पण माझ्या आईनेच तुझा शोध घ्यायला सांगितला होता आणि म्हणून मी माल रोडवर चकरा मारत फिरत होतो. तुम्ही मुली खरेदीसाठी इथल्या मार्केटमध्ये येणार याची खात्री होतीच मला म्हणून मी पाठलाग करीत त्या शाॕपमध्ये आलो जिथे तुम्ही सगळ्याजणी खरेदी करण्यात गर्क होत्या. मी लांबवर उभा राहून तू ड्रेस निवडल्याचे पाहून मी देखील एक कुडता उचलून तुझ्याआधी टेलरमास्टरकडे जाऊन उभा राहिलो. तू तिथे येणार हे माहितच होते कारण ना .... प्रत्येक ड्रेसमध्ये काही ना काहीतरी फिटिंगचे काम निघतेच... आणि तू आलीस त्याप्रमाणे !'

' अरेss पण मी म्हणते तिथे एवढे भांडलो आपण ... तेव्हाच नाही का सांगायचे की मी तुझी फियान्सी आहे!'

' तू विश्वास ठेवला असतास? तू तर गर्वाने फुलून गेली होतीस तुझ्यापेक्षा तुझ्या मैत्रिणी किती व्यवस्थित बोलत होत्या!' 

' ओहss असे आहे का? अरेss मग ती रश्मि शेरोशायरी करीत तुला पटवायला निघाली होती... एवढे होते तर जायचे होते ना तिच्यामागे?' गरिमा थोडी चिडून म्हणाली.

' हे बघ ... तुझे ना असे असते ! मी सांगितले असते की आपल्या लग्नाची बोलणी चालू आहे तर तू मला वेड्यात जमा केले असते आणि अपमान केला असतास ते वेगळे !'

' तसे नाही रेss राज्या... इतक्या मुलींसमोर मी माझे मन उघड करू शकणार होते? खरंतर मलाही तू मनापासून आवडला होतास पण हिंमत होत नव्हती. म्हणतात ना प्यार में पहले पहले इकरार फिर इजहार होता है। पण काय रे ही पॕकेटस अदलाबदलीची कल्पना तुझीच ना ?' गारिमा संशयाने पाहत म्हणाली.

' अर्थातच... टेलर मास्टरला पटवून ठेवले होते. त्याने बरोबर बिझी असल्याचा बहाणा करीत काऊन्टरवर फक्त माझीच बॕग पॕक करून ठेवली होती आणि प्लॕनप्रमाणे तू उचललीस!' 

' गव्हर्नमेंट काॕलेजमधील इव्हेंटला का नाही आलास तू ?' 

' आलो होतो मी... प्रेक्षकांत बसून होतो. माझ्या असिस्टंटने शेफालीला गाठून तुझे पॕकेट सोपवले आणि मी आलो नसल्याचा निरोपही दिला होता!'

' काय पण ना ही अशी बनवाबनवी ? बरं माझा परफाॕर्मन्स आवडला ?'

' आवडला काय म्हणतेस आयोजकांनी तुझ्या डान्सची लाईव्ह फोटो शूटिंग केलेली क्लिप मला सेंड केली रात्री आणि आईने देखील बघितली ती !'

' मग आई काय म्हणाल्यात ?'

' खूप गोड आहे हो मुलगी... उद्याच घेऊन ये आपल्या घरी !'

' मग हा हाॕटेलचा घाट कशासाठी घातलास ?'

' तर मग काय तुला हाॕलिडे होमवरून पिकअप करून उडवून नेणार होतो. तुझ्या इतर बाकीच्या मैत्रिणींना सुगावा लागला असता मला हाॕकी स्टिक्सनी बडवून काढला असता म्हणजे?' राहुल डोळे मिचकावून हसत म्हणाला. गरिमालाही हसू आवरले गेले नाही. ती खो खो हसू लागली.

' राहुल आता आपण कुठे जात आहोत.... मघाशीच सिटी कोर्ट मागे गेले आणि आता सिटीमध्ये जात आहोत?'

' हो राणीss आपण आपल्या पॕलेसवर जात आहोत... तू बघं तरी आपला बंगला किती मोठा आणि सुंदर आहे!'

' ज्या घरात आई आहे तो सुंदरच असणार ना?'

' अरेss वाss सासूबाईंना पटवून घ्यायला एक मिनिटदेखील लागणार नाही तुला... छान आहेत विचार तुझे !' 

' माझ्या नशीबात तू होतास आणि सिमल्यात भेटलास... इटस अ ग्रँड सक्सेस आॕफ लव्ह इन सिमला स्टोरी!' म्हणत त्याच्या मिठीत शिरून गरिमाने डोळे बंद करून घेतले. जीपमधील रेडिओवर भूले बिसरे गीतमाला चालू होती व कानावर ' शादी के लिये रजामंद कर ली... रजामंद कर ली.... मैंने इक लडकी पसंद कर ली' गीताच्या ओळी पडतात गरिमा खुदकन हसली व दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफून पडून राहिली. जीप भरधाव वेगाने हाय वे वरून पळत सिमला वनविभागाकडे जात होती.

--------------समाप्त----------------


Rate this content
Log in