लघू कथा
लघू कथा
1 min
232
अबोला
एकदा अनूचे आणि तिच्या मोठ्या जावेचे कुठल्यातरी कारणाने वाद झाले आणि त्याचं रूपांतर थोड्याशा (?) वादळात होऊन शेवटी अबोला निर्माण झाला. दोघी एका गावात रहात नव्हत्या त्यामुळे हा अबोला चांगला दोन वर्षे टिकला. अनूपण जिद्दीने कुठल्याच कार्यक्रमाला जावेकडे गेली नाही व जावेनेही बोलावले नाही. असंच एका लग्नानिमित्ताने दोघी समोरासमोर आल्या आणि नकळत गळ्यात पडून रडल्या...अहंकार गळून गेला अन् दोन वर्षें आपण काय काय मिस केलं याच्या कथा रंगल्या.