लाईव्ह कार्टून
लाईव्ह कार्टून
अगं ऐकलंस का?.... आई पप्पांना, म्हणाली.
आजी हसली, पिंटू तुला वेगळी गोष्ट का हवी?
ती ही कार्टून असलेली, तुझे मम्मी पप्पा कधी कधी तसेही वागतात.
कसे गं आजी?
आई म्हणाली, अहो भांड्यांना पावडर लावली, ना
हो पप्पांचे उत्तर
हो पण ती नीट धुवायला लागते आई ओरडली.
किती नीट धुवावी लागतात, माझे हातच काय भांडीपण झिजली आहेत घासून.
पिंटू व आजी हसले. पण कार्टून कसे करणार त्यांना.
आजी म्हणाली, तुझी आई म्हणजे एक खारुताई समजू व पापा दुसरी. त्यांना घरी राहण्यासाठी राजाने सांगितले. पण दोघेही घरी शांत बसेना. मग म खारूताईला घरात खूपच काम वाढलं व प खारुताईला कामच नव्हते कारण बाहेर लाॅकडाउन होते. मग खारुताईने आपल्या झुपकेदार शेपटीने घर साफ करण्यास घेतले. पण काम करता करता झुपका बारीक झाला आणि दोघे भांडू लागली. आजी हसतच म्हणाली.
आईने "तुम्ही का हसताय"? असे विचारले
लाईव्ह कार्टुन बघतोय. पिंटू म्हणाला!!.