एक प्राचीन युद्ध प्रेम कथा
एक प्राचीन युद्ध प्रेम कथा
घमासान युध्द चालू होते. यूनानी राजपुत्र, अँगनॉन प्राचीन मेसिनीयाच्या युद्धाचे नेतृत्व करत होता. त्याच्या युद्ध कौशल्य व शौर्याने, शत्रू अणि मित्र सैन्य दिपून जातात . मेसिनीयाच्या बलाढ्य भिंती समोरील पुल खाली सरकत होता. ही करामत अँगनॉनने कशी केली हे कळण्याचा आत, मेसिनीयाच्या गढाची भिंत कोसळते! यूनानी सैन्य शहरात घुसते, त्या काळा प्रमाणे लूटमार, खूनखराबा सुरू होतो. अँगनॉनला याच्यात स्वारस्य नसे. तो फक्त योद्धा असण्यात आनंदी.. बाकी गोष्टी त्याचे सेनापती बघत.
"युवराज" "मेसिनीया मंदिरातील मौल्यवान मूर्त उचलण्याचा मान आपला".
अँगनॉन फार स्वारस्य न दाखवता रीत पूर्ण करण्यास मंदिरात प्रवेश करतो.
अपोलो देवतेच्या भव्य मूर्ती समोर, मेणबत्तीच्या प्रकाशात, ती त्याला प्रथम दिसते... जखमी, हातात रक्ताळलेले खंजीर, एक मृत यूनानी तिच्या पायथ्याशी.
ते सौंदर्य पाहून, तो आश्चर्याने उद्गारतो,
"कसांद्रा" ही दंतकथा खरी आहे की काय! "
कसांद्रा ही मेसिनीयाची मंदिर देवतांची रक्षण करणारी राजकन्या. तिचे सौंदर्य, शौर्य व बुद्धिमत्तेच्या अनेक दंतकथा, त्याने ऐकल्या होत्या़ पण त्या साफ खोट्या, त्याची समजूत. तेवढ्यात कसांद्रा बेशुद्धावस्थेत, त्याच्या पिळदार, शक्तिशाली बाहुमध्ये पडते. तिला उचलताक्षणीच, एक अजब शांतता त्याच्यात संचारते. (दंतकथे प्रमाणे, कसांद्रा स्वच्छेने जिथे असेल, तिथे शांती, संस्कृती , पण अति वैभव, युध्द पराक्रम पासून दूर अशी स्थिती संबोधली जात असे) अशा आकाशवाणीमुळे, प्राचीन काळानुसार, तत्कालीन राजांना, कसांद्रा अजिबात नको होती.
"तिला सोडा, अपोलोची सुवर्णमूर्ती उचलण्याचा मान तुमचा." असे म्हणत सेनापती व सैनिक बाजूस होतात.
अँगनाँन फक्त इशारा करतो व त्याची नजर युद्धातील मृतांच्या राशीवर स्थिरावते अणि त्याची युद्ध पराक्रमाची हव्यास, जिंकण्याचा थरार, कुठे संपुष्टात येणार याची जाणीव अँगनॉनला प्रकर्षाने होते. ज्या मूर्तीमुळे युध्द जिंकू शकतात, ऐश्वर्य पायाशी लोळण घेतं, ती मौल्यवान मूर्ती न उचलता अँगनाँन मंदिराबाहेर का पडतोय याचे सर्वांना आश्चर्यच वाटते.
पण कळत न कळत कसांद्रा, अनावधानाने त्याच्या बाहुत समेटली होती व अँगनाँनची आता पूर्ण खात्री पटली होती की जगातील
सर्वांत मौल्यवान वस्तू त्याला मिळाली होती.
Any resemblance of the story characters with any ancient mythological, characters is a pure coincidence.
Writer. (nandini)