कष्टाचं फळ
कष्टाचं फळ
एक छोटस गाव. निसर्गाने नटलेल , आणि गोंधळाने भरलेल . पण या गजबजलेल्या गावात एक वेगळीच शांतता वाटायची . मन अगदी रमून जायचं . एका बाजूने सूर्य उगवला की सर्वांची कामाची गडबड सुरू व्हायची . अशा या गावामध्ये एक गरीब कुटुंब होत .
एकादशी नावाची स्री आणि तिची दोन मुले .
एवढ च त्याचं जग . मोठा मुलगा राहुल आणि दुसरा लखन . त्याचं वडील ते लहान असताना च स्वर्गवासी झाले .त्यामुळं एकादशी वर अगदी कमी वयात मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली .
परिस्थिती शी झुंज देत ती तिच्या मुलांना वाढवत होती .मायेचं अंथरुण देत संस्काराची चादर पांघरत होते . बघता बघता मुले मोठी झाली .
राहुल च लग्नाचं वय झालं. एक सुंदर आणि संस्कारी मुलगी बघून त्याच लग्न केलं. दिवस उलटत होते तसेच त्यांचा संसार फुलत होता . या संसारात एक नवी कळी फुलली आणि त्यांना पहिली मुलगी झाली .
घरात लक्ष्मी आली म्हणून सर्वजण आनंदी झाले .
तिच्या बोबड्या शब्दांनी घर अगदी आनंदून जायचं.तीच नाव ठेवलं हर्षदा.
हर्षदा 2 वर्षांची झाल्यावर पुन्हा घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली .पण ईश्वराच्या मनात काय होते.ते उमगले नाही.त्यांना दुसरा मुलगा झाला .पण जन्म देताना राहुल च्या पत्नी चा मृत्यू झाला . घरावर दुःखाचा डोंगर कोसळला . 2 लहान लेकरावरच मायेचा हात हरवला होता.एकादशी ने हार मानली नाही .स्वतःला सावरत तिने त्या मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
गरिबी संपत नव्हती .आणि कर्ज वाढत होत.दोन्ही लहान मूल आता मोठी होत होती . शाळेत जाऊ लागली .दोघ ही अभ्यासात हुशार .एकादशी ने परिस्थिती वर मात देऊन त्यांना शिकवत होती . रक्ताच पाणी करत होती . त्या दोन्ही मुलांना शिकवून तिने त्यांच्या पायावर उभ केलं.तसेच राहुल च दुसर लग्न लावून दिलं.तिचा वाईट काळ संपला होता.घर आनंदाने भरलं होत.
शेवटी तिने देवासमोर हात जोडले आणि धन्यवाद दिला.तिने केलेल्या कष्टाच फळ दिला भेटल होत.दुःखाचे क्षण भोगल्या मुळे सुखाचे क्षण तिला स्वप्नगत वाटू लागले .
