काटेरी कुंपण
काटेरी कुंपण
अकोला जिल्ह्यातील खेडेगाव ,गावाचं नाव राजापूर ,मुख्यत्वाने लोकांचा व्यवसाय म्हणजे शेती. वडिलोपार्जित शेती सांभाळत फावल्या वेळात छोटा-मोठा व्यवसाय करत गावकरी मंडळी उदरनिर्वाह करत होते ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे मुलाबाळांचे संगोपन लग्नकार्य करीत होते गावचे सरपंच राघोबा पाटील, गावात त्यांची वेगळीच शान होती मोठ्याप्रमाणात शेतीवाडी, ट्रॅक्टर, चार चाकी गाडी ,धान्याची कोठारे, गाई म्हशी बैल यांनी भरलेला अत्याधुनिक गोठा असे त्यांचे वैभव होते, वाड्यावरची सातत्याने लोकांची बस होती पाटलांच्या घरी खऱ्या अर्थाने लक्ष्मी वास करीत होती महालक्ष्मी सारखा गोल चेहरा असलेल्या लक्ष्मीबाई ,कपाळी आडवे कुंकू भलामोठा केसांचा अंबाडा घालायच्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या लक्ष्मीबाई म्हणजेच पाटलीन बाई लक्ष्मी प्रमाणेच शोभून दिसायच्या त्यांना तीन मुली होत्या रमा ,उमा, आणि सुमा.
पाटलांच्या नशिबात मात्र पुत्र सुख नव्हते वंशाला दिवा नाही म्हणून पाटील लक्ष्मीबाईंचा राग राग करायचे त्यांना सासुरवास करायचे, तिन्ही मुलीच झाल्या म्हणून ते मुलींवरही चिडचिड करायचे मुलींशी ते फारसे प्रेमाने वागत नसत जेमतेम दहावी . बारावीपर्यंत शिक्षण केल्यावर त्यांनी मुलींची लग्नही उरकून टाकली सुमि तशी उशिराने झालेले अपत्य मुलगा होईल या आशेने झालेले अपत्य म्हणजे सुमि तिसऱ्यांदा ही मुलगीच झाली म्हणून पाटील तिचाही रागच करायचे , सुमि दिसायला सुंदर होती , अतिशय हुशार होती आणि चपळ होती सुमि बारावीत चांगल्या मार्गाने पासही झाली पुढचे शिक्षण घेण्यासाठी तिने वडिलांकडे अट्टाहास धरला पुढचे शिक्षण घेण्यासाठी पाटील बुवांनी तिला बऱ्याच अटी घातल्या त्या अटी मान्य करीत तिने पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंग साठी प्रवेश मिळवला ती पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला होस्टेलमध्ये राहू लागली. वडिलांनी घराला घातलेले काटेरी कुंपण ओलांडून सुमा पहिल्यांदाच घराबाहेर पडली होती, पाटलीन बाई त्यामुळे सुखावल्या होत्या ,पण त्यांना सुमिची फार आठवण येत होती अधून मधून फोनवर खुशालीचे बोलणे होत होते. तशी पाटलीन बाईंची तब्येत फारशी चांगली नव्हती.
आधुनिक काळात वावरतांना उच्च शिक्षण घेत असताना अवतीभोवतीचे वातावरण मुळे सुमा फार बदलली होती चार चौघी मुलींप्रमाणे तिचा पेहराव रहाणीमान बदलले होते वर्गातील मित्र मैत्रिणींसोबत गंमत जंमत करणे, एकत्र जेवण करणे, कधीकधी उपहारगृहामध्ये एकत्र नाश्ता घेणे असे । दिवस जात होते सुमाचे शिक्षणाचे आता शेवटचे वर्ष सुरू झाले होते ती चा वर्गमित्र अतुल हुशार मुलगा होता स्कॉलरशिप मिळवत तो त्याचे शिक्षण घेत होता घरची परिस्थिती जेमतेमच होती मनमिळावू स्वभावाचा अ तू ल त सुमाला नेहमीच मदत करायचा त्यातूनच त सुमाची आणि त्यांची ची बरीच गट्टी जमली आणि हळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर दोघेही पुण्यातच छोटी-मोठी कामे करू लागली एकदा का परीक्षेचा निकाल लागला किं मग चांगली नोकरी शोधून थोडं स्थिरस्थावर झाल्यावर लग्न करायचे असे त्यांचे नियोजन होते त्यांच्याच गावातील मंगू चौधरी चा मुलगा सुशांत त्यांच्याच महाविद्यालयात शिकत होता त्यालाही सुमा आवडत होती काही ना काही निमित्ताने तो सु माशी बोलण्याचा प्रयत्न करत असे पण सुमाने त्याला कधीही भाव दिला नाही त्यामुळे सुशांत नेहमी अतुलचा तिरस्कार करत असे सुमा आणि अतुल एकत्र दिसले की त्याची घालमेल होत असे
सुशांत ही पेपर संपल्यावर गावाकडे सुट्टी मध्ये गेला सुमा बद्दलचा राग त्याच्या पोटात खदखदत होता ,सुटीसाठी गावी येता च योग्य वेळ पाहून त्याने पाटलांची भेट घेतली ओढून ताडून सुमाचा विषय काढला आणि पाटलांच्या मनात सुमा विषयी विष भरले सुमाच्या आणिअतुलच्यामैत्रीबद्दल चे गुपितही त्याने पाटलांसमोर उघड केले सुमि अतुलबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले ही गोष्ट ऐकताच पाटील प्रचंड संतापले त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलावले आणि सुशांत समोरच त्यांचा पान उतारा केला बघा बघा लक्ष्मीबाई तुमची कन्या काय गुण उधळतेय ,रागाच्या भरात पाटील बुवांनी चांगलीच आदळआपट केली आणि समजवा जरा त्या नालायक सुमिला असे म्हणत पाटील गच्चीवर निघून गेले दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाईचीतब्येत ठीक नाही असे खोटे सांगत पाटील बुवांनी सुमिला ताबडतोब गावी बोलावून घेतलेआपला प्रियकर अतुल चा निरोप घेऊन सुमि निघाली, आईची तब्येत कशी काय बिघडली काय झाले असेल कसे झाले असेल वगैरे विचार करतच सुमि गावी पोहोचली. आईच्या विचाराने तिच्या छातीत धडधड त होते विचारचक्र जोरात चालू होते कधी एकदा घरात पाऊल ठेवते असे तिला झाले.
घरात पाऊल ठेवताच सुमीची नजर आईला शोधू लागली आईला बघताच सुमिने तिला जोरात मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागली तसे लक्ष्मीबाईने ही सुमिला छातीशी कवटाळले मी धडधाकट आहे काळजी करू नकोस रडू नकोस असे समजावले थोड्या वेळात सुन मि सावरली आपल्याला खोटा निरोप मिळाला याचे तिला आश्चर्य वाटले तसेच सुमि अचानक घरी कशी काय आली याचे तिच्या आईला म्हणजेच लक्ष्मी बाईला आश्चर्य वाटले तितक्यात पाटील साहेब घरातआले सुमाला पाहताच तिला खाऊ की गिळू असे त्यांना झाले त्यांची भेदक नजर सुमिचे काळीज चिरू लागली काही कळायच्या आतच सुमीच्या कानामागे दोन फटके ओढले गेले हो पाटील बुवानीच सुवि च्या कानामागे लगावली होती या सगळ्या प्रकाराने सुमि पुरती गोंधळून गेली तेवढ्यात करारी आवाजातील पाटील बुवांचे शब्द तिच्या कानी पडले कार्टे आमच्या नावाला, तोंडाला काळे फास ते स काय आमच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे की काय तुला आता गुमान घरात थांबायचं घराच्या बाहेर पाऊल टाकले तर याद राख अजिबात बाहेर जायचे नाही कोणाशी बोलायचे नाही आणि आत्ताच सांगून ठेवतो तुमचे लग्न आम्ही जमवलं ढोरे पाटलांच्या शेराशी तुमचे लग्न होणार आहे बस ठरलं म्हणजे ठरलं यापुढे एक शब्द कोणी बोलायचं नाही, पाटलीन बाई ऐकलं ना काय सांगतोय ते,
पाटलांपुढे बोलायची कुणाची हिम्मत नव्हती उठा आता लग्नाची तयारी करा पाटील बाईन वरती खेकसत पाटील बाबांनी हुकुम सोडला बस आता पर्याय नव्हता सुमिचे लग्न पक्के म्हणजे पक्के या निर्णयामुळे सुमि मात्र पक्की हिरमुसली तिच्या स्वप्नातील राजकुमार आता तिला मिळणार नव्हता तिच्या रंगीत स्वप्नांच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या वाऱ्याने यावे आणि नाजूक हाताने बनवलेला पत्त्याचा बंगला कोसळून जावा अशी सुमि ची अवस्था झाली होती तिच्या मनाविरुद्ध ती बापाच्या खोट्या सन्माना खातीर बोहल्यावर उभी राहिली सुमा चे लग्न धूमधडाक्यात पार पडले ढोरे पाटलांच्या घराचे माप ओलांडून ती आता ढोरे पाटलांची सुन् झाली होती ढोरे पाटलांचा वंशाचा दिवा म्हणजे शेरा एकुलता एक पोरगा ,अतिशय लाडाकोडात वाढलेला मौज मजा मस्ती आणि पैशाची मुक्त उधळण करत शेरा गावभर उंडरत होता शेरा आणि सु मि चा संसार सुरु झाला होता पण संसारात अजिबात गोडी नव्हती त्यातच शेरा कधीकधी दारू पिऊनही घरी येत होता पण सुमि पुढे दुसरा इलाज नव्हता आहे तसाच संसार पुढे रेटणे भाग होते सुमिने शेराला सुधरवण्यासाठी बराच प्रयत्न केला पण गाडी काही रुळावर येत नव्हती शेराच्या अशा वागण्याने तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता चुलीतले लाकुड चुलीतच जायचे त्याला इलाज नव्हता बरे माहेरी काही बोलायची सोय नाही तरीही हार न मानता एक दिवस परिस्थिती बघून सुमिने तिच्या सासरेबुवांना नोकरीचा विषय काढून पाहिला व मी कंप्यूटर इंजिनियर असून नोकरी करायला काय हरकत आहे असे विचारले माहित नाही कसे काय पण ढोरे पाटलांनी ही तिचा हा प्रस्ताव मान्य केला
सुमीला खूप आनंद झाला निदान आपल्या शिक्षणाचा तरी उपयोग होतोय याचे तिला समाधान वाटलेआणि मग तिने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अर्ज केले आणि एका चांगल्या कंपनीत तिला नोकरीची संधी मिळाली गावाजवळच कंपनी असल्याने तिच्या सोयीचे झाले मग सुरू झाली नोकरीसाठीची लगबग काही दिवस अतिशय आनंदाने पार पडले खरेतर तिचे नोकरी करणे तिच्या नवऱ्याला पसंत नव्हते पण प्रत्यक्ष वडिलांनी होकार दिल्यामुळे शेराचा इलाज नव्हता म्हणून काहीना काही कुरबुर काढून तो तिच्याशी भांडू लागला व घटस्फोटाची धमकी देऊ लागला शेराच्या रोजच्या कटकटीला सुमा पार वैतागली होती काय करावे तिला सुचत नव्हतेअशातच सुमिची कॉलेज मैत्रीण मधुरा तिचा फोन आला मधुरा चा आवाज ऐकून सुमाला काय आनंद झाला असेल ,कित्येक दिवसानंतर मोकळी बोलता येईल अशी व्यक्ती भेटली होती आणि ती प्रत्यक्ष मधुरा, मग सुमाने आत्तापर्यंत झालेल्या सर्व गोष्टी कथन केल्या आणि सध्या ती कशी जगते आहे तेही सांगितले तिची कर्मकहाणी ऐकून मधुरा सुन्न झाली पण तिने सुमाला धीर दिला आणि सांगितले असे कुढत कुढत जगण्यापेक्षा तू पुण्यात ये आणि चांगला जॉब शोध सर्व काही ठीक होईल पुण्यात माझा फ्लॅट आहे तुझी राहण्याचीही सोय होईल तू काही चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी आहे. इकडे सुमिचे हाल पाहून पाटलीन बाई ही आजारी पडल्या होत्या त्यांची तब्येत काही केल्या ठीक होत नव्हती आणि एक दिवस सुमाच्या विचारातच पाटील बाईंनी देह ठेवला सुमा चा तर आधार वड च नष्ट झाला प्रेमाचे म्हणावे असे आता गावात कोणी उरले नव्हते
मग मधुराने दिलेला सल्ला सुमाला आठवला आणि तिने पुण्याला जायचा निर्णय घेतला होईल त्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी तिने बळ एकवटले आता आई नसल्याने तिचीही काळजी नव्हती आणि सुमा पुण्याला निघून गेली जॉब शोधला चांगला पगार मिळू लागला मग तिनेआपल्यानवऱ्याला घटस्फोट दिला आता ती नव्या दमाने नव्या उत्साहाने जीवन जगू लागली तिची मैत्रीण मधुरा तिला मानसिक बळ देत होती 2 ,4 वर्ष एकाच कंपनीत काम केल्यानंतरही तिला मनासारखा पगार मिळत नव्हता म्हणून तिने कंपनी बदलण्याचे ठरवले आणि मग पुन्हा काही कंपन्यात अर्ज केले त्यापैकी एका कंपनीतून तिला कॉल आला पगारही चांगला मिळणार होता त्यामुळे मुलाखतीची तिने तयारी केली आणि मुलाखतीसाठी कंपनीमध्ये हजर झालीअनेकजण मुलाखतीसाठी आले होते एक एकाचा नंबर येत होता तसा सुमाचा जीव खालीवर होत होता आणि मग तिचा शेवटचा नंबर आला मोठ्या आत्मविश्वासाने सुमा मुलाखतीसाठी हजर झाली अतिशय देखना आणि राजबिंडा असा ऑफिसर म्हणजेच कंपनीचा मालक होता त्याला पाहून ती क्षणभर थबकली ,या मॅडम, या .तिच्या कानावर आवाज पडला सी८डावुन प्लीज ,थँक्यू सर म्हणत ती खुर्ची वर बसली आणि मग सुरु झाली मुलाखत कामा संबंधीचे प्रश्न उत्तरे सुरू झाली विचारलेल्या प्रश्नांना ती आत्मविश्वासाने उत्तरे देत होती काही तांत्रिक प्रश्न झाल्यानंतर मग सहजच तिला तिच्या जोडीदाराविषयी प्रश्न विचारण्यात आला तशी ती एकदम विचलित झाली तिला हा प्रश्न अजिबात अपेक्षित नव्हता आणि अचानक ती रडू लागली तसा ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आपण मुलाखतीला आलेलो आहोत हेती क्षणभर विसरून गेली आणि आपला छळ होत होता आणि म्हणून घटस्फोट झाला आहे हे ती बोलून गेली त्याचक्षणी पाणी पिण्यासाठी म्हणून मुलाखत घेणाऱ्या साहेबांनी तोंडावरील मास्क खाली घेतला चेहऱ्यावरील मास्क खाली घेताच साहेबांचा पूर्ण चेहरा सुमिच्या नजरेस पडला आणि तिला धक्काच बसला एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक म्हणजे अतुल होता तिचा महाविद्यालयातील मित्र तिचा जीवलग, तिचा सखा, क्षणभर ती विचलित झाली तिने अतुल ला ओळखले होते एवढी वर्ष गेली होती आता त्याचे लग्न झाले असेल मुलेबाळे झाले असतील व तो त्याच्या संसारात सुखी असेल त्याने आपल्याला बघितले ओळखले तर त्याच्या सुखामध्ये आपला अडसर निर्माण होईल असे तिला वाटले आणि मग अचानक सॉरी सर मी नाही थांबू शकत असे म्हणत ती बाहेर पडली
तिच्या अशा वागण्याचे अतुलला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण येताक्षणीच त्याने सुमतीला ओळखले होते पण त्याने तसे दर्शवले नव्हते आणि म्हणूनच उत्सुकतेपोटी त्याने मुलाखतीत तिला तिच्या नवऱ्या विषयी व्यक्तिगत प्रश्न विचारला होता सुमा बाहेर पडली होती तसे अतुलने आपल्या महिला कर्मचाऱ्यास तिला थांबविण्यास सांगितले पण सुमा ऐकण्याच्या तयारीत नव्हती मग अतुल स्वतः खुर्चीवरून उठला आणि बाहेर जाऊन तिला थांबवू लागला ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती तिला अतुलचा 'संसार विस्कळीत करायचा नव्हता पण मग धीर करून अतुल तिला म्हणाला अगं ऐकून तर घे फक्त पाच मिनिट, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे नंतर मात्र मी मी कधीही तुला भेटणार नाही, बोलणार नाही तसे मग तिलाही आपल्या वागण्याचे थोडे आश्चर्य वाटले आणि ती त्याच्याशी बोलायला तयार झाली मग ते त्याच्या पर्सनल केबिनमध्ये बसले आणि मग अतुल तिला आपला इतिहास सांगू लागला सुमती, मी तुला आल्याआल्याच ओळखले होते पण तू विवाहित असून तुझ्या संसारात तू आनंदी असशील आणि तुला डिस्टर्ब करणे मला योग्य वाटले नाही पण तुझ्या घटस्फोटाबद्दल ऐकल्यावर मला खूप खूप वाईट वाटले आणि त्याच बरोबर एकीकडे माझ्या आशा पल्लवित झाल्या खरेतर तू अचानकपणे पुणे सोडून गावी गेल्यावर आपला संपर्क झाला नाही आणि मी खूप खूप डिस्टर्ब झालो काम धंदा नोकरी काहीही करू नये असे वाटू लागले परंतु आपल्या मित्रांनी समजावल्यानंतर मग मात्र हळू मी स्वतःला सावरले आणि हा व्यवसाय सुरू केला हळू व्यवसाय वाढत जाऊन आज त्याचे रूपांतर या कंपनीत झाले आहे पण तुझी आठवण काही केल्या मनातून जात नव्हती त्यामुळे मी लग्न केले नाही जगायचे तर तुझ्याच आठवणीत आणि मरायचे तर तुझ्याच आठवणी त असा निश्चय केला आणि कंपनीचे काम करत राहीलो म्हणूनच या कंपनीचे नावही सुमती कम्प्युटर्स असे आहे त्याची जीवन कथा ऐकत ऐकतच सुमतीचा हात केव्हा त्याच्या गळ्यात पडला हेच तिलाही समजले नाही
...आणि मग अतुलने तिला आपल्या मिठीत घेतले त्याच्या स्पर्शाने तिचे अंग शहारले होते आकाशात काळे ढग जमा व्हावे आणिअचानक गारवा सुटून काळे ढगांचे रूपांतर पावसात व्हावे तसे झाले .धुळीने माखलेली झाडे डोंगर-दऱ्या पावसाच्या सरींमुळे स्वच्छ धुतली जाऊन त्यांना ताजेतवाने रूप प्राप्त व्हावे वेलींना नवी पालवी फुटावी रंगीबिरंगी फुले फुलावी नव्याने बहर यावा तसा अतुल आणि सुमतीच्या मिलनाला बहर आला होता...
