MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

जीवनाचा अंत

जीवनाचा अंत

1 min
360


    शुभमला त्याच्या वडिलांनी म्हैस धुवून ये असं सांगितले. शुभम म्हैस धुण्यासाठी विजय या मित्राला घेऊन गावाबाहेरील तलावावर गेला. विजय बोलला, “शुभम तलावात खोलवर जाऊ नको आपल्याला पोहता येत नाही.” त्यावर शुभम विजयला म्हणाला, "तू किनाऱ्यावरच राहा मी म्हशीची शेपूट पकडून बरोबर निघून जातो.” दोन्ही मित्रांनी म्हैस थोडया पाण्यातच धुतली. पाण्याची थोडी मज्जाही घेतली.


नंतर शुभम म्हशीची शेपूट पकडून पाण्यात जाऊ लागला. विजय ओरडला, मित्रा आत जाऊ नको तुला पोहता येत नाही. पण शुभम न ऐकता म्हशीसोबत तलावात आत शिरला. म्हशीचे पाय चिखलात रूतले. त्याला शुभमने काढले. म्हैस बाहेर यायला लागली पण शुभमच्या हातातून शेपूट घसरली व तो पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत नव्हते म्हणून तो निघू शकला नाही. त्याचा पाण्यातच जीव गेला. 


तात्पर्य : जे काम आपल्याला येत नाही त्यावर भरवसा करु नये हेच जीवन आहे.


Rate this content
Log in