Haresh Magar

Others

2  

Haresh Magar

Others

जागतिक टपाल दिन

जागतिक टपाल दिन

1 min
123


एक पत्र पोस्टमनसाठी


आदरणीय, 

         सर्वच पोस्टमन


        नमस्कार, सर्वप्रथम तर जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञानाच्या प्रगतीमुळे तुमची किंमत जरी कमी झाली असली तरी तुमची गरज कमी झालेली नाहीये. सगळ्यांचे पत्र पोहचवणारे तुम्ही, तुमच्यासाठी कोणी पत्र लिहत असेल का हो ? उन्हाळा आला की पोस्टमन काकांना पाणी तरी विचारा असल्या आवाहनाचे संदेश सोशलमिडीयावर टाकण्या व्यतिरिक्त आम्ही आणखी काही करू शकतो का या बाबत विचारही करत नाही. आताच्या whatsaap आणि Facebook च्या जमान्यात पत्रांची आणि चिठ्ठीचे महत्त्व जरी कमी झाले असले तरी पत्रातील मजकुर वाचताना येणारा चेहऱ्यावरील हसु आणि टचकन दाटलेला डोळ्यातलं पाणी whatsaap ची chatting नाही देऊ शकत. मनातील भावना ओतून लिहिलेला पत्र आमच्यासाठी घेऊन येणारे तुम्ही सर्व पोस्टमन आमच्यासाठी देवदुतच असायचे आणि आहात. ज्या भावनेनं मुलगा आई साठी पत्र लिहायचा, ज्या भावनेनं गावंतला भाऊ शहरातील भावासाठी पत्र लिहायचा, ज्या भावनेनं राखीपोर्णिमेला बहीण भावासाठी पत्र लिहायची त्याच भावनेनं मला आज तुमच्यासाठी पत्र लिहावसं वाटलं. तुम्ही कोणत्याही वयातले असोत आमच्यासाठी तुम्ही ग्रेटच आहात. म्हणून तर मायना लिहताना आदरणीय असाच उल्लेख केलाय. त्या आदराचे तुम्ही

हक्कदार आहात. 


        एखाद्या  तरुणाचा भारतीय सैन्याचा प्रवेशपत्र आणून देणारे तुम्ही त्याच्या साठी तर आनंदाची शिदोरीच आणलेली असते. त्याच्या मेहनती सोबतच त्याच्या आनंदाचे खरे कारण तुम्ही बनलेलं असतां. सीमेवरुन आलेलं पत्र त्या सैनिकाच्या आईला वाचुन सांगणारे त्याच्या भावना त्याची खुशाली तिच्या पर्यंत पोहचवणारे तुम्ही तिच्यासाठी देवदुतच असतां. चातक जेवढां पावसाची वाट पाहत नसतो तेवढी हे वाट तुमची पाहत असतात. अशा सर्व आईंचा आशिर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतो. शेतीचं नुकसान झालेल्या गावांतील भावाला शहरातील भावाने पाठवलेली मनीआॅर्डर जेव्हा तुम्ही घेऊन येतां तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी कुबेरापेक्षा कमी नसतां. जेवढं प्रेम भावासाठी दाटून येतं तेवढंच प्रेम त्यावेळी तुमच्यासाठीही दाटून आलेलं असतं. नोकरी निमित्ताने बाहेरगांवी असलेल्या भावाला रक्षाबंधनला आपल्या बहिणीला भेटतां येत नाही. बहिणीची राखी भावापर्यंत वेळेवर पोहचवणाऱ्या तुम्हा पोस्टमनच्या हाताला अजून राखी लागलेली नसते. कर्तव्यनिष्ठता काय आहे ते तुमच्याकडून शिकावं. यंदाच्या कोरोना महामारी मुळे सर्वच जण घरात कोंडले गेलेत. त्यामुळे सर्वच सणांच्या आनंदावर विरजण पडलं. अशातंच यावर्षी विक्रमी संख्येत पोस्टात राख्या आल्या, त्या वेळेवर पोहचाव्या म्हणून तुम्ही तुमची सुट्टी सुद्धा त्यागलीत. 


         कोणाचा जाॅबचा अपाॅयमेंट लेटर असो वा कोणाची नोटीस. कोणाची मेडिसीन्स असो वा कोणाचं पार्सल. कोणाचं पत्र असो वा कोणाची मनीआॅर्डर तुम्ही नेहमीच ती योग्य वेळेवर आमच्यांपर्यंत पोहचवलीत. हे सर्व घेऊन येणारा पोस्टमन आम्हाला नेहमीच आवडतो पण मग दिवाळीला बक्षिसी मागणाऱ्या पोस्टमनचा तिरस्कार का करतो. नेमका त्याच वेळेला हा पोस्टमन दुर्लक्षित कसा केला जातो. आपल्या सणांच्या वेळी आपल्या आप्तस्वकीयांकडून मिळालेल्या भेटी , पत्रे आपल्यापर्यंत पोहचवून आपला आनंद द्विगुणीत करणाऱ्या पोस्टमनना आपल्याकडून दिवाळी बक्षिसाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का ? 


          मी या पत्राद्वारे जनतेला आवाहन करू ईच्छितो की , वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्या आयुष्यातून पोस्टमनचे महत्त्व जरी कमी झालेलं असले तरी गरज संपलेली नाहीये. उन्हाळा पावसाळा हिवाळा ते नेहमीच आपल्यासाठी झटत असतात फिरत असतात. आपल्या दाराशी आलेच कधी ते तर त्यांना पाण्याचा ग्लास नक्कीच पुढे करा. मागितलीच कधी दिवाळी त्यांनी तर कधी नाही म्हणू नका. त्या अधिकाराचे धनी आहेत ते त्यांचा आदर करा. आता तुम्ही म्हणत असाल की त्यांना पगार मिळतो ना ते फुकट तर नाही ना करत! बरोबर आहे तुमचं पत्र, तुमचं पार्सल, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहचवायचा पगार मिळतो. तुम्हाला आनंद देण्याचा, तुमच्या चेहऱ्यावर हासू आणायचा पगार नाही मिळत त्यांना. निदान त्या आनंदासाठी तरी त्यांचा आदर करा. 


        मी सर्वच पोस्टमन्सना धन्यवाद देतो आणि मन:पुर्वक तुमचे आभार मानतो. पुनःश्च एकदा टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही अशीच इमानेइतबारे सेवा करत रहा, आमचं प्रेम सदैव तुमच्या सोबत आहे. आम्हाला नेहमीच तुमचा आदर होता आहे आणि राहणार. 

            धन्यवाद!


Rate this content
Log in