Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Dr Anjushree Metkar

Others

3.8  

Dr Anjushree Metkar

Others

होऊ कशी मी उतराई...

होऊ कशी मी उतराई...

5 mins
72


रंजन, राजेश,राहुल, ऋता एक अगदी हासरे खेळते चौकोनी कुटुंब.राजेशने मोठ्या कष्टाने आणि आपल्या अक्कलहुशारीने,मेहनतीच्या बळावर धंद्यात जम बसवला होता. रंजननेही त्याला योग्य साथ देत घरची आघाडी उत्कृष्ट पणे पेलली होती. आयुष्याची संध्याकाळ सुखाने व्यतित व्हावी हाच तर उद्देश होता या धरपडीमागे. त्यांची मुलं राहुल आणि ऋता दोघेही बुद्धीवान आणि कर्तृत्ववान निघाली हा तर दुग्धशर्करा योगच होता. राहुल इंजिनिअर झाला आणि बाहेर कुठे जाॅब बघण्यापेक्षा घरच्याच businessमध्ये लक्ष घालण्याचे त्याने ठरवले.राजेशही खुपचं निश्चिंत झाला .अल्पावधितच राहुल ने धंद्याचा turn overवाढवला आणि कंपनीला अधिकच उर्जितावस्था आणली.राहुल चतु्र्भूज झाला राहुलची बायको स्वरा ही उच्चशिक्षित होती तिने घर सांभाळुन कंपनीचा कारभार पहाण्यास सुरुवात केली.आता राजेश ला निवृत्तीचे वेध लागले.आपली धुरा मुलाच्या खांद्यावर सोपवुन राजेश मोकळा झाला आता त्याला आयुष्य मनाजोगते जगायचे होते.पण थोड्याच दीवसात रंजनला पॅरालिसिस झाला आणि घरची जवाबदारी स्वरावर येऊन पडली.


स्वरा ध्येयवेडी होती तिला business expansion करायचे होते पण सासुबाईंच्या आजारामुळे तिला कंपनीतील लक्ष काढुन घ्यावे लागले.सासुबाईंची सेवा मदतनीस मावशींचे सहाय्याने जरी करावयाची असली तरी त्यांचे पथ्यपाणी,औषधे,त्यांचेकडुन करून घ्यायचे व्यायाम याकडे मात्र डोळ्यात तेल घालुन ती काळजी घेत असे.रंजन तर अंथरुणाला खिळलेली.वेळ पडली तर बाईवर विसंबून न रहाता सासुचे diper बदलणे,त्यांना आंघोळ घालणे यागोष्टीही ती बिनबोभाट करत असे कुठलाच अभिनिवेश न बाळगता...


राजेशच्या वयपरत्वे तब्येतिच्या तक्रारी वाढु लागल्या तसतसे willकरायचे विचार त्याच्या मनात घोळु लागले एक दिवस त्याने आपला हा विचार राहुल, स्वरा आणि रंजनपुढे बोलून दाखवला.राहूल आणि स्वराने आपल्या कर्तव्याची जाण ठेवुनी आमचे वृद्धत्व सुसह्य केल्याने आपली सारी इस्टेट कंपनीसकट मुलाला देण्याचा मानस त्याने बोलुन दाखवला.त्यावर राहूल आणि स्वरा पटकन बाबांना थांबवत म्हणाले,"बाबा ऋता जरी सासरी गेली असली तरी मुलगी या नात्याने तिचा इस्टेटीत हक्क आहे.आपण इस्टेटीचे दोन समान भाग करायला हवेत.त्यावर राजेशचे म्हणणे हेच होते कि मी स्वराला उच्तचशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले आहे तिला मी डॉक्टर बनवले आहे आणि तिच्या घरची परिस्थितीही खुपचं सुखवस्तु आहे तर तिला या इस्टेटीची गरज नाही तेव्हा ही इस्टेट तुझ्या नावावर‌‌‌ करतो आणि अंंतिम श्वास घेण्यास मी मोकळा. यावर स्वरा आणि राहुल यांनी कडाडून विरोध केला आणि ऋताला समान हक्क मिळालाच पाहिजे म्हणून हट्ट धरला. वडीलांच्या इस्टेटमध्ये मुलींचा पण हक्क असतो आणि तो आपण नाकारता कामा नये मुलीला तिचे स्त्री धन म्हणून आपण फूल नाही तर फुलांची पाकळी म्हणून या इस्टेटीतील हिस्सा देण्याची गरज आहे. यावर राजेश मात्र हटून बसल.


रुढीवादी,प्रतिगामी विचारांचा पगडा होताच राजेशच्या मनावर. मुलीला इस्टेटीतील वाटा देण्यास त्याचा विरोधच होता.तो राहुलला म्हणालाही,"तू कष्ट करून ही कंपनी अधिकच नावारुपाला आणली आहेस तर तुमचाच हक्क आहे या इस्टेटीवर.पण राहुल आणि स्वराने वकिलांना बोलावून ऋताचे वाटणीसकट वडीलांचे मृत्युपत्र व्यवस्थित करून घेतले रजिस्ट्रीसकट.


ऋता तिच्या संसारात आणि प्रॅक्टिसमधे खुप व्यस्त होती.तिला वेळ मिळेल तशी ती माहेरी उभ्या उभ्या येऊन जायची  थोड्या वेळासाठी.तिला नेहमी स्वराचे कौतुक वाटे. कोणतीही धुसफुस नाही,आदळ आपट नाही ,आरडाओरड नाही स्वतःच्या आईप्रमाणे सासुची सेवा हसतमुखाने करण्यास सदा तत्पर असायची स्वरा. आल्यागेल्यांची उठबस, आगतस्वागत खुप आनंदाने, आग्रहाने करायची ती.इतकी उच्चशिक्षित असुनही कोणताही लवलेश नव्हता तिच्या वागण्यात.अतिशय साधेपणा,नेटकेपणा आणि व्यवस्थितपणा ने कामात तत्पर. ऋताला तिच्या या आपलेपणाचे खुप कौतुक वाटायचे.आपण मात्र आपल्या आईची सेवा करु शकत नाही याचे दुःख मात्र बोचत असे तिच्या मनात.


जूनच्या २६ तारखेला "Heart attack"येऊन राजेश निवर्तला.प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही आपण बाबांना वाचवु शकलो नाही हे guilt मनाला बोचू लागले ऋताच्या. पण बाबांनी तरी हलगर्जीपणा का केला ? का नाही बोलले आपल्या त्रासाबद्दल कुणाजवळ? याचेही तिला आश्चर्य वाटले.एरवी माहेरी उठसुठ यायला जमत नसले तरी फोनवरुन सतत संपर्कात असे ती माहेरच्यांच्या. कधीच कुणाकडुन बाबांची तब्येतिची कुरबुर ऐकू आली नव्हती.तिला खुप वाईट वाटत होते.


बाबांच्या तेराव्यानंतर त्यांच्या मृत्युपत्राचे वाचन वकिलांनी सर्वांसमक्ष केले आणि स्वराला तिच्या अर्ध्या हिस्सा ताब्यात घेण्याची विनंती ही केली पण आताच नको पुढे बघते असे म्हणून ऋता रडतच बेडरुम मध्ये शिरली.राहुल आणि स्वराने तिची समजूत काढण्याचा खुप प्रयत्न केला पण तीचे रडणे थांबायचे नावच घेत नव्हते.आपण आई वडीलांची सेवा करुच शकलो नाही याची जाणीव बोचत होती आणि अधिकच भावनावश होत कंठ दाटून येत होता.राहुल काकुळतीला येऊन तिला म्हणालाही,"अगं ,बाबा गेले म्हणजे तुझं माहेरपण संपले असे थोडीच आहे .तुला हवे तेव्हा येत जा हक्काने हेही घर तुझेच आहे आणि इस्टेट दीली म्हणुन माहेर नाही तुटणार तुझे.तुझा माहेरपणाचा हक्क अबाधितच राहील हे लक्षात ठेव.


खुप विचार करुन ऋता झोपी गेली.दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने बॅग भरली आणि ती घरी जायला निघाली.पण इस्टेटीचे कागदपत्रे काही तिने हातात घेतली नाहीत.मग स्वरानेच पुढे होऊन ती फाईल तिच्या बॅगमध्ये टाकली.ऋताला हुंदका अनावर झाला कसेबसे आई,दादा, स्वराचा निरोप घेउन तिने घर गाठले.


राखीचा दिवस जवळ आल्याचे पाहुन स्वराने ऋताला फोन केला. ऋता तू येणार आहेस ना दादाला राखी बांधायला? आम्ही सारे वाट बघत आहोत तुझी.मुल पणहुरावली आहेत आत्या येणार म्हणून. बाबा आता आपल्यात नाहीत तर सारे घर खायला उठते गं.काहीच करमत नाही.तू आली की तेवढाच change होईल सगळ्यांना आणि घरात चैतन्यही येईल


ऋता आणि ऋत्विज राखीच्या दिवशी सकाळीच आले.मग गप्पागोष्टीत ,बाबांच्या आठवणीत बराच वेळ गेला.स्वराने औक्षणाचे ताट तयार केले . राखी बांधता बांधताच ऋता राहुलला म्हणाली,"दादा, भाऊबीज राखीला हक्काने मी तुला माझे gift मागत असते.तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझा तो हक्क तू आणखीही अबाधित ठेवला आहेस .आज त्याच हक्काने मी तुला एक गोष्ट मागणार आहे तू नाही म्हणणार नाहीस असे वचन दे मला. राहुल आणि स्वरा ऋताकडे आश्चर्याने बघतच राहीले.राहुल म्हणाला ,वचन देतो तुला बोल काय हवे आहे? "त्यावर ऋता म्हणाली मी नि ऋत्विजने विचार करून एक निर्णय घेतला आहे. "वहीनी घरात आल्यापासुन आईची मनोभावे सेवा करते आहे तू पण आईला कधीच काही कमी पडु दीले नाहीस. तुमच्या कंपनीच्या व्यापात आणि आईच्या आजारपणामुळे तुम्हाला कुठेही बाहेर tourला जाता आले नाही . तेव्हा आता मी आईला माझ्या घरी घेउन जाईन तिची मनोभावे सेवा करीन आणि मातृऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करीन.तू आता इथून पुढे तुझ्या संसाराकडे बघ.

मला इस्टेटीत वाटणी देण्यासाठी ,.माझा हक्क मला मिळवुन देण्यासाठी तू आणि स्वरा बाबांशी भांडलात हे मला बाबांनी फोन करुन तेव्हाच सांगितले होते असा भाऊ आणि वहिनी मिळणे ही माझी पूर्वजन्माची पुण्याईच. आणि आता तू मला मातृसेवा करण्याची ,आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळु दे. जसा आई बाबांच्या इस्टेटीत मुलींचा हक्क आहे तशीच त्यांची मनोभावे सेवा करणे हे मुलांप्रमाणेच मुलींचे ही कर्तव्य आहे. तू आणि स्वराने हा आदर्श मला घालुन दीला.


आता तुम्ही थोडे relax व्हा.मस्त मजेने world tour चा आनंद लुटा खुप मजा करा,निसर्गाच्या चित्ताकर्षक आनंद घ्या आणि मलाही आईची सेवा करण्याचा मेवा चाखु द्या. परत एकदा विनवते मी तुला दादा,आई बाबांच्याच नाही तर तुझ्या आणि स्वराच्या ऋणातून अल्पशी उतराई होण्याचे gift तू मला देशील ना...


Rate this content
Log in