STORYMIRROR

shivraj sandeep Wadwale (nanded)

Children Stories

3  

shivraj sandeep Wadwale (nanded)

Children Stories

गुरू

गुरू

2 mins
327

   संपूर्ण नावाच एक गाव असते. त्या गावात एक मुलगा असतो. त्या मुलाचं नाव यशराज असते. यश राज खूप आळशी मुलगा असतो. तू रोज उशिरा उठायचा तो ,स्वतःचे काम, पण करायचा नाही . तो रोज कोणतेही काम करण्याच्या अगदी स्वत:ला म्हणायचं मी आता हे काम पूर्ण करेन ..

      पण तो मधेच म्हणायचा मी पाच मिनिट आराम करेन, मग माझं काम पूर्ण करेन. असं म्हणून तो झोपी जायचा. कोणत्याही कामात आळस करायचा , हे त्याचं वागणं पाहून त्याच्या शिक्षकाला त्याचं खूप टेन्शन यायचं मग एका दिवशी त्यांच्या गुरुने विचार केला ह्या मुलाच काहीतरी केलं पाहिजे.

      मग ते विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली. गुरुजींनी विचार करून यशराजला जवळ बोलावले आणी म्हणाले. हा दगड आणि एका मोठ्या भांड्यात टाकशील तर तो दगड गोल्ड मध्ये बदलून जाईल. पण हेच काम तुला काही तासातच केलं पाहिजे.

        पण ते भांड गोल आकाराचा असायला पाहिजे. थोडेसे भांडे शोधून यशराज दमला, घरी जाऊन तो घरातील सर्व भांडी पहात बसला, मध्येच दमला. बाजारात जाऊन भांडे पाहण्यासाठी जायचे ठरवले. पण मनात आले , थोडा वेळ आराम करून मग जातो.. खूप वेळ आहे बाकी. असं म्हणून तो झोपी गेला, त्यात पूर्ण वेळ संपून गेला.

      तो बाजारात गेल्यावर त्याला त्याचे शिक्षक भेटतात आणि म्हणतात यशराज भांड शोधून काढलं का ? तेव्हा यशराज छोटेसे तोंड करून त्यांच्यासमोर उभा राहतो . आणि म्हणतो सर मला भांड मिळालंच नाही त्यातल्या त्यात माझा टाइम पण संपला. मग त्याच्या शिक्षक त्याला सांगतात तू आळस न करता हे काम पूर्ण केला असतस तर आज तुला खुप सारं गोल्ड मिळाल असतं. जर तुला काही करायचं असेल तर तू तुझा आळस याला हरव...।।।

     मग यशराज हातातील दगड त्यांच्या शिक्षकाला देतो आणि म्हणतो जर मी आळशी नसतो तर माझ्या जवळ खूप सारे गोल्ड असतं.... असं म्हणून तो रडत रडत घरी जातो आणि विचार पक्का करतो. आज पासून मी आळस करणार नाही प्रत्येक वेळी च काम वेळेवर पूर्ण करेन.

तात्पर्य:-:- आळस हा माणसाचा शत्रू असतो. आळसावर प्रत्येकाने विजय कमावला पाहिजे   


Rate this content
Log in