गुढी मांगल्याची
गुढी मांगल्याची
1 min
219
नववर्षाचा सण
असतो घरोघरी
मांगल्याची गुढी
उभी असे दारी
गुढी नभी उंच
गगनाला भिडे
पाय धरेवर
कधी नच सोडे
ज्ञान, धन जरी
गुढीसम वाढे
परी सकळ जन
मानुसकी न सोडे
आसुनिया सण
सावट दुःखाचे
भूत कोरोणाचे
जगावरी नाचे
डाॅक्टरांना बळ दे
मागते मी गुढीशी
कोरोनास हारवूनी
वाकवू परिस्थितीशी
राष्ट्रभक्ती वाढवू
घरातच बसून
ह्याच नव्या मार्गे
करू देश रक्षण
