swati bhadre

Others

3  

swati bhadre

Others

First Positive

First Positive

4 mins
469


मम्मा मी आज तुझ्या जवळ झोपणार..' म्हणत माझी मुलगी, स्वानंदी माझ्या कुशीत शिरली.


सायंकाळी सात वाजता माझी करोणाच्या ड्युटी मधून सुट्टी झाली. घरी आल्यानंतर मग आंघोळ, सर्व साहित्य sanitize करणे व नंतर जेवण या गोष्टींमुळे आज झोपायला उशीर झाला होता. गेल्या तीन महिन्यापासून हेच रूटीन अंगवळणी पडलं होतं, पण आज ड्युटी संपल्यानंतर माझ्या सहकारी मॅडम सोबत गप्पा मारण्यात बराच वेळ गेला. कोरोना वार्ड मधून किंवा quarantine सेंटर मधून सुट्टी झाल्यानंतर पुन्हा सात दिवस स्वत: ला कुठली लक्षण दिसतात का ? हे पाहण्यासाठी वेगळं राहणे (Quarantine) असा नियम होता. कंटिन्यू चार दिवस ड्यूटी साठी मी ड्युटीच्या ठिकाणी च थांबायचे पण त्यानंतर परत सात दिवसासाठी फॅमिली पासून दुर राहणं हे काही जमलं नाही. Quarantine न राहण्यासाठी माझं मन मला अनेक कारणं पटवून द्यायचं, सात दिवस वेगळं राहून कसा timepass होणार..? आपल्याकडे अजून कुठे काही पॉझिटिव आहे..? आणि काय माहिती हे किती दिवस चालणार..? ही सगळी कारणं असली तरी छोट्या स्वानंदी पासून जास्त दिवस दूर राहणं मला काही जमणार नव्हतं.आज निघताना मॅडम मला दुसऱ्यांदा म्हणाल्या 'तू सकाळी माझी ड्युटी कंटिन्यू केली तर, आपल्या सगळ्यांनाच एक लॉंग ऑफ मिळू शकतो तेवढाच वेळ फॅमिलीसोबत कंटिन्यू घालवता येईल.' खरंच होतं ह्या तिन महिन्यात रविवार,सन, सुट्टी साठीच्या कॅलेंडर वरील लाल रंगाचं काही महत्त्वच राहिलं नव्हतं. त्यामुळे खूप कमी वेळ परिवारा सोबत मिळायचा आणि त्यात lockdown , work from home मुळे सगळेच घरी होते. 'Next ड्युटीला नक्की..!' असं सांगून मी निघाले. आज आमच्याकडे मुंबईहून आलेली एक फॅमिली विलगीकरणात होती. त्यातील सोळा वर्षाच्या पूजाला ताप येत असल्यामुळे तिचा लाळेचा नमुना(swab) तपासणीसाठी घेतला होता.

स्वानंदी मला बिलगून शांत झोपली होती. अशा मध्ये ती फारच समजूतदार झाली होती, मम्मा ड्यूटीवरुन आल्यावर लगेच तिला जवळ घे म्हणून जवळ जायचं नाही, कुठल्याही सामानाला हात लावायचा नाही, आणि 'तू आज जाऊ नको ना' असा हट्ट करायचा नाही हे ती लवकरच शिकली होती. आणि रात्रीच्या शांततेत मोबाईल च्या रिंग मुळे मला जाग आली, इतक्या उशिरा आलेला फोन म्हणजे काही तरी खुप महत्त्वाचं असणार याची कल्पना आलीच होती. 'मॅडम तुम्ही पूजाच्या जास्त संपर्कात तर नाही ना आलात? तिचा रिपोर्ट पॉझिटिव आहे.. प्रायमरी कॉन्टॅक्ट असणाऱ्या लोकांना लगेच quarantine करतोय.' दवाखान्यातून माझ्यासाठी हा निरोप होता. 'नाही नाही मी काळजी घेत होते not to worry.' असं म्हणुन फोन ठेवला. जसं जसं मी सगळ आठवण्याचा प्रयत्न करू लागले तशी माझी साशंकता वाढतच गेली.

पुजा एक समजुतदार मुलगी होती.. ती नेहमीच मास्क घालून असायची त्यामुळे तिचा चेहरा ही मला निटसा आठवत नव्हता. तिचे आई-वडील अगदीच सामान्य होते, त्यांना वारंवार सगळ्या सुचना तीच द्यायची. एका दिवशी बाहेर गार्ड नसल्या मुळे तीच थेट माझ्या रेस्ट रूम ला आईचं खुप डोकं दुखतंय हे सांगायला आली होती, तेव्हा सुद्धा काही अंतरावरून च तिने ते सांगितलं. त्यामुळे मी risk मध्ये असण्याची शक्यता मला वाटत नव्हती.तशी मी स्वत च्या बाबतीत बरीच बेजबाबदार आहे याची मला कल्पना होती, म्हणुनच की काय मला झोप येत नव्हती, आणि मला आठवलं... त्या दिवशी मी पुजा च्या आईला डोकं दुखतंय म्हणुन तपासणीसाठी गेले होते तेव्हा तीची आई वेदनेने रडत होती, बी पी ची रूग्ण असल्याने मी लवकरात लवकर तिचा बी पी पाहिला, तसा तिने माझा हात घट्ट पकडला तु माझ्या मुली सारखी आहेस आणि लवकर काही तरी कर म्हणत जोरात ओरडु लागली.. तिला मायग्रेन चे असे attack नेहमी यायचे येताना तिच्या गोळ्या विसरल्यामुळे त्रास होत होता हे नंतर मला पुजा कडुन कळालं. थोड्या वेळातच उपचारानंतर ती स्टेबल झाली परंतु या प्रसंगादरम्यान माझा आणि तिच्या आईचा डायरेक्ट संपर्क आला होता. मी ताबडतोब कॉल करून पूजाच्या घरच्यां विषयी चौकशी केली असता उद्या त्यांची तपासणी होणार आहे अशी माहिती मिळाली. पुजा च्या थेट संपर्कात असणारी तिची आई, आणि तिच्या आईच्या थेट संपर्कात मी..! हे समीकरण डोक्यात येताच मी स्वानंदी ला माझ्या पासून दूर झोपवलं.

वारंवार माझं तेच मन जे मला quarantine होण्याची गरज नाही हे सांगायचं, तेच मला दोष देत होतं. सगळं जग जरी तुमच्या सोबत असलं तरी तुमचं मन तुमची कधीही साथ सोडु शकते हे त्या रात्री जाणवलं.दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून ड्युटी ला जाण्यासाठी तयार झाले पण माझा ऑफ असल्याने घरच्या सगळ्यांना नवल वाटलं. त्यांना मॅडमच्या प्लॅनिंग विषयी सांगून मी लगेच मॅडम ला ही फोन करून मी त्यांची ड्युटी कंटिन्यू करणार असल्याच कळवलं.. आता माझ्या मनात चाललेलं सगळं मलाच माहिती होतं.दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, आता ह्या रिपोर्टची त्यांच्या पेक्षा जास्त काळजी मला होती. यावेळी मात्र ड्युटीवर मी नेहमीपेक्षा जास्त काळजी घेत होते.. नंतरच्या दिवशी रिपोर्ट आले, इतर सगळ्यांचे निगेटिव परंतु पूजाच्या आईचा रिपोर्ट हा inconclusive आला होता, आता तिचा swab परत घ्यायचा होता. रिपोर्ट यायला आणखी वेळ लागणार होता, तसा माझा जीव आता चांगलाच टांगनीला लागला होता. Inconclusive reports पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते याची कल्पना मला होती. माझ्या सेंटरला आता अनेक प्राइमरी कॉन्टॅक्ट असणारे लोक विलगीकरणात होते, मी ही त्यांच्यापैकीच एक असल्याची जाणीव मला होत होती..आज मॅडमच्या मी केलेल्या ड्युटी चा शेवटचा दिवस होता, परंतु पुजा च्या आईचा रिपोर्ट काही आला नव्हता. आता मी घरी फोन करून सगळं सांगणार आणि इथं राहुन गरज पडल्यास माझी तपासणी करून घेईल हे मी ठरवलं. आज माझी ड्युटी संपणार आणि मी घरी येणार म्हणून स्वानंदी माझी वाट पाहत असेल ही जाणीव दुखावून जात होती.. पण तिच्याचसाठी हे सगळं करणं मला गरजेचं वाटलं. मी मोबाईल उचलला आणि फोन करणार एवढ्यात मला फोन आला, 'मॅडम सगळ्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आहेत डिस्चार्ज दिला तरी चालेल..' हे ऐकताच मी समोर कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असणारा घरचा नंबर डायल केला आणि 'मी निघाले' असा निरोप दिला.माझं कोकरु पुन्हा एकदा माझ्या कुशीत शिरलं..आणि वाटलं की खुप दिवसांनी मला शांत झोप लागणार आहे..!


Rate this content
Log in

More marathi story from swati bhadre