Anusaya Kathi

Others

4.9  

Anusaya Kathi

Others

दृष्टिकोन

दृष्टिकोन

2 mins
857


मी अनु. सद्या मी बारावी या वर्गात शिकत आहे . आत्तापर्यंत चे माझे आयुष्य हे काही ठिकाणी खडतर होते आणि काही ठिकाणी खूप सुंदर. होय , माझ्या आयुष्याला आत्ता कुठे एक लय एक सुंदरता येत आहे . पण , काही गोष्टी आज मी लिहू इच्छिते .

मी जाड आहे . आणि मला माझा अभिमान आहे . कारण मी सर्वांपेक्षा वेगळी आहे. पण आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात की त्यांना आपला चांगलं झालेलं कधी बघवतच नाही, सतत आपल्या बद्दल काही ना काही बोलतच असतात .

दहावी पर्यंत शाळेमध्ये सगळे जण खूप चिडवत होते मला. नंतर, अकरावी मधे गेल्यावर सुध्दा तेच.... खूप त्रास द्यायचे लोक मला...शरीराकडे पाहून मला judge करायचे . मग नंतर ठरवलं की आपण वजन कमी करायचं...प्रयत्न केले पण काही रिझल्ट नाही आला . लोक हसत होते माझ्यावर . टोमणे मारत होते. लोकांचं सोडा हो , पण माझ्या घरचे सुध्दा तसेच..... दोन महिने डिप्रेशन मधे गेले मी ..काहीच कळत नव्हतं मला. पण त्यातही लोकांचे टोमणे आणि अपमान चालूच .

दहावी च्या सुट्या लागल्या आणि मी माझ्या काकां कडे मुंबई ला गेले. तिकडून परत आल्यावर, थोडी तिकडचा राहणीमानाची सवय झाली होती. इथे गावी आले आणि परत टोमणे सुरू झाले, " काय अनु लागलं का मुंबई च पाणी " ... सतत हे असच चालू होतं .

आता मी मुंबई वरून आले मग मला जीन्स घालायची सवय लागली होती . इकडे आल्यावर एकदाच जीन्स घातली आणि ... माझी एक मैत्रीण मला म्हणली , " अनु आधीच जाड आहेस परत जाड दिसतेस ग...नको घालू ते " .... तेंव्हा मला कळलं आपले लोक सुध्दा आपल्याला चांगलं नाही म्हणत .

हीच आहे का आपली संस्कृती की कोणालाही त्याच्या शरीराकडे पाहून टोमणे मरायचे ?

जगात एवढया जाड मुली आहेत मग मीच ह्यांना टोमणे मारायला दिसते का .. ?

मग नंतर मी ठरवलं आता कोणी काहीही म्हणू दे . मला जे आवडत ते मी करणार .

आणि मी देवाला मागितल न्हवत की मला जाड बनव ...

आता ठरवलं लोकांचं ऐकायचं नाही . खूप टोमणे सहन केले ..जागोजागी आणि प्रत्येक क्षणाला .

मग त्याच काळात एक समजूतदार मैत्रीण मला भेटली आणि माझ्या जीवनात खूप आनंद आला . कारण तिला माझ्या जाडपणावर काहीच प्रोब्लेम न्हवता. माझ्या जीवनाकडे पहायचा दृष्टिकोन बदलला. हळू हळू ...सगळ बदलू लागलं .... कारण आता माझं मन, माझे विचार सकारात्मक झाले आहेत .

खूप अभ्यास चालू आहे... कारण आई बाबांचं स्वप्न पूर्ण करायच आहे ना..


Rate this content
Log in