डॉक्टर पेशंट नाते
डॉक्टर पेशंट नाते
नाते कुणाचे कुणाशी असते? नाते हे सहजतेने, आपोआप जुळते असे म्हणतात. रक्ताचे नाने असो किंवा आपुलकीने निर्माण झालेले नाते असो ते दृढ बेवण्यासाठी सतत प्रयत्नशील, कृतीशील असावे लागते. डॉक्टरांनी डॉक्टरकी सुरु केली व पेशंटने डॉक्टरांना उपचार करण्याची संधी दिली की डॉक्टर पेशंटचे नाते जन्माला येते. नात्याची सुरवात होण्याचा हा झाला औपचारिक भाग खरं नातं जुळप्यास यानंतर खरी सुरवात होते.
याठिकाणी मला आठवण येते ती आमच्या फॅमिली डॉक्टरांची. आजारपण येणं हे डॉक्टरांना भेट देण्याचं निमित्त. पण डॉक्टरांकडे गेल्यावर आपण कोणत्या आजाराच्या उपचारासाठी त्यांच्याकडे आलो हे विसरायला व्हावं इतकी आपुलकी, दिलखुलासपणा त्यांच्यापाशी आहे. पेशंटचे दिलखुलास स्वागत, विनोदी स्वभावाच्या साह्याने पेशंटच्या मनावरील ताण कमी करण्याची हातोटी, प्रत्येक पेशंटला प्रेभाने ठेवलेले टोपण नाव ही झाली सुसंवादाची एकतर्फी बाजू. दुसन्या बाजूला तेवढ्याच अधिकाराने डॉक्टरांची फिरकी घेणारे, त्यांची चेष्टा करणारे पेशंट | पण हा सुसंवाद घडताना रोगाचे अचूक निदान व त्यावरील अचुक औषध यात मात्र तडजोड नाही. यामुळे डॉक्टर व पेशंट यांच्यात सहृदयतेचे निखळ नाने आपोआपच निर्माण व्हायचे व टिकून राहायचे.
पेशंट व डॉक्टरांचे नाते दृढ होण्यासाठी पेशेट व डॉक्टरांचा एकमेकांवर १००% विश्वास असावा लागतो. पेशंट ने आपली व्यथा व्यक्त केल्यावर त्याला आपुलकीने वागवून, योग्य निदानाच्या साह्याने बरे करणे या यशाप्रत वाटचाल करण्यासाठी विश्वास हा भाग महत्वाचा असतो.
डॉक्टर पेशंट या नात्याचे अनेक मनोहारी पैलू आहेत. एक मित्र, एक सल्लागार, एक आदरणीय व्यक्ती इथपासून साक्षात देवमाणूस, किवा साक्षात देवाचे रूप अशी एक प्रनिमा पेशंटच्या मनान साकारते. अर्थात पेशंट व डॉक्टर यांचे नाते किती पारदर्शक आहे यावरच हे सर्व अवलंबून आहे.
सध्याच्या काळात व्यवसाय मृणून डॉक्टरकी करणे व व्यवसाया- व्यतिरिक्त प्रक्टिकल सल्ला देणे व रोग बरा होण्यासाठी पेशंटच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे याकरता डॉक्टर ने प्रयत्न करतात त्यातून एक नाते आकाराला येते.
डॉक्टरांना देवपण बहाल न करता डॉक्टर हा एक माणूस आहे. ही जाणीव ठेवणारे पेशंट हे डॉक्टरांच्या मते चांगले नातेवाईक ठरु शकतात. पेशंट अगदीच अगतिक झाला व त्याने डॉक्टरांना अर्ध्या रात्री उठवणे वेगळे व उठसूठ डॉक्टरांना त्रास देणे वेगवे पण हे वेगळेपण 'परदुःख शीतल' असे न मानता खरोखर गरजवंत पेशंट ओळखून मदतीचा हात पुढे करणारे डॉक्टर पेशंटला नक्कीच देवासारखे भासतात. एखादा नावलौकिक मिळवलेला डॉक्टर त्याच्या कर्तृत्वाने, हातगुणाने अगर कौशल्याने अनेकांना जीवदान देतो अशा वेळी या डॉक्टरांच्या दृष्टीने पेरांटशी आधक व्यापक स्वरुपाची नाती निर्माण होन
डॉक्टर व पेशंट यांचे नाते हे अजरामर राहणारे आहे. दैनंदिन जीवनात बहु होतील, बहु असतील अशी नात्यांची वीण असेल जिला खंड नसेल. ती आपल्या आठवणीत मोरपिसांसारखी राहतील. नात्यांचा हा बंध शब्दोच्या पलीकडचा आहे तरी तो शब्दोच्या माध्यमातून मोडण्याचा मोह आवरत नाही.
"नाने असावे नात्यासारखे नसावा नुसता व्यवहार ज्या नात्याने हढ होतील नाती जना मनातील इथे नसावी मर्यादा रक्तातील नात्यांची नात्यामुळेच रक्ताला जाणीव व्हावी नात्यांची"
