बुद्धिस्ट उखाणे
बुद्धिस्ट उखाणे
आपण बौद्ध आणि महार लोक डाँ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुध्द यांना साक्षी ठेऊन लग्न करतो. पण लग्नानंतर जोडीदाराचे नाव मात्र इतराप्रमाणे काँमन पध्दतीनेच घेतो हेच जरा न पटणारे होते त्यामुळेच मला उखाने लिहायची कल्पना सुचली. या मध्ये मी सगळ्यात प्रथम बाबासाहेबांचे कर्तृत्व मांडायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तथागत गौतम बुध्दांचे विचार आणि बौध्द धर्मातील संकल्पना (उदा. बोधीवृक्ष)मांडल्या आहेत. हा माझा उखाना लेखनाचा पहिला उद्देश आहे.
तर दूसरा उद्देश असा की, भारतातील ९०% लोक असे समजतात की बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्य समाजासाठी कार्य केले आहे. बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यासाठीच नाहीतर या भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरीकांसाठी कार्य केले आहे हे त्यांना माहीत नाही आणि त्यांनी कधी ते माहीत करून घेण्यासाठी प्रयत्न केले नाही कारण तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे मी इथे सांगून उगीच वादाला आणि टिकेला निमित्त नको.
पण त्या सगळ्या लोकांचा गैरसमज पण दूर होणे महत्तवाचे आहे त्यामुळे मी माझ्या उखाणामध्ये बाबासाहेबांचे कर्तृत्व मांडत आहे. जेणेकरून या निमित्ताने का होईना त्यांना बाबासाहेबांच्या देशासाठी केलेल्या कार्याची माहीती होईल.
पण या ठिकाणी वाचकांनी पण एक गोष्ट लक्ष्यात घ्याला हवी की बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे त्यामुळे ते हंड्यावर हंडे रचल्यासारखे किंवा सोन्या-चांदिच्या ताटात राशी लावण्यासारखे सोपे नाही,बाबासाहेबांचे अनमोल कर्तृत्व आहे कागदावर सहजासहजी मांडता येणार नाही त्यामुळे सगळ्याच उखाण्यामध्ये यमक हवेच अशी अपेक्षा करू नये. कारण यमक पेक्षा मी उखान्याच्या वरच्या ओळी वर जास्त भर दिलेला आहे. अपेक्षा करते की माझा उखाणा लेखनाचा उद्देश तुम्हाला समजला असेल त्यामुळे त्यामध्ये कोणीही उगीचच चुकीचे अर्थ काढू नये अशी नम्र विनंती आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
82. 14 एप्रिल
सण आमचा
--- रावांचे नाव घेते
मान ठेऊन सर्वाचा.
(नवरदेव साठी --
--- चे नाव घेतो )
★★★★★★★★★★★★★
81. श्रीखंड-पुरी चा बेत
जयंती सणाला
--- रावांची ओढ लागे
ह्या वेड्या मनाला.
★★★★★★★★★★★★★★★★★
80. बुध्द चरणी,भीम चरणीच
नमतो हा माथा
--- रावांच्या साथीने
गृहप्रवेश करते आता.
★★★★★★★★★★★★★★
79. आनंदाची भरती येते
जयंती सणाला
=== रावांची ओढ लागे
ह्या वेड्या मनाला.
★★★★★★★★★★★★★★★★
78. चांदीच्या ताटात सोन्याचा घास
आज बाबासाहेबांमुळेच मिळतो
=== रावांचा आणि माझा जोडा
लाखात शोभून दिसतो.
(नवरदेव साठी --
=== चा आणि माझा जोडा .....)
★★★★★★★★★★★★★★★★★
77. बाबासाहेबांमुळेच आज
खायला मिळतो सोन्याचा घास
=== रावांचे नाव घेते
तुमच्यासाठी खास.
(नवरदेव साठी ---
=== चे नाव घेतो.......)
★★★★★★★★★★★★★★★★★
76. स्त्रियांना मान-सन्मान
मिळवून देण्यासाठी
हिंदू कोड बिल हे विधेयक
बाबासाहेबांनी संसदेत मांडले
=== रावांसाठी
माहेर सोडले.
★★★★★★★★★★★★★★★★★
75. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी
बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना
बाबासाहेबांनी केली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
(नवरदेव साठी ---
=== ही सोबत असताना..... )
★★★★★★★★★★★★★★★★★★★
74. जर बाबासाहेब नसते तर
भारतात अस्पृश्य नावाचा प्राणी
जन्माला आला असता
=== रावांच्या साथीने
आरंभ करते संसाराचा.
(नवरदेव साठी---
=== च्या साथीने
आरंभ करतो संसाराचा )
★★★★★★★★★★★★★★★★★★★
73. परदेशी देश सुद्धा बाबासाहेबांच्या
कर्तृत्वाची देतात साक्ष
=== रावांचे नाव घेते
सर्वानी द्या इकडे लक्ष्य.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घेतो.....)
★★★★★★★★★★★★★★★★★★
72. Who Were The Shudras
हा ग्रंथ बाबासाहेबांनी
महात्मा ज्योतिबा फुले यांना
अर्पण केला
=== रावांचे नाव घ्यायला
सार्यानीं आदेश दिला.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घ्यायला ....)
★★★★★★★★★★★★★★★
71. मनुस्मृतीने नाकारले
पण
संविधानाने दिले
=== रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★★★
70. सुटा-बुटात बाबासाहेब
किती शोभून दिसतात
=== राव आणि माझा जोडा
आहे लाखात असे सारे म्हणतात.
(नवरदेव साठी---
=== चा आणि माझा जोडा....)
★★★★★★★★★★★★★★★★★
69. मागासवर्गीय वर्गाला आरक्षणाचे
वरदान बाबासाहेबांनी मिळवून दिले
=== रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★★★
68. गरोदर स्त्रीला हक्काची पगारी सुट्टी
बाबासाहेबांनी मिळवून दिली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★★
67. प्रत्येक भारतीय नागरिकास समान
अधिकार दिला बाबासाहेबांच्या कायद्याने
=== रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.
(नवरदेव साठी---
===चे नाव घेतो
पती या नात्याने )
★★★★★★★★★★★★★★★★★
66. बाबासाहेबांच्या २ वर्ष ११ महीने १८ दिवसाच्या
कष्टाचे फळ म्हणजे भारताची राज्यघटना
=== रावांबरोबर सुखाचा
संसार मी थाटला.
★★★★★★★★★★★★★★★★★
65. अस्पृश्यता ह्या आजारावर समतेचे
लस शोधणारा डॉक्टर म्हणजे
बाबासाहेब आंबेडकर
=== रावांनी दिला मला
सौभाग्याचा आहेर.
★★★★★★★★★★★★★★★★★
64. झोपडीत राहणाऱ्या बाबासाहेबांनी
पुस्तकांसाठी बंगला बांधला
=== रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.
★★★★★★★★★★★★★★★★★★
63. दानवीर ,विशाल ह्दयी बाबासाहेबांनी
गांधीजींचे प्राण वाचविले
=== रावांच्या नावाचं कुंकू
कपाळी मी सजविले.
★★★★★★★★★★★★★★★★★★
62. मानवी दु:खे दूर करण्यासाठी
गौतम बुध्दांनी महाभिनिष्क्रमण केले
=== रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★★★★
61. व्हासराँयच्या मंत्रीमंडळात
मजूर आणि बांधकाम
खात्याचे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी मानाचे स्थान मिळवले.
=== रावांच्या नावाचे कुंकू
कपाळी मी सजविले.
★★★★★★★★★★★★★★★★★
60. हूशार अस्पृश्य मुलांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे म्हणून बाबासाहेबांनी
फाँरेन स्काँलरशिप प्रपोजल
ही योजना आमलात आणली
=== रावांबरोबर
आयुष्यभराची गाठ बांधली.
(नवरदेव साठी---
=== बरोबर
आयुष्यभराची गाठ बांधली)
★★★★★★★★★★★★★★★★★★★
59. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना
प्रसुतीच्या वेळी पगारी रजा
बाबासाहेबांनी मिळवून दिली
=== सोबत असताना मला
नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★★★
58. तथागत गौतम बुध्द आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने
=== रावांबरोबर बांधते आयुष्यभराची गाठ
डोक्यावर सदैव असो मोठ्यांच्या
आशीर्वादाचा हात.
(नवरदेव साठी---
=== बरोबर बांधतो आयुष्यभराची गाठ)
★★★★★★★★★★★★★★★★★
57. स्वातंत्र्य भारताचे पहिले विधीमंत्री होण्याचा
मान बाबासाहेबांना मिळाला
=== रावांच्या नावाचा
चुडा मी भरला.
★★★★★★★★★★★★★★★★★★
56. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
बाबासाहेबांनी केली
=== रावांचे नाव घेते
ऐका ग सार्याजणी.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
55. ग्रंथप्रेमी बाबासाहेबांनी
अन्यायकारी मनुस्मृती जाळली
=== रावांचे नाव घेऊन
सगळ्यांची आज्ञा मी पाळली.
( नवरदेव साठी---
=== चे नाव घेऊन
सगळ्यांची आज्ञा मी पाळली.)
★★★★★★★★★★★★★★★
54. नदीजोड प्रकल्पाची गरज
बाबासाहेबांनी त्याचवेळी सांगितली
=== रावांनी मला
आयुष्यभराची साथ मागितली.
★★★★★★★★★★★★★★★★
53. बाबासाहेब म्हणजे
गोडातील साखर ,अन्नातील मिठ
=== रावांचे नाव घेते
ऐका सगळ्यांनी नीट.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घेतो
ऐका सगळे नीट.)
★★★★★★★★★★★★★★★★
52. चवदार तळे पवित्र झाले
बाबासाहेबांच्या स्पर्शाने
=== रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घेतो
पती या नात्याने.)
★★★★★★★★★★★★★★★
51. दलितांसाठी बाबासाहेब
आईचा पदर झाले
=== रावांसाठी
माहेर सोडून सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★★
50. हिंदु धर्मातुन बौद्ध धर्मात
बाबासाहेबांनी केले धर्मातर
=== रावांचे नाव घेते
ठेवून सर्वाचा आदर.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घेतो
ठेवून सर्वाचा आदर)
★★★★★★★★★★★★★★★★
49. अस्पृश्य समाजातील पहीले
मँट्रीक बाबासाहेब झाले
=== रावांसाठी
माहेर सोडून सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★★★
48. बुद्ध विहारी जाऊन करते
तथागत गौतम बुध्दांना वंदन
=== रावांबरोबर जोडते
आयुष्यभराचे बंधन.
(नवरदेव साठी---
=== बरोबर जोडतो
आयुष्यभराचे बंधन)
★★★★★★★★★★★★★★★★
47. सूर्यापेक्षा तेजस्वी चंद्रापेक्षा शीतल
कर्तृत्व आहे भीमाचे
=== राव धनी आहेत
माझ्या सौभाग्याचे.
★★★★★★★★★★★★★★
46. बाबासाहेबांचा शाळेतील पहीला दिवस
विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो
=== रावांचे नाव घ्यायला
सगळ्याचा आदेश येतो.
(नवरदेव साठी
=== चे नाव घ्यायला ....)
★★★★★★★★★★★★★★★
45. विषमतावादी इतिहास पुसून
नवा इतिहास बाबासाहेबांनी निर्माण केला
=== रावांनी सौभाग्याचा
मान दिला.
★★★★★★★★★★★★★★
44. अस्पृश्य म्हणून ज्याला
शिक्षणाचा अधिकार नव्हता
त्याच बाबासाहेबांनी बसविली
देशाची घडी
=== रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या वेळी.
★★★★★★★★★★★★★★★★★
43. पुरूषांप्रमाणेच स्त्रीयांना समान
अधिकारी मिळवून देणारा कायदा
बाबासाहेबांनी केला
=== रावांनी सौभाग्याचा
आहेर दिला.
★★★★★★★★★★★★★★★
42. मुक्या अस्पृश्य समाजाचे
मूकनायक म्हणून बाबासाहेब शब्द झाले
=== रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.
★★★★★ ★★★★★★★★★★★
41. बाबासाहेब परदेशी शिकायला असताना
रमाईच्या डोळ्यांना लागली बाबासाहेबांच्या परतीची आस
=== रावांचे नाव घेते
तुमच्यासाठी खास.
★★★★ ★★★★★★★★★★★★
40. १४ एप्रिल सोन्याचा दिवस उगवला
भीमाईच्या पोटी रामजीचा पुत्र जन्मला
===रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.
★★★★★★★★★★★★★★★★★★
39. भीमाचे रामजी होते वडील
भीमाई होती आई
===राव आहेत लेखनी
अन् मी त्यातील शाई.
★★★★★★★★★★★★★★★★★
38. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची साक्ष देते
विदेशी शहर ते लंडन
=== रावांबरोबर जोडते
आयुष्यभराचे बंधन.
(नवरदेव साठी---
=== शी जोडतो
आयुष्यभराचे बंधन)
★★★★★★★★★★★★★★★
37. बाबासाहेबांचे सकपाळ या
आडनावाचे आंबेडकर असे झाले
=== राव आणि माझी जोडी
लाखात एक शोभे.
(नवरदेव साठी---
===ची आणि माझी जोडी
लाखात एक शोभे.)
★★★★★★★★★★★★★★★★
36. पिंपळाच्या पानाला
बोधीवृक्ष म्हणतात
=== रावांचे नाव घ्यायला
सारेच आग्रह करतात.
(नवरदेव साठी ---
=== चे नाव घ्यायला
सारेच आग्रह करतात.)
★★★★★★★★★★★★★★★★
35. बाबासाहेब म्हणजे
ज्ञानाचा महासागर
=== रावांसाठी
सोडले मी माहेर.
★★★★★★★★★★★★★★★
34. आधी दलितांच्या हाती फक्त झाडू असायचा
पण बाबासाहेबांनी पुस्तके दिली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★
33. बाबासाहेबांनी केली
संविधानाची निर्मिती
=== रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या वेळी.
★★★★★★★★★★★★★★★★
32. लेक मी बाबासाहेबांची
उपासिका गौतम बुध्दांची
=== रावांचे नाव घेते
सुन मी === ची
★★★★★★★★★★★★★★★★
31. सुटा-बुटात बाबासाहेबांचा
रूबाब किती शोभून दिसतो
=== रावांचे नाव घ्यायला
नेहमी सगळ्याचा आग्रह असतो.
(नवरदेव साठी
=== चे नाव घ्यायला....)
★★★★★★★★★★★★★★★★
30. कायद्याची निर्मिती
बाबासाहेबांनी केली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★
29. पांढरी साडी नेसून
तथागत गौतम बुध्दांना पूजते
=== रावांच्या नावाचं कुंकू
कपाळी शोभते.
★★★★★★★★★★★★★★★
28. बाबासाहेबांची भीमाई होती माता
रामजी होते पिता
=== रावांच्या नावाने
भरला मी चुडा.
★★★★★★★★★★★★★★
27. (नवरदेव साठी)
पिंपळाच्या पानावर
गौतम बुध्दांचे चित्र
=== चे नाव घ्याला
आग्रह करतात मित्र
★★★★★★★★★★★★★★★★
26. भीमरावाचे बाबासाहेब झाले
रमाबाईची रमाई झाली
=== ही माझ्या
ह्दयाची राणी झाली.
★★★★★★★★★★★★★★★★
25. बाबासाहेबांच्या पाठीशी
खंबीरपणे उभी होती रमाबाई
=== रावांचे नाव घेते
=== ची मी आई.
★★★★★★★★★★★★★★★
24. शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा
बाबासाहेबांनी दिला हा संदेश
=== रावांचे नाव घ्यायला
दिला सार्यानीं आदेश.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घ्यायला....)
★★★★★★★★★★★★★★★
23. संविधानाच्या माध्यमातून
गरोदर स्त्रीला हक्काची पगारी सुट्टी
बाबासाहेबांनी मिळवून दिली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★
22. बुद्ध आणि त्यांचा धम्म
हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला
=== रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.
★★★★★★★★★★★★★★★
21. अन्यायावर मात करते
बाबासाहेबांची लेखनी
=== रावांचे नाव घेते
आशीर्वाद द्यावा मोठ्यांनी
(नवरदेव साठी
===चे नाव घेतो......)
★★★★★★★★★★★★★★★★
20. बाबासाहेबांच्या कल्पनेतूनच
रीर्झव बँकेची उभारणी झाली
=== राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★★
19. निळ निशाण
पिंपळाचे पान
=== राव आहेत
माझा जीव कि प्राण.
★★★★★★★★★★★★★★★★
18. (बारसे साठी आत्याचा उखाणा)
गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे
क्रूर अंगुलीमालाने
सुद्धा शस्त्र टाकले.
=== रावांचे नाव घेऊन
===हे बाळाचे नाव
मी जाहीर करते.
★★★★★★★★★★★★★★
17. अन्यायवर मात करते
बाबासाहेबांची लेखनी
=== रावांचे नाव घेते
ऐका ग सार्याजणी.
★★★★★★★★★★★★★
16. १४एप्रिल
सण आमचा
=== रावांचे नाव घेते
मान ठेवून सर्वाचा.
★★★★★★★★★★★★★★★
15. बाबासाहेबांमुळे नष्ट झाला
अस्पृश्याच्या जीवनातील अंधकार
=== रावांबरोबर थाटते
सुखाचा संसार.
★★★★★★★★★★★★★★★★★
14. समुद्राऐवढे ज्ञान
बाबासाहेबांकडे होते
===रावांचे नाव घेऊन
उंबरठ्यावरचे माप मी ओलांडते.
★★★★★★★★★★★★★★★★★
13.जन्म दिला आई-वडीलांनी
पण,
आयुष्य दिले बाबासाहेबांनी
===रावांचे नाव घ्यायला
आग्रह केला सार्यानीं.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घ्यायला......)
★★★★★★★★★★★★★★
12.सत्ता स्थापन करणारी
रचना बाबासाहेबांनी
मांडली
===राव आणि माझी जोडी
लाखात एक
शोभली.
(नवरदेव साठी----
===ची आणि माझी जोडी.....)
★★★★★★★★★★★★★
11. मनुस्मृतीचे गलिच्छ विचार
पायदळी तुडविते
=== रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.
★★★★★★★★★★★★★
10. शिक्षण रूपी वागिणीचे दूध
बाबासाहेबांनी पाजलं
===रावांचे नाव घ्यायला
सगळ्यांनी केला आग्रह.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घ्यायला.....)
★★★★★★★★★★★★★★
9. वैशाखी पौर्णिमेला जन्म घेतला
गौतम बुध्दाने
===रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.
(नवरदेव साठी---
=== चे नाव घेतो
पती ....)
★★★★★★★★★★★
8. दिक्षाभूमीवर बाबासाहेबांनी
केले धर्मांतर
=== रावांचे नाव घेते
ठेवून सर्वाचा आदर.
(नवरदेव साठी
===चे नाव घेतो....)
★★★★★★★★★★★
7. महूच्या मातीमध्ये
भीमरत्न जन्मला
=== रावांमुळे
सौभाग्याचा मिळाला
मान मिळाला.
★★★★★★★★★★★★
6.अस्पृश्य शिक्षणाची कळी
बाबासाहेबांनी फुलवली
सुवास त्यांचा पृथ्वी अंतापर्यंत
दरवळत राही
=== रावांचे नाव घेते
=== ची मी आई.
★★★★★★★★★★★★★★
5.अस्पृश्यांनसाठी बाबासाहेब
म्हणजे
आईचा पदर आणि वडीलांचा
कर्तव्यशील हात
=== रावांशी जोडते
आयुष्यभरांची गाठ.
★★★★★★★★★★★★★★★
4.विषमतावादी समाजाला
समानतेचे अमृत बाबासाहेबांनी दिले
=== रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.
★★★★★★★★★★★★★★
3. रक्ताचा एक थेंबही न सांडता
बाबासाहेबांनी घडविली
क्रांती
=== सोबत असताना
मला नाही कशाची कमी.
★★★★★★★★★★★★★★★
2. बाबासाहेबांसाठी ग्रंथालय हे मंदिर
आणि पुस्तक हे देव होते
===रावांच्या नावाने
सौभाग्याचे लेणं मी घेते.
★★★★★★★★★★★★★★
1. अस्पृश्यांचे नेतृत्व म्हणून
गोलमेज परिषद मध्ये
बाबासाहेबांनी मानाचे
स्थान मिळवले
=== रावांचे नाव घेऊन
उंबरठ्यावरचे माप
मी ओलांडते.
