Chaitali D

Others

4.0  

Chaitali D

Others

बोभाटा

बोभाटा

4 mins
461


मनीषा आणि तिचे वडील दत्तात्रय चव्हाण दोघेही आज जरा घाईतच घरातून निघाले गाडी सर्विसिंगला द्यायची, डी-मार्ट मधून काही खरेदीही करायची त्यात या पावसाने जोर पकडलेला. या लॉक डाऊनच्या काळात रिस्क घेऊन गाडी रिपेअरिंगला न्यायची त्यात धो धो कोसळणारा पाऊस दोघेही थोडे वैतागतच गाडीत बसले. त्यांच्या जवळच्या डी-मार्ट मध्ये भयंकर गर्दी हि गर्दी पाहून कोरोना ओढवून घेण्यापेक्षा दोघांनीही कार सर्विसिंगला न्यायचा विचार केला. रस्ता तसं अर्धा पाऊण तासाचा मनीषाने बॉलीवूडची काही पावसाची गाणी लावली आणि दोघेही गप्पा मारत शांत रस्त्यावर पाऊस एन्जोय करत निघाले. मनीषा मध्ये मध्ये मोबाईल वर एफबी, इन्स्टा बघत बसलेली इन्स्टावर काही स्टोरीज बघता बघता एका मित्राने शेअर केलेली #लॉकडाऊन #गावाकडची शेती आणि मशागत हि स्टोरी दिसली त्यावर तिच्या गावच्या तालुक्याचं नाव लिहिलेलं, हे पाहून फारसं कधीही न बोललेल्या सो कॉल्ड इन्स्टा आणि कॉलेजच्या सिनिअरला फक्त गावची पोस्ट बघून तिने आपुलकीने आणि उत्सुकतेने कोणतं गाव तुझं? असा मेसेज केला.


त्याचाही पटकन रिप्लाय आला खेड. त्याचा अनपेक्षितपणे पटकन आलेल्या रिप्लायमुळे तिने लगेच पुढचा प्रश्न केला माझंही गाव तिकडेच आहे? त्याने लगेच कोणतं गाव विचारताच तिने खेडजवळच्या एका गावाचं नाव सांगितलं. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. यातच मध्ये बोलता बोलता तिने तिच्या वडिलांना सांगितलं आमचा एक सिनिअर पण आपल्याच गावचा आहे त्यात माझ्याच इंडस्ट्रीमध्ये. त्याची आत्या तर आपल्या गावातच सुतारआळीत राहते आत्ताच वारली म्हणे. तिच्या वडिलांनी हे ऐकताच उत्सुकतेने अगं तो सुतार तर नाही ना? त्याचं आडनाव काय? आपल्यापण नातेवाईकांमध्ये तुझी लांबची काकु वारली. विचार त्याला त्याचं आडनाव. मनीषाने उत्सुकतेमध्ये आडनाव विचारण्याऐवजी तू सुतार आहे का? माझी लांबची काकू वारली म्हणे एवढ्यात.. सुतारआळी हे एका जागेचं नाव आहे असा तिकडून रिप्लाय आला. मनीषा इकडे समजावण्याच्या सुरात म्हणते अरे हो पण आमचे काही नातेवाईक आडनाव म्हणून सुतारच लावतात असा म्हणत तिने डोक्यावर हात मारणारा emoji टाकला. समोरच्या व्यक्तीने त्याचा अर्थ जातीभेदाने घेत तिला मेसेज केला, “ I’m living as human in this world. I don’t know about this things. Just putting my views”. हा मेसेज वाचून मनीषाला हसावं की संताप करावा हे कळेना. 


मनीषा मुंबईसारख्या शहरात वाढलेली त्यामुळे तिला या जातीपातीचं कधी देणंघेणं नव्हतं मुळात मुंबईसरख्या शहरामध्ये या गोष्टीकडे लक्ष द्यायलाही फारसा कोणाला वेळ नाही आणि नव्हता. ती एका ब्राम्हण शाळेत शिकलेली ब्राम्हण, क्रिश्चन, SC, NT असे सगळेच तिचे मित्र-मैत्रिणी. तिच्या मित्रमैत्रिणीनी एकमेकांना वेगळी वागणूक दिलेली किंवा वर्गवारी केलेली कधी पाहिलच नव्हतं न तिच्या घरात आणि नाही तिच्या गावच्या घरात किंवा वातावरणात. तिने आणि तिच्या मित्रमैत्रिणीनी जात हे फक्त नावाला असते त्यावर एवढाही कधी कोणी गदारोळ करू शकतं असं पाहिलेलं नव्हत. आता या गावातून आलेल्या आणि नुकताच मुंबईमध्ये वावरणाऱ्या तिच्या सिनिअरला हे कसं सांगावं हे हि तिला कळेना. तिने केवळ एकच मेसेज त्याला केला “We are also living as Humans. We don’t need to hype it and underline it that we are humans we don’t need to prove it. We born in some cast and religion so we talk about it casually we neither proud of it, nor the shame of it.". तू आमचा नातेवाईक तर नाहीस न म्हणून उत्सुकतेने विचारलेल्या प्रश्नाला वेगळं वळण दिलस”. एवढंच बोलून तिने फोन बाजूला तर ठेवला खरं पण तिच्या डोक्यातले विचार जात नव्हते.


लोक जातीपातीचा इतका बोभाटा का करतात?? लहानपणी आपण या गोष्टी फक्त एक नाव घेत वावरत होतो त्याच गोष्टी मोठं झाल्यावर वेगळं वळण घेतात, की काही लोकांच्या बोभाट्यामुळे बाकीचे त्याची री ओढतात हा खरंच मोठा प्रश्न आहे. मनीषाच्या मनातही नसताना समोरच्या व्यक्तीने ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने घेतली अर्थात ती व्यक्ती स्वतः एका उच्चभ्रू जातीमाधली आहे. तसं पाहता विचार तर चांगले वाटतात त्या व्यक्तीचे पण खरंच असावेत का? की फक्त स्वतःचं मत मांडून आम्ही किती प्रौढ विचारांचे आहोत हे दाखवायचं..


भारत हा एक विविधतेने नटलेला विविध संस्कृती असलेला आदर्श देश आहे. आपल्याकडे आहेत वेगळ्या जाती, जमाती, संस्कृती. संस्कृती आपण जपावी आणि जाती या केवळ नावाला ठेवाव्यात हे का जमत नसावं लोकांना. जातीपातीचे वाद वाढतात कश्याने? याचा विचार करत बसताना तिला जाणवलं की हा तर आपणच वाढवतोय प्रत्येक गोष्ट कॅजुअली घेतली तर तिचा त्रास होत नाही तेच ती अधोरेखित करून हा त्रास आहे हे दुसऱ्यांना सतत भासवून दिलं आणि प्रकर्षाने चुकीच्या पद्धतीने दाखवलं तर हे वाढतच जाणार. आपण नॉर्मल जगताना जातीचा सहजपणे उच्चार का नाही करू शकत? मी सुतार आहे याचा न गर्व आणि ना ही लाज बाळगली तर हे सहज शक्य आहे.


बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये काही समाजातल्या लोकांना हिणवलं जातं मारला जातं त्याचा विरोध नक्कीच करावा पण म्हणून सगळेच बोलताना असच बोलतात हे धरून चालणं किती त्रासदायक असू शकत. किती लोकांच्या डोक्यात हे विचार भरलेले आहेत की जे नकळत आग पेटवत आहेत याची प्रचीती मनीषाला आली. हा एवढा सगळा विचार करेपर्यंत त्यांची गाडी सर्विससेंटरमध्ये पोहचते. समोरून एक काळा माणूस येताच तिचे वडील त्याला काय काळे कसा आहेस म्हणत गाडी पार्क करतात. ती चमकून बघते तर त्या माणसाचं आडनाव काळे आहे हे तिला नेमप्लेटवर दिसतं. आता यावरही कदाचित तिच्या त्या सिनिअरने वर्णभेदाची कमेंट केली असती हे आठवून ती गालातल्या गालात हसून निघते. #लॉक डाऊन स्टोरी #क्वारंटाईन विचार असं लिहित लेखासहित तिचे बाबा आणि काळेंचा फोटो काढून पोस्टही इन्स्टावर शेअर करते.


Rate this content
Log in