भारत स्वातंत्र्यानंतरचा
भारत स्वातंत्र्यानंतरचा


स्वातंत्र्य मिळवून 74 वर्षे झाली, आता आपल्याला तेवढं काही वाटणार नाही पण त्यावेळी कितीतरी क्रांतिकारक होऊन गेले जे भारताच्या भूमी साठी आपले जीवन सोपवलं आणि जीवनाचे सार्थक केले. पण आता बघितलं तर वाटतं की आपण स्वातंत्र्य मिळवून घेतलंय का?
इतकी वर्षे स्वातंत्र्याला होऊन देखील बऱ्याच गोष्टींना स्वातंत्र्य मिळालेले नाहीये. उदा: मुलींना अजूनही स्वतंत्रपणे, निडर पणे घरा बाहेर पडता येत नाही. मुली कुठेच सुरक्षित नाहीत, स्वतःच्या घरी सुद्धा . मुलींना शिक्षणासोबत कराटेच प्रशिक्षण दिलेच पाहिजे. जेणेकरून थोडे
का होईना स्वतःचे रक्षण करू शकतील. यामुळे स्वावलंबीपणासुद्धा निर्माण होत जाईल.
प्रत्येक पिढीला आपल्या देशाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी मधून सुद्धा . त्यांना सुध्दा वाटलं पाहिजे की आपण भारताचे पुत्र किंवा पुत्री आहोत म्हणून. एकच जात आणि एकच धर्म एकच झेंडा फक्त भारत,भारत, आणि भारत...
अशाने कोणी दुरावणार नाही आणि नाही कोणी भांडणार धर्म आणि जातींना घेऊन. आजच्या पिढीला फक्त एकच आणि एकच धर्म आणि कर्म शिकवावा की जेणेकरून भारत एक नवीन भारत म्हणून जन्म घेईल.